सिंहनारायण मठाच्या (श्रीचक्रधर मंदिर) आवारातील स्थाने (डोमेग्राम)

सिंहनारायण मठाच्या (श्रीचक्रधर मंदिर) आवारातील स्थाने


सिंहनारायण मठ परिसर -  स्थाने 9.



भटोबासांची उदरव्यथा निवारण करणे स्थानाच्या वायव्येस ‘श्रीचक्रधरप्रभू मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातील स्थाने आम्ही क्रमाने देत आहोत.


स्थानाची माहिती :

60. गरूडाशी आसन स्थान :

हे स्थान श्रीचक्रधरप्रभू मंदिराच्या पूर्वेस देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञांच्या वेळी येथे निळ्या पाषाणाची पश्चिमाभिमुख गरूडाची मूर्ति होती. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू त्या मूर्तीच्या पाठीला टेकून पूर्वाभिमुख बसलेले होते. त्यावेळी गणपति आपयो व आउसा हे दोघे सराळ्याहून आले. त्यांची येथे भेट झाली. (उ. ली. 95, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


61. गणपति आपयो शिक्षापण स्थान :

हे स्थान गरूडाशी आसन स्थानापासून पूर्वेस 21 फूट 2 इंच अंतरावर देवळात आहे.

लीळा : आउसाने स्थितीच्या भरात केलेल्या स्तुतीस गणपति आपयोंनी दुजोरा दिल्यामुळे सर्वज्ञांनी त्यांना येथे शिक्षापण केले. (उ.ली.95, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


62. आसन स्थान :

हे स्थान गणपति आपयो शिक्षापण स्थानापासून किंचित ईशान्येस 5 फूट 4 इंच अंतरावर आहे.

लीळा : भटोबासांना गुंडेवरी घेववणे, (स्था.पो.को.प्र.वि.स्था.पो. क्र.1563.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


आसन स्थानाच्या आग्नेयेचे स्थान निर्देशरहित आहे.


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 2 वर ज्याण्यासाठी ‘2’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾