रायांगणातील स्थाने (डोमेग्राम)

रायांगणातील स्थाने


येथील स्थाने 7- नवीन बांधकामामुळे रायांगणाचे अस्तित्व राहिले नाही, तरीही येथील स्थाने राजमढ मध्येच येतात.



सर्वज्ञांच्या वेळी राजमढ व उंचमढ या दोन मढांमध्ये 9 हात लांबीचे रायांगण होते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

7. राजमढाचे पश्चिम सोंडी स्थान :

हे स्थान दुसऱ्या दक्षिण दरवाजाच्या पश्चिम बाजूस आहे. यालाच ‘तुरंगमाची’ सोंडी असे म्हणतात.

लीळा : येथून सर्वज्ञ, भटोबासांच्या पाठीवर आरोहण करून छिन्नपापाकडे खेळ क्रीडा करण्यासाठी गेले. (उत्तरार्ध लीळा 166)


8. राजमढाचे पूर्व सोंडी स्थान :

हे स्थान पश्चिम सोंडी स्थानापासून पूर्वेस 3 फूट 8 इंच अंतरावर आहे. यालाच ‘दाकोची’ सोंडी असे म्हणतात,

लीळा : दाको हा चांभारगोंदीचा राहणारा, तो एके दिवशी सर्वज्ञांच्या दर्शनाला आला. अंगणात उभा राहिला. सर्वज्ञांनी त्याला येथे येऊन दर्शन दिले. दाकोने सर्वज्ञांना पाचवर्णी जाडी व चवरी अर्पण केली. (उत्तरार्ध लीळा 149, स्थान पोथी)


9. मादने स्थान :

हे स्थान पूर्व सोंडी स्थानापासून पूर्वेस 3 फूट अंतरावर आहे.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे हे स्नान करण्याचे ठिकाण होय. (स्थान पोथी)

2. सर्वज्ञ येथूनच उदास होऊन प्रसन्नमढात गेले. (उ.ली.158, स्था. पो. उ. प्र.)


10. वेढे स्थान :

हे स्थान राजमढाच्या पूर्व सोंडी स्थानापासून दक्षिणेस 4 फूट 3 इंच अंतरावर आहे.
लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आरोगणा झाल्यावर भटोबासांचा हात धरून रायांगणामध्ये शतपावली करीत असत. (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर) 2. नाथोबांच्या पाठीवर आरोहण होऊन वेढे करणे, (उत्तरार्ध लीळा 153, स्थान पोथी उ. प्रत) 3. दाइभागवत, भुतानंद, आवाइसा, लाखाइसा, रामदेव ऊर्फ दादोस, माहादाइसा, हरीभट इत्यादींच्या रायांगणात भेटी झाल्या. (स्था, पो. उ. प्र.)


11. उंचमढाचे पश्चिम सोंडी स्थान :

हे स्थान वेढे स्थानापासून दक्षिणेस 8 फूट 4 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)


12. उंच मढाचे पूर्व सोंडी स्थान :

हे स्थान पश्चिम सोंडी स्थानापासून पूर्वेस 3 फूट 10 इंच अंतरावर आहे. यालाच ‘पाठकाची’ सोंडी असे म्हणतात,

लीळा : 1. सर्वज्ञांना या सोंडीवर आसन होत असे. (स्थान पोथी उ. प्रत)

2. निरूपण दुखाक्रांत पाठका आसु ज्ञान करणे. (उत्तरार्ध लीळा 132, स्थान पोथी को. शा. खा. द. प्रत)


13. आसन स्थान :

हे स्थान उंचमढाच्या पूर्व सोंडी स्थानाच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : रेइनायकांच्या घरी श्राद्धप्रसंगी, भटोबास व नाथोबा यांनी सर्वज्ञांची आज्ञा न घेता भोजन केले. त्या अपराधाबद्दल सर्वज्ञांनी दोघांना राजमढावरून खाली पंचवीस-पंचवीस उड्या घालण्याची शिक्षा दिली. त्यावेळी सर्वज्ञांना येथे आसन होते. (उत्तरार्ध लीळा 127, स्थान पोथी)


रायांगणातील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: