उंचमढातील स्थाने (डोमेग्राम)

उंचमढातील स्थाने


येथील स्थाने 4 - उंचमढाचे अस्तित्व आजही पाहायला मिळते.



उंचमढ उत्तराभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी या मढास ‘नारायण’ मढ असे नाव होते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

14,15. लोपे स्थान :

ही दोन स्थाने उंचमढाच्या उत्तराभिमुख दरवाजाच्या पूर्व व पश्चिम बाजूस आहेत, उंचमढाचा उंबरा व दारसंका नमस्कारी आहेत.

लीळा : भक्तजन उंचमढात रहात होते. ते उंचमढात धर्मवार्ता करतात की अन्यवार्ता करतात, हे सर्वज्ञ दरवाजाच्या चौकटीच्या आड बाजूस उभे राहून ऐकत असत. म्हणजेच स्वत:स लोपन घेऊन ऐकत असत: म्हणून या स्थानाला ‘लोपे’ स्थान असे म्हणतात. (पाठसमुदायाची पोथी पूजावसर प्रकरण)


16. आसन स्थान :

हे स्थान उंचमढात दोन खांबांमध्ये आहे. स्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूचा खांब नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे भक्तजनांना निरूपण करीत असत. (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर)

येथील इतर लीळा : 1. नाथोबा ज्वरप्रसंगी आपुलेयाचा सुश्रूषा विधी निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 195)

2. ब्रह्मविद्या हे अधीत शास्त्र आहे, याविषयी भटोबासांना निरूपण करणे. (उत्तरार्ध लीळा 204)

3. भटोबास व नाथोबा यांना शास्त्र विषयत्व कथणे. (उत्तरार्ध लीळा 207)

4. अशक्ताचा सुश्रुषा विधी निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 216)


17. दादरयाचे स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून वायव्येस 3 फूट 10 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांच्या वेळी उंचमढावर जाण्यासाठी येथून जिना होता. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून जिना चढून उंचमढावर जात असत. (स्था, पो.)


उंचमढातील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: