घाट छिन्नस्थळी (डोमेग्राम)

घाट छिन्नस्थळी


घाट छिन्नस्थळी येथील - 5 स्थाने.


स्थानाची माहिती :

69. विहरण स्थान :

हे स्थान नाथोबा तारणे स्थानापासून पूर्वेस 65 फूट अंतरावर देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ येथे विहरणाला येत असत. (स्था.पो.को.खा.द.शा.प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


70. ढगाचे स्थान :

हे स्थान विहरण स्थानापासून ईशान्येस 16 फूट अंतरावर आहे.

लीळा : हे सर्वज्ञांचे विहरण स्थान होय. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


71. छिन्नस्थळी, आसन स्थान :

हे स्थान ढगाच्या स्थानाच्या खालील बाजूस (उत्तर बाजूस) नदीच्या पात्रात थडी लगत उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू दररोज येथे विहरणासाठी येत असत. त्यांना या ठिकाणी कधी पूर्वाभिमुख, कधी पश्चिमाभिमुख, कधी उत्तराभिमुख, कधी दक्षिणाभिमुख आसन होत असे. कधी संध्याकाळच्या वेळेस तर कधी एकटेच सर्वज्ञ येथे येत असत. (स्था. पो. उ. प्रत) डोंबेग्रामला अवस्थान असतानाही सर्वज्ञ येथे कधी कधी विहरणाला येत असत. (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर) येथील इतर लीळा : 1. सारंगपंडिता भेटी, देवगावच्या बाईंची भेटी, रेइनायकांचा मुलगा नागोबा, त्याची भेटी, ज्वरनिवृत्ती झाल्यावर रेइनायका भेटी, ग्रहेसारंगपाणी व त्यांच्या मातेची भेटी, बाजाठाणीच्या महाजनांची भेटी, नाथोबा भेटी, इत्यादी भेटी छिन्नस्थळीवर झाल्या. (स्थान पोथी उ. प्रत) 2. भक्तजनांना परावर शास्त्राचे निरूपण करणे (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर 3. गुंफेत चाकवताची भाजी रांधवल्यानंतर छिन्नस्थळीवर येऊन भक्तजनांसहित आरोगणा करणे. भक्तजनांना श्रीकराच्या करंगळीने भाजी वाढणे, (उत्तरार्ध लीळा 105, स्थान पोथी उ. प्रत) 4. पुरप्रविष्ट स्त्री तारणे. (उत्तरार्ध लीळा 97. 5. आउ पिंड उपहार स्वीकार. (उत्तरार्ध लीळा 99. 6. सारंगपंडिता स्त्री अधिकार निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 102. 7. दायंबा सीखासुन्नत्याग अनुवाद (उत्तरार्ध लीळा 113. 8. भट तुरंगमारोहणी छिन्नस्थळीपाशी उतरूनी छिन्नस्थळीवर आसन. (उत्तरार्ध लीळा 166, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


72. घाट छिन्नस्थळी स्थान :

हे स्थान आसन छिन्नस्थळीच्या पूर्व बाजूस शेजारीच आहे. घाट छिन्नस्थळी हा छिन्नस्थळीचाच अविभाज्य विभाग होय,

लीळा : घाट छिन्नस्थळी म्हणजे सर्वज्ञांचा छिन्नस्थळीकडे येण्याचा मार्ग होय. या बाजूने सर्वज्ञ येत असत. मग त्यांना छिन्नस्थळीवर आसन होते असे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


73. दायंबा, आधड तरू निरूपण स्थान :

हे स्थान आसन छिन्नस्थळी स्थानापासून पश्चिमेस 27 फूट अंतरावर देवळात आहे.

लीळा : छिन्नपापी गुंफेत अवस्थान असताना एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ दायंबा मुख्यकरून सर्व भक्तजनांसह छिन्नस्थळीकडे विहरणाला आले. सर्वज्ञ येथे उभे राहिले. तेव्हा उतारावर एक पिंपळाचा वृक्ष वाऱ्यामुळे हालत होता. आदळत होता. तो वृक्ष एकाच मुळीवर राहिला होता, तो अवलोकून सर्वज्ञ दायंबांना म्हणाले, “तुम्ही एथ अनुसरा म्हणजे तुमचे सर्व दु:ख चुकतील. नाहीतर तुम्हाला अशा प्रकारच्या वृक्ष योनीत जन्म घेऊन अनंतकाळ दुःख भोगावे लागेल;” परंतु दायंबा गप्पच होते. काहीच बोलले नाही. (उ. ली. 112, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: