घाट छिन्नस्थळी च्या आवारातील स्थाने (डोमेग्राम)

घाट छिन्नस्थळी च्या आवारातील स्थाने (गोदावरी पात्र)


घाट छिन्नस्थळी च्या आवारातील गोदावरी पात्रात - 5 स्थाने.


स्थानाची माहिती :

74. जळसेनी आसन स्थान :

हे स्थान दायंबा आधड तरू निरूपण स्थानापासून पश्चिमेस 148 फूट अंतरावर देवळात आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


75. भांडेभेदन स्थान :

हे स्थान जळसेनी आसन स्थानापासून पश्चिमेस 287 फूट अंतरावर देवळात आहे.

लीळा : 1. छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ बाइसांना म्हणाले, “आज आम्ही महात्म्यांचे भिक्षान्न भोजन करू. तुम्ही आज काही करू नका.” मग सर्वज्ञ भांडभेदनाकडे आले. त्यांना येथे आसन झाले. गुंफेहून निघताना बाइसांनी माहादाइसांना हळूच निरोप दिला की, “भिक्षेला काही व्यवस्थित पदार्थ येणार नाहीत, तरी येताना तांदळाचा भात करून घेऊन ये.” माहादाइसांनी भात तयार केला. वस्त्राखाली झाकून घेऊन येत होत्या. तेव्हा सर्वज्ञांनी खडा फेकून मारला. त्याबरोबर भाताच्या मडक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. सर्व भात खाली सांडला. बाइसा म्हणाल्या, “कटकट बाबा, सगळा भात वाया गेला.” सर्वज्ञ म्हणाले, “आम्ही तुम्हाला नको म्हणून सांगितले असता, तम्ही का ऐकले नाही?” मग भक्तजन भिक्षा करून आले. सर्वज्ञांना झोळ्या दृष्टपूत केल्या. बाइसांनी भिक्षेतील चांगले पदार्थ निवडले. मग सर्वज्ञांनी भक्तजनांसहित आरोगणा केली. (उ.ली.101.स्था. पो.) येथे सर्वज्ञांना पूर्वाभिमुख आसन होत असे. कदाचित पश्चिमाभिमुख आसन होत असे. भक्तजनांची भोजनता येथेच होती. (स्था. पो. उ. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


76. पाषाण फोडविणे स्थान :

हे स्थान भांडेभेदन स्थानापासून नैर्ऋत्येस 29 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे डोमेग्राम येथे वास्तव्य असताना ते गोदावरीच्या काठी विहरणासाठी येत असत. त्याप्रसंगी भक्तजनांचा कर्मनाश होऊन त्यांचा अधिकार वाढावा, त्यांना योग्यता व्हावी, या उद्देशाने सर्वज्ञ त्यांच्याकडून पाषाण फोडवून घेत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


77. महालक्ष्मीचा साजा आसन स्थान :

हे स्थान पाषाण फोडविणे स्थानापासून ईशान्येस अर्धा फर्लाग अंतरावर उंच कपारी लगत नदीच्या मध्यपात्रात देवळात आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


78. देवद्रोणी, देवतापूजा स्वीकार स्थान :

हे स्थान महालक्ष्मीचा साजा आसन स्थानापासून पश्चिमेस सुमारे 200 फूट अंतरावर (नांगर चासाच्या काठी) देवळात आहे…
लीळा : सर्वज्ञांना छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी दुपारचा पूजावसर, आरोगणा, पहुड, उपहड झाल्यावर ते एकटेच देवद्रोणीकडे आले. त्यांना येथे आसन झाले. तेव्हा पाण्यातन सोन्याच्या ताटात रत्नांचे दीप घेऊन दोन देवता आल्या. त्यांनी सर्वज्ञांची पूजा केली. दंडवत घालून नमस्कार करून मग गेल्या. (उ. ली. 100, स्था, पो.)

येथून देवगाव स्थान क्रमांक 5 कडेही जाता येते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: