Dhakephal-Ahermal (ढाकेफळ-अहेरमल)

अहेरमलची अपूर्व शोभा गिरी पर्वत शिखरी… कशी झडकली ध्वजा आकाशी ब्रह्मगिरि दूसरी…

ढाकेफळ, ता. घनसावंगी, जि. जालना


येथील 3 स्थाने 3 ठीकानी आहेत -
1. वसतीस्थान - येथील 1 स्थान - ढाकेफळ गावातच महानुभाव आश्रमाजवळच आहे.
2. मानीकदंडी आसनस्थान - येथील 1 स्थान - ढाकेफळ गावाच्या नैऋत्येकडे दीड कि.मी.अंतरावर, रोडच्या बाजुलाच शेतात लहान मंदीर आहे.
3. आसनस्थान - येथील 1 स्थान - ढाकेफळ गावाच्या पूर्वेकडे 2 कि.मी.अंतरावर, अहेरमल नावाच्या डोंगरावर मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

ढाकेफळ हे गाव, अंबड पाथ्री मार्गावरील घनसांगवी गावापासून किंचित ईशान्येस 7 कि.मी. आहे; अंबड ते घनसांगवी 25 कि.मी; जालना ते घनसांगवी गुरूपिंपरीमार्गे 50 कि.मी. व अंबडमार्गे 54 कि.मी; ढाकेफळ येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. घनसांगवीपर्यंत जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. रामसगावन तीर्थपुरी, घनसांगवी मार्गे ढाकेफळला जाण्यास मार्ग आहे. हे अंतर 29 कि.मी. आहे. रामसगावहून ईशान्येस ढाकेफळ पायमार्गे (खालापुरी, बोडखा बु; मच्छिंद्रचिंचोली मार्गे) 22 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान ढाकेफळ गावाच्या किचिंत ईशान्येस 2 कि.मी. अंतरावर अहिरमल नावाच्या डोंगरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात करडगावहून अहिरमलला आले. त्यांना येथे थोडा वेळा आसन झाले. मग ते येथून ढाकेफळला गेले. (पू.ली. 488, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वसती स्थान :

हे स्थान ढाकेफळ गावाच्या वायव्य विभागी महानुभाव मठाजवळ, विहिरीच्या काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अहिरमलहून ढाकेफळला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 489, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. माणिकदंडी आसन स्थान :

हे स्थान ढाकेफळ गावाच्या नैर्ऋत्येस 1 कि.मी. अंतरावर रामसगाव रस्त्याच्या पूर्व बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : ढाकेफळहून रामसगावला जाताना सर्वज्ञांना येथे आसन झाले. नाथोबा निर्गमनी बाइसाप्रति पडाळीए गाईचा दृष्टांत निरूपणे. (पू.ली. 490) (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


ढाकेफळ गावाच्या दक्षिण विभागी उत्तराभिमुख धाब्यातील स्थान निर्देशरहित आहे.


ढाकेफळची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 488
  • Dhakephal (Ahermal) : अहिरमल्ला बीजें करणें :॥:
  • गोसावी अहिरमल्ला बीजें केलेंः चौकीं नावेक उभे राहिलेः मग आसन जाले :॥:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने, येथील विसृत लीळा नाही…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा ढाकेफळ येथे वसतिस जान्यापूर्वी अहिरमल्ल टेकडीवर थांबले…)
  • Purvardha Charitra Lila – 489
  • Dhakephal (Ahermal) : ढाकेफळीं वसति :॥:
  • मग खालानी ढाकेफळीं वसति जाली :॥:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने, येथील विसृत लीळा नाही…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा ढाकेफळ येथे वसतिस थांबले…)
  • Purvardha Charitra Lila – 490
  • Dhakephal (Ahermal) : मार्गी मंडळीक निर्गमनी निरोधानुवादु :।।: / अनअनोज्ञात मंडळीका जाणें :।।:
  • तेथौनि गोसावी बिजें केलें: मार्गी माणीकदंडा आरुतें ऐसें नाथोबाये म्हणितलें: ‘‘बाइः घेया पोतें: मीं जाइनः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हे काइ रे नाथोः तू जासि कैसा? एथ बाबा एकलें: मीं एकलीः कैसा जासि?’’ तीं मागौतें तैसेचि म्हणितलें: मागौतें बाइसीं म्हणितलें: ‘बाबापासी कोण्हीचि माणुस नाहीं: कव्हणीं भक्तिजन जाउं देः मग जायेः’’ तें इतुकेया गेले आणि मागुतें म्हणितलें: ‘‘बाइः पोते घेयाः मीं जाइनः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘कैसा जासि नाथोः काइ जालें तुज? एथ बाबा एकलें: मीं एकलीः कैसा जासि?’’ मागुतें एतुकेया एका गेलेः आणि मागुतें म्हणितलें: ‘‘बाइः घेया पोतें: मीं जाइनः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः या नाथोतें काही म्हणिजे ना कां: हा जात असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बटिकु काइ म्हणत असे?’’ ‘बाबाः हा गावां जाइन म्हणत असें:’’ इतुकेया एका गेलेः आणि बोलेतिनाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कां गाः मंडळीकाः बाइसें म्हणतें असतिः तें कां करा ना?’’ तें उगेचि ठेलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘या जे उपनले असे तें नेलेंया आरुतें न पारुखेः बाइः महात्मेया निरोधु न किजें:’’ यावरि गोसावी धर्मदर्पहरण लीळा तथा पडाळीये गाइचां दृष्टांतु निरूपीलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पडाळी गाय बांधली असेः तियेवरि गळेः चरुं जाए तरि तोंडा चिखुल एः बुडीं पाये किवीं कोरीतिः पावो झाडी तरि मागिली डीळीसि लागेः झडें वारेनि पीटें: ऐसें देखौनि घरींचां गोसावी म्हणें: ‘बापुडी गा पिडीलीः’ म्हणौनि माळवधींचां खांबीं बांधेः खडु घालीः खडु चरेः पाणी पाजीः कांटाळा सांडीः मग रीगतेया निगतयाते देखौनि बुजें: तो म्हणें: ‘सोडूः एर्‍हवीं माळवधाचां खांबु पाडीलः’ म्हणौनि सोडीः तें मागोति जाउनी तयांतुचि रीगेः तैसें बाइः महात्मेयांसि जे उपनले असेः तें तयातें नेलेंयावांचैनि न सोडीः’’ मग तें मार्गी पोतें जाडी ठेउनि निगालेः मग बाइसीं पुडुवाटुवा घेतलाः पोंतें: जाडीः सागळ घेतलीः मग निगाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि (जालना) ला आले. स्वामींचे हिवरळि (जालना) ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास (अवस्थान) होते. पुढे ढाकेफळ येथे वसतिस थांबुन स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा रस्त्यात मानिकदंडा अलिकडची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: