गोदावरीच्या दक्षिण काठावरील स्थाने (डोमेग्राम)

गोदावरीच्या दक्षिण काठावरील स्थाने


छिन्नस्थळीच्या पाय रस्त्यावरील गोदावरीच्या दक्षिण काठावर ही 10 स्थाने विविध ठिकाणी आहेत.


ही स्थाने डोंबेगामापासून पूर्वेस चार फर्लाग अंतरावर आहेत.


स्थानाची माहिती :

33. विसाव्याचे स्थान :

हे स्थान गोदावरी नदीच्या पात्रात दक्षिण बाजूस षट्कोनी मंदिरात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रात्रीचा पूजावसर, आरोगणा झाल्यावर राजमढाहून भटोबासांच्या पाठीवर आरोहण होऊन छिन्नपापाकडे जाताना येथे उतरले. क्षण एक विसावा घेतला. मग भटोबासांचा खांदा थापटला, व पुन्हा पाठीवर आरोहण होऊन छिन्नस्थळीकडे गेले. (उ.ली.166 , स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


34. जळघोष निवारण स्थान :

हे स्थान विसाव्याच्या स्थानापासून पूर्वेस अर्धा फर्लाग अंतरावर देवळात आहे.

लीळा : छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सकाळचा पूजावसर झाल्यावर विहरणासाठी येथे आले. सर्वज्ञ भक्तजनांना निरूपण करीत होते, परंतु जवळून वाहणाऱ्या पाण्याच्या खळखळ आवाजामुळे निरूपण नीट ऐकू येत नव्हते. भक्तजन म्हणाले, “जी जी या पाण्याच्या खळखळ आवाजामुळे निरूपण नीट ऐकू येत नाही.” सर्वज्ञ आऊसाला म्हणाले, “नायका, हा फुटा आड घाला.” आऊसाने फुटा आड घातला आणि पाण्याचा येणारा खळखळ आवाज बंद झाला. निरूपण संपल्यावर सर्वज्ञांनी आऊसास तो फुटा काढण्यास सांगितले. आऊसाने फुटा काढताच पुन्हा पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. भक्तजन म्हणाले, “हे कसे काय! इतका वेळ आवाज येत नव्हता! आता कसा आवाज येत आहे?” सर्वज्ञ म्हणाले, “हे आऊसाचे सामर्थ्य ” आऊसा म्हणाली, ‘माझे कशाचे सामर्थ्य, हे स्वामी जगन्नाथाचे सामर्थ्य .” मग सर्वज्ञ गुंफेकडे गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


35. पिंडापाशील आसन स्थान :

हे स्थान जळघोष निवारण स्थानाच्या दक्षिणेस दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : 1. छिन्नपापी गुंफेत अवस्थान असाताना सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दुपारचा पूजावसर झाल्यावर येथे येत असत व भक्तजनांना निरूपण करीत असत. (स्थान पोथी उ. प्रत)

2. डोंबेग्रामी अवस्थान असताना सर्वज्ञ येथे विहरणासाठी येत असत. (पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर)

3. रामचंद्रांनी दशरथाचे पिंड पाडलेली जागा सर्वज्ञांनी भक्तजनांना दाखविली व त्या पिंडास श्रीकराच्या बोटाने स्पर्श केला. (स्थान पोथी उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


36. ढगावरील आसन स्थान :

हे स्थान पिंडापाशील आसन स्थान देवळाच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे डोमेग्राम येथे वास्तव्य असताना ते कधी कधी येथे विहरणासाठी येत असत, त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. ते भक्तजनांना ब्रह्मविद्याशास्त्राचे निरूपण करीत असत.

2. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे उत्तराभिमुख आसन होते. त्यावेळी म्हाइंभट सराळ्याहून आले. आधल्या दिवशी सर्वज्ञांनी त्यांना महावाक्य निरूपण केले होते. त्यातून त्यांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न त्यांनी येथे सर्वज्ञांना विचारले, त्याप्रसंगी सर्वज्ञांनी म्हाइंभटांना त्र्यंश निर्वच, काही निर्वचन आणि महावाकयाची अर्थवचने निरूपण केली. (उ.ली.140,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


37. अग्नीष्टिका भोजन स्थान :

हे स्थान ढगावरील आसन स्थान देवळाच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 2 वर ज्याण्यासाठी ‘2’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾