Fulshivara (फुलशिवरा)

फुलशिवरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान फुलशिवरा गावाच्या पूर्वेकडे गावालगतच अर्धा कि.मी. अंतरावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

फुलशिवरा हे गाव, लासूर स्टेशन तेगाजगाव (गवळीशिवरामार्गे) सडकेवर आहे. (1) लासूर स्टेशन ते फुलशिवरा 8 कि.मी. (2) गाजगाव ते फुलशिवरा 3 कि.मी. मनमाड-हैदराबाद लोहमार्गावरील पोटूळ रेल्वे स्थानकावर अथवा लासूर रेल्वे स्थानकावर उतरून फुलशिवऱ्याला जाता येते. फुलशिवरा हे गाव, पोटूळ रेल्वेस्थानकाहून नैर्ऋत्येस (रांजणगाव पोळ मार्गे) 7 कि.मी. आहे. औरंगाबाद व रोटेगावमधील ही दोन रेल्वेस्थानके होत.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान फुलशिवरा गावाच्या पूर्वेस एक फर्लाग अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे फुलेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गंगापूरहून फुलशिवऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 373 स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून वेरूळला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) भैरवाच्या देवळातीला पूजा आरोगणा स्थान.


फुलशिवऱ्याची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Fulshivara : फुलसरां वसति :॥:
  • उदयाचि गोसावी बीजें केलेंः फुलसरां गावापुर्वे नरसिंहाचे देउळ पुर्वामुखः चौकी गोसावीयांसि आसन जालेः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिले : पूजावसर केला : आरोगणा जाली: गुळुळा जाला: विडा जाला: पहुड जाला :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाव-भालगाव-बगडी-जांबगववरुण येथे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: