डोमेग्राम-बाजाठाण रस्त्यावरची स्थाने (डोमेग्राम)

डोमेग्राम-बाजाठाण रस्त्यावरची स्थाने


येथील 3 स्थाने - 2 स्थाने श्रीचक्रधर मंदिराच्या जवळच आहेत, आणि 1 स्थान बाजाठाण रोड पार नदीपात्रात आहे. 


स्थानाची माहिती :

27. साधा अनुवर्जित जाणे स्थान :

हे स्थान श्रीचक्रधर मंदिराच्या किंचित वायव्येस रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू संध्याकाळच्या वेळेस डोंबाइच्या देवळाच्या अंगणात बसलेले होते. साधा गंगेहून जेऊन आली. सर्वज्ञांना दंडवत केले. सर्वज्ञ साधाला म्हणाले, “तुम्ही बिढारा जा” साधा म्हणाली, “रस्त्याने जाताना मला अस्पष्ट आकृत्या दिसतात. त्याची मला भिती वाटते.” मग सर्वज्ञ येथपर्यंत साधाला पोचवीत आले. येथे उभे राहिले. साधा जाताना मागे पहायची, तेव्हा सर्वज्ञ येथेच उभे असलेले दिसायचे. गुंफेच्या दरवाजात प्रवेश केल्यावर मग सर्वज्ञ दिसेनासे झाले. (उत्तरार्ध लीळा 186)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


28. आसन स्थान :

हे स्थान साधा अनुवर्जित जाणे स्थानापासून वायव्येस 92 फूट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे डोंबाईचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : 1. भटोबासांच्याकडून साधाच्या पायातील काटा काढविणे.

2. तथा शास्त्रकथन निषेध (उ. ली. 188)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


29. भोजनता स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून उत्तरेस पाऊण फलांग अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रात खडकावर आहे.

लीळा : सर्वज्ञ सायंकाळच्या वेळेस भक्तजनांसहित येथे येत असत. त्यांच्या दृष्टीसमोर भक्तजनांची पंगत बसत असे. त्या वेळी त्यांना पश्चिमाभिमुख आसन होत असे. कदाचित बाइसा भिक्षेतील चांगले पदार्थ निवडून सर्वज्ञांना आरोगणा देत. (पाठसमुदायाची पोथी सायंकाळचा पूजावसर, स्थान पोथी)

येथून देवगाव स्थान क्रमांक 7, 6, 5 कडे जाता येते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: