सिंहनारायण मठाच्या (श्रीचक्रधर मंदिर) आवारातील स्थाने (डोमेग्राम)

66. विषयानंद दवडून परमानंद प्रगट करणे स्थान :

हे स्थान श्रीचक्रधरप्रभू मंदिराच्या पाठीमागे आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथे घोगरगावच्या बाईंचा विषयानंद दवडून तिच्या ठिकाणी परमानंद संचरला. (उ. ली. 108, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


‘एकांकबार’ नावाचे निर्देशरहित स्थान :

विषयानंद दवडून परमानंद प्रगट करणे स्थानापासन नैऋत्येस 88 फूट अंतरावरील ‘एकांकबार’ नावाचे स्थान निर्देशरहित आहे. कोणी एक ईश्वरावतार या ठिकाणी बारा वर्षे राहिले अशी दंतकथा आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


67. पुरामध्ये पोहविणे स्थान :

हे स्थान एकांकबार स्थानापासून वायव्येस सुमारे 150 फूट अंतरावर नदीच्या दक्षिण थडीवर देवळात आहे.

लीळा : एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ विहरणासाठी आले. नदीच्या थडीवर येथे उभे राहिले. नदी पाण्याने दुथडी भरून वाहात होती. सर्वज्ञ, भटोबास व नाथोबांना म्हणाले, ”एवढ्या पुरातून तुम्ही पलीकडे जाऊ शकाल?” भटोबास, नाथोबा, “हो” म्हणाले, सर्वज्ञांची अनुमती मिळताच लगेच दोघांनी कपडे काढले. सर्वज्ञांना दंडवत करून दोघांनी पुरामध्ये प्रवेश केला. (उ.ली.96,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


68. नाथोबा तारणे स्थान :

हे स्थान पुरामध्ये पोहविणे स्थानापासून पूर्वेस 140 फूट अंतरावर देवळात आहे.

लीळा : सवेज्ञांच्या आज्ञेवरून भटोबास व नाथोबा हे दोघे नदीच्या पुरामध्ये उड्या टाकून पोहत पोहत पलीकडच्या थडीकडे निघाले. थडीजवळ पोहचता पोहचता सर्वज्ञांनी त्यांना परत बोलविले. परत येताना मध्यपात्रात आल्यावर नाथोबा वाहून जाऊ लागले. नाथोबा वाहून चालले म्हणून बाइसा मोठ्याने ओरडू लागल्या. मग सर्वज्ञांनी फुटा फिरवला. लगेच नाथोबांनी ठाव घेतला. गुडघ्या इतक्या पाण्यात उभे राहिले. नंतर भटोवास त्यांना घेऊन आले. (उ. ली. 96, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: