छिन्नपाप गुंफेच्या आवारातील स्थाने (डोमेग्राम)

छिन्नपाप गुंफेच्या आवारातील स्थाने


छिन्नपाप गुंफेच्या आवारात 3 स्थाने आहेत.


स्थानाची माहिती :

53. गुंफेच्या कामासाठी गारी करविणे स्थान :

हे स्थान छिन्नपाप गुंफा स्थानांच्या पश्चिम बाजूस आहे.

लीळा : भक्तजनांच्याकरिता गुंफा तयार करण्यासाठी सर्वज्ञांनी भक्तजनांना येथे चिखल करण्यास सांगितले. (उ. ली. 88, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


54. नवी गार करविणे स्थान :

हे स्थान गुंफेच्या कामासाठी गारी करविणे स्थानापासून उत्तरेस 57 फूट अंतरावर आहे.

लीळा : गुंफेच्या कामासाठी आधल्या दिवशी तयार केलेल्या चिखलात मुंग्या झाल्यामुळे सर्वज्ञांनी भक्तजनांस येथे दुसरा चिखल करण्यास सांगितले. (उ.ली. 88, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


55. भटोवासांची उदरव्यथा निवारण करणे स्थान :

हे स्थान नवी गार करविणे स्थानापासून उत्तरेस 90 फूट अंतरावर आहे.

लीळा : एके दिवशी भक्तजन मातीकाम करीत होते. तेव्हा भटोबासांचे पोट दुखू लागले. ते लिंबाच्या झाडाखाली जाऊन झोपले. त्यामुळे मातीकाम थांबले. सर्वज्ञ गुंफेबाहेर आले. त्यांनी विचारले, “मातीकाम का थांबले?” भक्तजन म्हणाले, “नागदेवाचे पोट दुखत आहे.” मग सर्वज्ञ येथे आले व भटोबासांना म्हणाले, ”मातीकाम का थांबले?” भटोबास म्हणाले, “माझे पोट दुखत आहे.” सर्वज्ञ म्हणाले, “तू काम नाही केलेस तर हे इतर कुणीच करणार नाहीत?’ भटोबास म्हणाले, “माझे पोट दुखण्याचे थांबवा, मग मी काम करेन.” सर्वज्ञ म्हणाले, “आम्ही तुझे पोट दुखविण्याचे थांबवितो; पण तू किती दगड वाहसील?” भटोबास थोडे म्हणत. सर्वज्ञ अधिक म्हणत. शेवटी 22 दगड वाहण्याचे ठरले. मग भटोबासांनी दगड वाहण्यास सुरूवात केली दगड वाहता वाहता पोट दुखण्याचे थांबले. (उ. ली. 89, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: