Domalgaon (डोमलगाव)

डोमलगाव, ता. अंबड, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान डोमलगाव गावाच्या आग्नेयेकडे गावाजवळच शेतात आहे.


जाण्याचा मार्ग :

डोमलगाव, पैठण-शहागड मार्गावरील डोमलगाव फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. पैठण ते डोमलगाव फाटा 35 कि.मी. शहागड ते डोमलगाव फाटा 6 कि.मी. साष्टीपिंपळगावहून आग्नेयेस डोमलगाव 4 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान डोमलगावच्या आग्नेयेस गावालगतच सौंदडीच्या झाडाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे काटेरी झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गांधारीहन डोमलगावला आले. त्यांना येथे आसन झाले. चरण क्षाळण गुळळा, विडा झाला. मग ते येथून साष्टीपिंपळगावला गेले. (पू.ली. 529, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


डोमलगाव चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 529
  • Domalgaon : डोंबुलां कांटियेतळीं आसन :।।:
  • तेथौनि गोसावी डोंबेलेयांसि बिजें केलें: डोंबलां गांवापूर्वे मार्गी कांटियेतळीं आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गुळळा विडा जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य (अवस्थान )होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य (अवस्थान) होते. पूढे स्वामी नंदापूर (नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी वरुण डोंबलगावला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: