प्रसन्नमढातील स्थाने (डोमेग्राम)

प्रसन्नमढातील स्थाने


येथील स्थाने 4 - नवीन बांधकामामुळे प्रसन्नमढाचे पूर्ण अस्तित्व राहिले नाही.



श्रीचक्रधर मंदिरात दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख प्रसन्नमढ आहे. सर्वज्ञांच्या वेळी या मढास केशव’ मढ असे नाव होते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

23. औदास्य परिहार स्थान :

हे स्थान प्रसन्नमढात प्रवेश करताच दक्षिण (डाव्या) बाजूस आहे.

लीळा :1. एके दिवशी सर्वज्ञांना औदास्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली. त्या वेळी ते येथे येऊन पडले. कोणाही भक्तजनास सर्वज्ञांच्या पुढे जाण्याचे धाडस होईना. सर्वजण चिंताग्रस्त झाले. त्या वेळी भटोवासांनी परमेश्वरपुराहून आणलेली श्रीप्रभू गोसावीयांची प्रसाद दुटी सर्वज्ञांना दाखविली व ती स्वीकारण्याची विनंती केली. श्रीप्रभू गोसावीयांची प्रसाद दुटी पाहताच सर्वज्ञांचे औदास्य परिहरले. दुटी सर्वज्ञांनी परिधान केली. या प्रसंगी सर्वज्ञांनी भटोबासांना प्रसादाची महिमा निरूपण केली. (उत्तरार्ध लीळा 158, स्थान पोथी)

2. माहादाइसा श्वेत उपहारी भट चमरीदंडे ताडणे. (उत्तरार्ध लीळा 157, स्थान पोथी उ. प्रत)


24. लघुपरिश्रय स्थान :

हे स्थान औदास्य परिहार स्थानापासून उत्तरेस 5 फूट 9 इंच अंतरावर भितीला लागून आहे. सर्वज्ञांच्या वेळी उंचमढ व प्रसन्नमढया दोन मढांमध्ये दीड हाताची संदी होती. त्या संदीतील हे लघुपरिश्रय स्थान होय.

औदास्य परिहार स्थानाच्या उत्तरेची तांबूळ खिडकी असल्याचे बोलले जाते; परंतु याविषयी अजून आम्हाला लेखी पुरावा उपलब्ध झालेला नाही,


25,26. दीर्घ परिश्रयाची स्थान :

ही दोन स्थाने प्रसन्नमढाच्या पश्चिमेस आहेत. (स्थान पोथी) या स्थानाकडे जाण्यासाठी प्रसन्नमढाच्या पश्चिम वाजूने पायऱ्या व दरवाजा आहे.


श्रीचक्रधर मंदिरातील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: