छिन्नपाप गुंफा आणि गुंफेच्या परिसरातील स्थाने (डोमेग्राम)

छिन्नपाप गुंफा आणि गुंफेच्या परिसरातील स्थाने


छिन्नपाप गुंफा (10 स्थाने) - अवस्थान स्थानासहित गुंफेत अजून 9 स्थाने आहेत, असे एकूण 10 स्थाने आहेत.



दरेदरकुटे बुजविणे स्थान देवळापासून आग्नेयेस सुमारे अर्धा फलांग अंतरावर भव्य उंच जागेवर भव्य उत्तराभिमुख मंदिर आहे, पायऱ्या चढून गेल्यावर 10 स्थाने दिसतात, सर्वज्ञांच्या वेळी येथे पूर्वाभिमुख गुंफा होती.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

43. अवस्थान स्थान :

देवळात मध्यभागी जो मोठा आहे, ते अवस्थान स्थान होय. या ओट्यात अवस्थान स्थानासहित एकूण 9 स्थाने आहेत. त्या सर्व स्थानांच्या लीळा खाली दिलेल्या आहेत. सर्वज्ञांच्या बेळी येथे पूर्वाभिमुख गुंफा होती.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू उत्तरार्धात गावजोगेश्वरीहून छिन्नपापला आले. त्यांचे या ठिकाणी चार महिने वास्तव्य होते. (उत्तरार्ध लीळा 87, स्थान पोथी)

येथील इतर लीळा : 1. ओट्याखाली वस्त्र वेढणे (स्थान पोथी)

2. उपान्हौ श्रीचरणी मेळवणे. (स्थान पोथी)

3. भटोबासांच्याकरवी स्वानमुखे खीर खाबवणे. (स्थान पोथी)

4. ग्रहेसारंगपाणीच्या मातेचा उपहार स्वीकार करणे. (स्थान पोथी उ. प्र.)

5. पिंपळेवामनभटांच्या उपहारप्रसंगी, भटोबासांना खीरभोजनी आश्चर्यचकित करणे. (उत्तरार्ध लीळा 90) 6. स्त्रीपानाळव्यथा प्रसंगी बाइसांना रागावणे. (उत्तरार्ध लीळा 91)

7. रेइनायकांचा उपहार स्वीकार करणे. (उत्तरार्ध लीळा 92, स्थान पोथी उ. प्रत)

8. घोगरगावच्या बाइयांचे पाच लाडू स्वीकार करणे. (उत्तरार्ध लीळा 93)

9. खेइगोइ भेटी व अनुसरण. (उत्तरार्ध लीळा 104)

10. चाकवताची भाजी रांधवणे. (उत्तरार्धलीळा 105)

11. भटा पातलेपण अनुवाद. (उत्तरार्ध लीळा 106)

12. मंडळीका भिक्षानएनी स्त्री-विकार-कथन. (उत्तरार्ध लीळा 109)

13. भोजेया संकतुळसी अनुवाद. (उत्तरार्ध लीळा 110)

14. दायंबा स्त्रीनिमित्त दुःख करणे. (उत्तरार्ध लीळा 111)

15. दायंबाना धर्मनष्ट विषयनष्ट निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 114)

16. भटोबासांचे अवक्रीयत्व कथणे. (उत्तरार्ध लीळा 115.

17. वेसाइसाची सरखळी चोरी प्रगट करणे. (उत्तरार्ध लीळा 117)

18. आउ दुधा कवडे मागणे, (उत्तरार्ध लीळा 118)

19. भटी सुस्नात दंडवत घालणे. (उत्तरार्ध लीळा 119)

20. अग्निकुंडात श्रीकर दर्शन. (उत्तरार्ध लीळा 120)

21. माहादाइसाला कलीधर्म निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 121)

22. भटोबासांना, शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 122)

23. म्हाइंभटांना परमेश्वर शास्त्र सिद्धान्त निरूपणे. (उत्तरार्ध लीळा 139)

24. गंफे महापजा. (उत्तराधे लीळा 166 स्थान पोथी उ. प्रत)

25. भटांअद्वैत समर्थनी म्हाइंभटांची कुमति हरणे. (उत्तरार्ध लीळा 171)

26. भटां स्तुतिकरणी सर्वशास्त्र प्रतिभिज्ञा करणे. (उत्तरार्ध लीळा 173)


44. लघुपरिश्रय तथा उदका विनियोन स्थान :

हे स्थान मुख्य स्थानापासून उत्तरेस 4 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.)


45. भक्तजनांच्या गुंफेमागील आसन स्थान :

हे स्थान लघुपरिश्रय तथा उदका विनियोग स्थानापासून उत्तरेस 11 फूट 8 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांना येथे पश्चिमाभिमुख आसन झाले होते. (स्था.पो.उ.प्रत)


46. मादने स्थान :

हे स्थान मुख्य स्थानापासून पूर्वेस 5 फूट 1 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)


47. हंसराजा राहाविणे स्थान :

हे स्थान मादने स्थानापासून पूर्वेस 5 फूट 1 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू उत्तरार्धात छिन्नपापहून टोकेगव्हाणला निघाले होते. त्यावेळी संतोष अशक्त होते; म्हणून त्यांच्या सेवेसाठी सर्वज्ञांनी हंसराजास राहण्यास सांगितले. (उ. ली. 305, स्था. पो.)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 2 वर ज्याण्यासाठी ‘2’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾