Domegram (डोमेग्राम)

डोंबेग्राम, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील 78 स्थाने-
1. श्रीचक्रधर मंदिर - 26 स्थाने 
येथे एकाच ठीकाणी 3 मठ आहेत. राजमठ,उंचमठ व प्रसन्नमठ व पुढे अतिरिक्त पटीशाळा आहे.
{राजमठ (3 स्थाने), राजमठ पटीशाळा (3 स्थाने), रायांगण (7 स्थाने), उंचमढ (4 स्थाने), श्रीचक्रधर मंदिर पटीशाळा (5 स्थाने), प्रसन्नमठ (4 स्थाने)} = 26

2. डोमेग्राम-बाजाठाण रस्ता - 3 स्थाने.

3. रेइनायकांच्या आवार - 3 स्थाने. 

4. छिन्नस्थळीच्या पाय रस्त्यावरील गोदावरीचा दक्षिण काठ - 10 स्थाने.

5. छिन्नपाप गुंफा आणि गुंफेचा परिसर - 13 स्थाने.
{छिन्नपाप गुंफा (10 स्थाने), छिन्नपाप गुंफा परिसर (3 स्थाने)} = 13

6. सिंहनारायण मठ व परिसर - 13 स्थाने.
{सिंहनारायण मठ (4 स्थाने), सिंहनारायण मठ परिसर (9 स्थाने)} = 13

7. घाट छिन्नस्थळी व परिसर - 10 स्थाने.
{घाट छिन्नस्थळी (5 स्थाने), घाट छिन्नस्थळी परिसर, गोदावरी पात्र (5 स्थाने)} = 10

एकूण 78 स्थान - या परीसरातील सर्वच स्थानांवर लहान अथवा मोठी मंदीरे बांधन्यात आलेली आहेत.


जाण्याचा मार्ग :

डोंबेग्राम (कमालपूर) हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील भोकर गावापासून ईशान्येस 9 कि.मी. आहे. श्रीरामपूर ते भोकर 11 कि.मी. नेवासा ते भोकर 21 कि.मी. श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील टाकळीभान या गावापासून उत्तरेस 7 कि.मी. अंतरावर डोंबेग्राम आहे. डोंबेग्रामला जाण्यासाठी श्रीरामपूरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बाजाठाणच्या स्थानापासून दक्षिणेस डोंबेग्राम एक कि.मी. आहे. सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव ते डोंबेग्राम 7 कि. मी. आहे.


आणिकेही असती अन्यत्र अवस्थाने चरणी चरणांकीत केली जगजीवनें परी डोंबेग्रामासि येकें गुणे: उपमुं न येती ॥341॥ 
कोठे वस्ति कोठे आसन: कोठे आरोगण करी मूर्ति आनंदघन ते काइ प्रसंसावें स्थान: संबंधमानाचे ॥342॥
कोठे ज्ञानीये भगतेवीण: आत्माराम राज्य करी आपण परी ज्ञानप्रेमाचे कार्यकारण: वर्ते ना ॥343॥ 
कोठे वेधबोधाचें अनुसंधान : कोठे सामर्थ्य वीद्यादान कोठे ईश्वरी महीमान : जाणती ना ॥344॥ 
कोठे आनंदु कोठे स्तीती : कोठे प्रकाश कोठे सुखवस्ती ते आघवेचि वीसेख दीसती : एके डोंवेग्रामी ॥345॥

(मूर्ति-प्रकाश)

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दोन वेळा आणि उत्तरार्ध काळात चार वेळा, असे एकूण सहा वेळा डोंबेग्रामला आले. पूर्वार्धात दोन्ही वेळेस व उत्तरार्धात तिन्ही वेळेस त्यांचे राजमढामध्ये वास्तव्य होते. सहाव्या वेळेस सर्वज्ञ नेवरगावहून डोंबेग्रामला आले. त्या वेळी ते छिन्नपापला गुंफेमध्ये थांबले होते व तेथून लगेच परत सुरेगावला गेले.
सर्वज्ञांच्या डोंबेग्राम येथील पूर्वार्धातील व उत्तरार्धातील वास्तव्याने राजमढाबरोबरच उंचमढ, प्रसन्नमढ व डोंबेग्रामचा सर्व परिसर परम पवित्र झालेला आहे. त्यांची चरणांकित स्थाने आम्ही क्रमाने देत आहोत,
राजमढ, उंचमढ व प्रसन्नमढ या तिन्ही मढांवर भव्य मंदिर उभारलेले आहे. हे मंदिर गावाच्या वायव्य विभागी असून त्यास ‘श्रीचक्रधर’ मंदिर असे नाव आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा भव्य असून तो पूर्वाभिमुख आहे.


स्थानाची माहिती :


राजमढातील स्थाने


राजमढाच्या पटीशाळेवरील स्थाने


रायांगणातील स्थाने


उंचमढातील स्थाने


श्रीचक्रधर मंदिराच्या पटीशाळेवरील स्थाने


प्रसन्नमढातील स्थाने


डोमेग्राम-बाजाठाण रस्त्यावरची स्थाने


रेइनायकांच्या आवारातील स्थाने


गोदावरीच्या दक्षिण काठावरील स्थाने


छिन्नपाप गुंफा आणि गुंफेच्या परिसरातील स्थाने


छिन्नपाप गुंफेच्या आवारातील स्थाने


श्रीचक्रधर मंदिर (सिंहनारायण मठ)


(श्रीचक्रधर मंदिर) सिंहनारायण मठाच्या आवारातील स्थाने


घाट छिन्नस्थळी


घाट छिन्नस्थळी च्या आवारातील स्थाने


पूर्वार्धातील पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून वावीला गेले. व दुसऱ्या वेळेच्या सात दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून जामगावला गेले.
उत्तरार्धातील पहिल्या वेळेच्या सहा महिन्यांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून घुमनदेवला गेले. व दुसऱ्या वेळेच्या काही दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून नेवाशाला गेले. आणि तिसऱ्या वेळेच्या पंधरा दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून नेवरगावला गेले.


अनुपलब्ध स्थाने :

(1) कान्हूनायकांच्या आवारातील विहार स्थान (2) गरोदर बाईची विनंती स्वीकार स्थान (3) वेशीच्या ईशान्येच्या पिंपळाखालील आसन स्थान (4) दुसऱ्या पिंपळाजवळील आसन स्थान (5) गलमाच्या पिंपळाखालील आसन स्थान (6) डोंबाईच्या देवळाच्या अंगणाचा दक्षिण विभागी आसन स्थान (7) पटीशाळेखालील विभागी आसन स्थान (8) डोंबाईच्या देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान (9) देवळाच्या दक्षिण सिहाडेयाच्या जवळील पिंपळाखालील आसन स्थान (10) लिंबाच्या झाडाखालील आसन स्थान (11) यमलार्जुनाखालील आसन स्थान (12) संगमी खडकावर आसन स्थान (13) वडाखालील आसन स्थान (14) काटीतळी आसन स्थान (15) भैरवाचा देऊळी नासीसी आसन स्थान (16) दुसऱ्या वडाखालील आसन स्थान (17) डांगरेशा राहविणे स्थान (18) परिश्रय स्थान (19) कपाटी आसन स्थान (20) उंच टेके समस्थळ करवणे स्थान (21) भक्तजना धाववणे स्थान (22) पांढऱ्या खडकावर चरणचारी उभे राहणे स्थान (23) रामनाथा पश्चिमे ओती परिश्रय स्थान (24) रामनाथा मागा उदका विनियोग स्थान.


डोंबेग्रामची एकूण स्थाने : 102


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: