श्रीचक्रधर मंदिराच्या पटीशाळेवरील स्थाने (डोमेग्राम)

श्रीचक्रधर मंदिराच्या पटीशाळेवरील स्थाने


येथील स्थाने 5 - नवीन बांधकामामुळे पटीशाळेचे अस्तित्व बदलल्यामुळे क्रमांक 18 चे स्थान राजमढ मध्ये येते, हे स्थान मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच दिसते.



स्वामींच्या वेळी राजमठा बाहेर उत्तर- दक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळा होती, आता ही तशीच पटीशाळा बांधण्यात आली आहे, पण तिच्या रुंदीत बदल झाल्याने 18 क्रमांकाचे स्थान राजमठाच्या हद्दीत येते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

18. नाथोबा शिक्षापण करणे स्थान :

हे स्थान उत्तर- दक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळेत, राजमढात प्रवेश करताना डाव्या बाजूस आहे.

लीळा : नाथोबांनी जेवण झाल्यावर झोळीत उरलेले भिक्षान्नाचे तुकडे सांडपाण्याच्या नालीमध्ये टाकून दिले. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आरोगणा, पहूड, उपहूड झाल्यावर लघुपरिश्रयासाठी या बाजूला आले. सोबत नाथोबा होते. नालीमध्ये भिक्षान्न सांडलेले पाहून सर्वज्ञांनी नाथोबांना विचारले, “हे भिक्षान्न कोणी सांडले?” नाथोबा म्हणाले, “मी जेवण झाल्यावर येथे झोळी झटकली.” तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “ज्यांच्याकडून तुम्ही भिक्षा मागून आणता, ते काय तुमचे वैरी आहेत? आपल्याला लागेल तेवढेच मागावे. आपले शीत मुंगीला देखील जाऊ देऊ नये. हे भिक्षेचे अन्न पवित्राचे पवित्र आहे. ही शीते वेचून घ्या.” मग नाथोबांनी शीते वेचून खाऊन टाकली. (उ.ली.219, स्था. पो.) नाथोबा शिक्षापण करणे स्थानाच्या पश्चिम बाजूस जो मोठा विशेष आहे, तो सिंहूनारायणाच्या देवळाचा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू चरणांकित उंबरा होय. त्या शेजारील विशेष छिन्नस्थळीचा आहे व त्यापेक्षा जो लहान विशेष आहे, तो श्रीदत्तात्रेयप्रभुंचा आहे आणि त्या खालील बैठकीचा दगड हा उंचमढाच्या छताचा नमस्कारी पाषाण आहे.


19. आसन स्थान :

हे स्थान प्रसन्नमढाच्या पूर्व बाजूस पटीशाळेत आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे प्रसन्नमढाची उत्तर-दक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळा होती.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना येथे कधी कधी आसन होत असे. (स्थान पोथी उ. प्रत) 2. दारवठ्याच्या पटीशाळेवर भिजलेली वस्त्रे बदलून कोरडी वस्त्रे परिधान केल्यावर सर्वज्ञांना येथे आसन झाले. मग पूजावसर झाला. भक्तजनांसहित आरोगणा झाली. गुळळा झाला. विडा झाला. (उत्तरार्ध लीळा 163, स्थान पोथी उ. प्रत)


20. महाद्वार स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस 17 फूट अंतरावर आहे. येथे राजमढ, उंचमढ व प्रसन्नमढ या तिन्ही मढांच्या आवाराचा मुख्य दरवाजा होता.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे चरणचारी उभे राहत असत. (स्थान पोथी)

2. भटोबासांना भिक्षान्नी अमृत निरूपणे. (उत्तरार्ध लीळा220)


21. दिशा अवलोकणे स्थान :

हे स्थान महाद्वार स्थानापासून दक्षिणेस 3 फूट 7 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणाला जाताना येथे उभे राहून दिशा अवलोकन करीत. त्यामुळे अमंगळरूप ज्या दिशा त्या मंगळरूप होत असत. (पाठसमुदायाची पोथी दुपारचा पूजावसर, स्थान पोथी)


22. बाळंतीणीची विचारपूस करणे स्थान :

हे स्थान महाद्वार स्थानापासून पूर्वेस 5 फूट 9 इंच अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे उत्तर-दक्षिण, पश्चिमाभिमुख पटीशाळा होती.

लीळा : 1. या ठिकाणी सर्वज्ञांनी, नाथोबांच्याकडून एका निराश्रित बाईचे बाळांतपण करवून घेतले. त्या बाईची विचारपूस करण्याकरिता सर्वज्ञ येथे येत असत. (उत्तरार्ध लीळा 169, स्थान पोथी) 2. एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणासाठी छिन्नपापाकडे गेले होते. त्या वेळी पाऊस आला. सर्वज्ञ भक्तजनांसहित पावसामध्येच मढाकडे येण्यास निघाले, मढात येईपर्यंत सर्वज्ञांची व भक्तजनांची वस्त्रे ओली चिंब झाली. मढात आल्यावर सर्वज्ञ येथे पटीशाळेत उभे राहिले. भटोबासांनी रेइनायकांच्या घरून सर्वांच्यासाठी कपडे आणले. मग सर्वज्ञांनी ओली वस्त्रे बदलून कोरडी वस्त्रे परिधान केली. (उत्तरार्ध लीळा 163, स्थान पोथी उ. प्रत)


श्रीचक्रधर मंदिराच्या पटीशाळेवरील स्थाने संपूर्ण.


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: