सिंहनारायण मठाच्या (श्रीचक्रधर मंदिर) आवारातील स्थाने (डोमेग्राम)

63. गांधीया हिवरू, तरूदुःख निरूपण स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून ईशान्येस 28 फूट अंतरावर देवळात आहे.

लीळा : या ठिकाणी गाठ्याळ हिवराचे झाड होते. त्याला ठिकठिकाणी गाठी उगवल्या होत्या. सर्वज्ञ येथे आले. सोबत भटोबासही होते. सर्वज्ञ भटोबासांना म्हणाले, “अशी ही झाडांची दु:खे आहेत. वृक्ष योनी प्राप्त झाली असताही अवांतर दु:खाचा भोग चुकत नाही.” (उ.ली. 116, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


तरुदु:ख निरूपण स्थानाच्या आग्नेयेचे स्थान निर्देशरहित आहे.


64. इंद्रभटांचा उपहार स्वीकार स्थान :

हे स्थान श्रीचक्रधरप्रभू मंदिराच्या दक्षिणेस असलेल्या पूर्वाभिमुख मंदिराच्या ईशान्य विभागी आहे.
लीळा : 1. सर्वज्ञांनी येथे इंद्रभटांच्या उपहाराचा स्वीकार केला. (उ. ली. 164, स्था. पो.)

2. द्वारकेहून आलेल्या ब्रह्मचारीदेवांची येथे भेट झाला. (उ.ली. 164. 3)

हे सर्वज्ञांचे विहरण प्रसंगीचे आसन स्थानही होय. (उ. ली. 163, 164)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


65. आसन स्थान :

हे स्थान इंद्रभटांचा उपहार स्वीकार स्थानाच्या पश्चिम बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे कधी कधी भक्तजनांना निरूपण करीत असत. (उ. ली. 180, तळटीप, ना. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


या व्यतिरिक्त या मंदिरातील इतर चार स्थाने निर्देशरहित आहेत.


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 3 वर ज्याण्यासाठी ‘3’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾