Dongargan (डोंगरगण)

डोंगरगण, ता. जि. अहमदनगर


येथील स्थान डोंगरगनच्या महादेव मंदीरात पायरीवरून उतरताना शेवटच्या पायरीच्या डावे बाजुस हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

डोंगरगण हे गाव अहमदनगर वांबोरी मार्गावर अहमदनगरहून उत्तरेस 19 कि. मी. व वांबोरीहून दक्षिणेस 6 कि. मी. आहे. शेंडीहून उत्तरेस डोंगरगण 10 कि. मी. आहे. डोंगरगणला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. धार अवलोकणे तथा आसन स्थान :

हे स्थान डोंगरगण गावाच्या वायव्येस 200 मीटर अंतरावर डोंगराच्या खोऱ्यात रामेश्वर महादेवाच्या देवळाच्या नैर्ऋत्येस डोंगराच्या कपारीला लागून आहे. स्थानावर, चारी बाजूंनी उघडे असे लहान देऊळ आहे. खोऱ्यात जाताना, पश्चिम बाजूच्या उत्तराभिमुख 42 पायऱ्या उतरून खाली जाणे व डाव्या बाजूस वळणे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात माळवीपिंपळगावहून डोंगरगणला आले. प्रथम त्यांना पापविनाशनीच्या देवळात थोडा वेळ आसन झाले. त्यानंतर ते येथे आले. पाण्याची धार अवलोकन केली. मग त्यांना आसन झाले. (पू. ली 365 स्था. पो.) त्यानंतर सर्वज्ञ येथून वांबोरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. पापविनाशनीच्या देवळाच्या चौकातील आसन स्थान.
2. वांबोरी मार्गावरील कपाटी महात्म्यास बोलविणे स्थान.
3. घाटी आसन स्थान.


डोंगरगणची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: