राजमढाच्या पटीशाळेवरील स्थाने (डोमेग्राम)

राजमढाच्या पटीशाळेवरील स्थाने


येथील स्थाने 3- नवीन बांधकामामुळे पटीशाळेचे अस्तित्व राहिले नाही, तरीही येथील स्थाने राजमढ मध्येच येतात.



सर्वज्ञांच्या वेळी राजमढापुढे पूर्व-पश्चिम, दक्षिणाभिमुख पटीशाळा होती.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

4. उंबरवटाचे स्थान :

हे स्थान राजमढाच्या दक्षिण दरवाजातून पुढे जाताच पश्चिम (उजव्या) बाजूस लहान कोनाड्यात आहे.

लीळा : राजमढाचा दक्षिणाभिमुख दरवाजा येथे होता. भटोबास दररोज उंबरा उशाला करून झोपत असत. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पहाटेच्या वेळी उठल्यावर येथे येत. दोनी दारसंका धरून एक श्रीचरण उंबऱ्यावर ठेवीत व दुसरा श्रीचरण भटोबासांच्या छातीवर ठेवीत. तेव्हा भटोबास जागे व्हायचे, श्रीचरण हृदयासी आलिंगून धरायचे, कपाळावर ठेवून नमस्कार करायचे, चुंबन घ्यायचे, असे अनेक वेळा करीत. त्यामुळे भटोबासांना थोर सुख होत असे. (पाठसमुदायाची पोथी, सकाळचा पूजावसर)


5. दुपारच्या पूजावसराचे स्थान :

हे स्थान उंबरवटाच्या स्थानापासून पश्चिमेस 2 फूट 4 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांचा दुपारचा पूजावसर येथे होत असे. (उत्तरार्ध लीळा 124, पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर)

येथील इतर लीळा :

1. गदोनायकांची पत्नी म्हाळाइसा, तिच्या वस्त्रपूजेचा व उपहाराचा स्वीकार करणे. (उत्तरार्ध लीळा 143, स्थान पोथी उ. प्रत)

2. इंद्रेया पर्णानएनी भटां कौसाल्या प्रसंसा. (उत्तरार्ध लीळा 148)

3. जिव्हाडाग श्रवणी भटोबास व मार्तंड यांना क्षीरभोजन करवणे, (उत्तरार्ध लीळा 156, स्थान पोथी उ. प्रत)

4. विदावंत निवारणे प्रसंगी भटोबासांना रागावणे. (उत्तरार्ध लीळा 162)

5. मृतीकापींडग्रहणी भटोबासांना विकारज्ञान करणे. (उत्तरार्ध लीळा 191)


6. मालगंठी स्थान :

हे स्थान पटीशाळेतच पूर्व बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञांनी येथे भक्तजनांना मालगंठीचा अवसर दाखविला. (उत्तरार्ध लीळा 143, स्थान पोथी उ.प्रत)

येथील इतर लीळा :

1. साधाला अभयदान देणे. (उत्तरार्ध लीळा 185, स्थान पोथी उ.प्रत)

2. पिंपळे वामनभटांचा उपहार स्वीकार करणे. (स्थान पोथी उ. प्रत)

3. माहाजना पाठवणी देणे. (स्थान पोथी उ. प्रत)


राजमढाच्या पटीशाळेवरील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: