रेइनायकांच्या आवारातील स्थाने (डोमेग्राम)

रेइनायकांच्या आवारातील स्थाने


येथील 3 स्थाने - श्रीचक्रधर मंदिराच्या आग्नेयेस उत्तराभिमुख देवळात आहेत.


ही स्थाने डोंबेग्राममध्ये श्रीचक्रधर मंदिराच्या आग्नेयेस उत्तराभिमुख देवळात आहेत. सर्वज्ञांच्य वेळी येथे रेइनायकांचा आवार होता.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

30. नाथोबा निरूपण करणे स्थान :

हे स्थान दरवाजातून आत जाताच डाव्या हाताला आहे.

लीळा : एके दिवशी रेइनायकांच्या आवारी दुपारचा पूजावसर झाला. भोजनासाठी सर्वांना ताटे वाढली. सर्वज्ञ आरोगणा करू लागले. सर्व भक्तजन जेऊलागले. नाथोबा मात्र रूचीपूर्वक जेवत असल्याचे सर्वज्ञांनी पाहिले. जेवण झाल्यावर सर्वज्ञांनी नाथोबांना विचारले, “जेवताना आमचा आठव करीत होता?” नाथोबा म्हणाले, “नाही जी.” सर्वज्ञ म्हणाले, “तुम्ही झोपण्याचा वेळी, बसण्याच्या वेळी व भोजनाच्या वेळी परमेश्वराचा आठव केला पाहिजे.” असे निरूपण करून सर्वज्ञ मढाकडे गेले. (उ. ली. 182, स्था. पो.)


31. मादने स्थान :

हे स्थान नाथोबा निरूपण करणे स्थानापासून नैर्ऋत्येस 4 फूट 11 इंच अंतरावर आहे. (स्था. पो.)


32. आरोगणा स्थान :

हे स्थान मादने स्थानपासून दक्षिणेस 3 फूट 7 इंच अंतरावर आहे.

लीळा : एके दिवशी रेइनायकांच्या आवारी पूजावसर झाला. सर्वज्ञांच्यासाठी ताट केले. भक्तजनांनाही वाढले. सर्वजण जेवू लागले. नाथोबा मात्र हात धरून बसले होते. सर्वज्ञ नाथोबांना म्हणाले, “तुम्ही का जेवत नाही?” नाथोबा म्हणाले, “तूप वाढायचे राहिले आहे.” तेव्हा “आणा आणा तूप” म्हणून रेइनायक मोठ्याने ओरडले, तूप आणले, नाथोबांना वाढले. मग सर्वज्ञ नाथोबांना म्हणाले, “तुम्ही महात्मे आहात. तुम्ही ताटात जे वाढले तेच भोजन केले पाहिजे.’ (उ. ली. 181, स्था, पो.)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: