Deurwada Kajali (देउरवाडा काजळी)

देऊरवाडा (काजळी) ता. चांदूरबाजार जि. अमरावती


देऊरवाडा (काजळी) येथील 3 स्थाने 2 ठीकाणी आहेत. 
देऊरवाडा येथील 1 स्थान (आमचेस्वामी व श्रीगोविंदप्रभुबाबा) देऊरवाडा गावाजवळील संगमाजवळा मंदीर आहे. तर 2 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) देऊरवाडा गावातच नरसिंह मंदीर आहे. मुर्ती संबंधाची आहे, याचे बाजुसच उतारावर 1 स्थान आहे. (आमच्या स्वामिंची व श्रीगोविंदप्रभुबाबांची येथे खूप लीळांची स्थाने काळौघात नष्ट झालेली आहेत.)


जाण्याचा मार्ग :

कुह्याहून ईशान्येस देऊरवाडा 8 कि.मी. आहे. हा पायमार्ग आहे. चांदूरबाजारहन माधान मार्गे देऊरवाड्याला जाण्यास सडक आहे. चांदूरबाजार ते देऊरवाडा 11 कि.मी. आहे. परतवाड्याहून (कोठारा, खरपी, करजगाव, शिरजगाव, कसबा मार्गे) देऊरवाड्याला जाण्यास सडक आहे. कुह्याहून शिरजगाव कसबा मार्गे देऊरवाड्याला जाता येते. देऊरवाडा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान आणि आसन स्थान :

हे स्थान देऊरवाडा गावाच्या पश्चिमेस पूर्णा व मेघा नदीच्या संगमाजवळ मेघा नदीच्या पश्चिम थडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे काजळेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. या स्थानास उभय अवतारांचा संबंध आहे.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू भडोचच्या राजवैभवाचा त्याग करून रिद्धपूरकडे जाताना देऊरवाड्याला आले. त्यांच्या सोबत हडपीया व सागळीया हे दोनच सेवक राहिले होते. त्यांचा येथे एक रात्र मुक्काम झाला. रात्री दोघे दोहीकडे आणि मध्यभागी सर्वज्ञ, असे झोपले होते. ते दोघे झोपेत असताना सर्वज्ञांनी सर्व अलंकारांचा त्याग करून एक वस्त्र नेसून व एक वस्त्र पांघरून रिद्धपूरकडे प्रयाण केले. (पू. ली. 20, स्था. पो.)

2. रामदरणा राजा सर्वज्ञांना अचलपूरला घेऊन जात होता. त्यावेळी सर्वज्ञांना येथे थोडा वेळ आसन झाले. (पू. ली. 75)

3) श्रीप्रभूचे प्रतिमठी अवस्थान असताना ते येथे विहरणासाठी ही येत असत. (स्था. पो. उ. प्र.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. श्रीप्रभु संबंधित नरसिंह मूर्ति :

देऊरवाडा गावाच्या नैर्ऋत्येस नरसिंहाच्या देवळात नरसिंहाची पश्चिमाभिमुख मूर्ति आहे. त्या मूर्तीशी श्रीगोविंदप्रभूनी खेळ केला. (गो. प्र. च. 112, स्था. पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. परिश्रय स्थान (श्रीप्रभू चरणांकित) :

हे स्थान नरसिंहाच्या देवळाच्या वायव्येस उतारावर आहे. (स्था. पो.) मारुतीच्या देवळाच्या ईशान्येचे गढीवरील स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1) दांडी खालाविणे तथा महाजना दर्शना देणे 2) पाणीवठा नगरनारी ओवाळणे 3) चौबारा आसन 4) प्रतिमठी अवस्थान 5) रिगता उजव्या हाताचे सोंडी स्थान 6) पूजा आरोगणा 7) मादने 8) विठ्ठलाच्या देवळातील विहरण 9) लिंगाच्या देवळातील विहरण 10) केशवमूर्तीशी खेळ करणे 11) मलीनाथाशी खेळ करणे 12) नरसिंह देवळाच्या उत्तर दरवाजाची पूर्व सोंडी 13) पश्चिम दरवाजाची उत्तर सोंडी 14) दक्षिण दरवाजाची पूर्व सोंडी 15) नरसिंहाच्या चौकी आसन 16) दशावतारांच्या प्रतिमांशी खेळ 17) स्वानबाइयाशी खेळ करणे 18) कुमारीआंत आरोगणा करणे 19) संन्यास मढाचा अगणी पातळी आरोगणा 20) माजीघरी आसन 21) कुमारी भानवसी साक पाक चाखणे 22) पटीशाळे क्रीडा करणे 23) नारायण मूर्तीशी खेळ करणे 24) वहारमूर्तीशी खेळ करणे 25) रिद्धपूरच्या महाजना भेटी 26) गोपाळमूर्तीशी खेळ करणे 27) नरसिंह देवळामागील परिश्रय 28) दामुर्ताचा आवारी चौकी आरोगणा 29) दामुर्ता पडिताळणे 30) वाधीका सिंहीकाशी खेळ करणे 31) पटीशाळेवरील दशावतारांच्या प्रतिमांशी खेळ करणे 32) घाटी आसन 33) संगमी स्नान करणे 34) द्वारक विहिरीशी खेळ करणे 35) व-हायावरी आसन 36) तेथील प्रतिमांशी खेळ करणे 37) कृतसौची सौच करणे 38) वाटे दक्षिणेचे परिश्रय 39) वडाखाली खेळ-क्रीडा करणे 40) उपडून पडवळी लावणे 41) रामदरणे याचा दुसी आमच्या सर्वज्ञांचे वसती स्थान 42) काजळेश्वराच्या वायव्येचे परिश्रय 43) दांडी खालाविणे तथा आसन 44) काजळी गावा पश्चिमे भटी आड पडणे.


निर्देशरहित स्थान : 1


देऊरवाड्याची एकूण स्थाने : 46


  • Purvardha Charitra Lila – 75
  • Deurwada : अळजपूरीं अवस्थान :।।: तथा विनतीस्वीकारें अळजपूरीं आवारीं अवस्थान :।।:
  • रामदरणेनि गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः अळजपूर निके असे जीः सुंदर आणि पूराणप्रसिध्दः तेथ तिनी गंगाः नवदुर्गा अकरा स्वयंभ स्थानें बरवी असतिः सिद्धसाधकांजोगे बरवें लाखारबनः बरवीं देउळें असतिः बरविया वनस्थळीया असतिः’’ ऐसें बहुती परि विशेषुनि म्हणितलें: ‘‘जी तें राऊळासिचि क्रीडा/कृडावया योग्यः तरि तेथ गोसावी बिजें करावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ पूर्वदृष्ट असेः’’ रामदरणेनि म्हणितलेः ‘‘तरि माझेया कुटुंबासि दरीसन देयावें जीः माझी माता गोसावियांचिया श्रीचरणां तुळसी वाइल जीः माझीए मातेसि इष्ट देयावें जीः जी जीः तेथ बिजें करावे जीः’’ गोसावी विनवणी स्वीकरिलीः तेणें वस्त्रें ओळगवीलीः अलंकार ओळगवीलेः गरूड घोडा गोसावियांलागी दिधलाः वेगळे दूस ओळगवीलेः हडपीः सागळीयाः चवरधरः भोइः मादुरीः सुआरः बडवाः वेंचकरः थोटेः मैळवटे ऐसें दाही सेवक दिधलेः गोसावी जैसे राज्यधर्म स्विकरावे तैसेचि स्विकरिलेः गोसावियांचा परिवारू गोसावियांसरिसा वेगळा चालें: मार्गी गरूडा घोडेयासि स्तीति होएः तेणें गति क्षाळेः उभे राहिलयावाचैनि सरेचिनाः मग गोसावी एकाधी शास्त्रीची कां राजकी गोष्टि सांघतिः जें उभे राहिलेयावाचैनि आइकोंचि न येः रामदरणा गोसावियांसि पुसेः गोसावी सांघेति तें साच होएः तवं घोडेयाची स्तीति भंगेः मग गोसावी साउमे बीजें करीतिः ऐसें पेणोवेणां बिजें केलें: खेडीं जानापेया वरिलीकडें पसिमीली पाळीं मेळीकार जालाः तेथ वस्ति जालीः तेथ गोसावियांसि मर्दना मादनें जालें: पूजा आरोगणा जालीः गुळळा जालाः कापूरें निबंधु विडा जालाः प्रभाते पालाणिलें: वाद्यंत्रें लागलीः गोसावी देउळवाडेयां पेणे केलें: काजळेस्वरामांगा उत्तरें मेळीकार जालाः मर्दनामादनेः पूजावसरः आरोगणाः गुळळाः विडाः पहूडः उपहूड जालाः मग काजळेस्वरां बिजें केलें: तेथ चैकीं आसन जालें: रामदरणेनि अळजपूरा लिखिते पाठविलीः जें ‘अवघें नगर श्रृंगारावें: अवघी आइत करावीः’ सर्व मोहोत्सावो आरंभिलेः अळजपूर श्रृंगारविलें: एरी दिसी गोसावी अळजपूरासि बिजें केलें: गोसावियांसि नगराआंत बिजें करावया मुहुर्त नाहीः जव मुहुर्त निगे तवं नगरापूर्वे बनांत अष्टमहासिद्धी त्रीरात्री अवस्थान जालें: रामदरणेनि गावांत निरोप पाठविलाः घरोघरी सडासंमार्जनेः चैकरंगमाळीकाः गुढीयाः तोरणें: मखरें उभिलीः चळदृपा पताकाः चांदोये वितानेः राजबीदी उदकें सिंचीलियाः मंगळवाद्ये लाविलीं: मुहुर्ताची वेळ जालीः गोसावी दांडियेवरि आरोहण जालें: वाद्यंत्रे लागलीः मग अंबीकापूरा बीजें केलें: तेथ नावेक आसन जालें: तेथ गावीचा लोकु साउमा आलाः मग मानियेः मंडळीकः प्रधानः महाजनः आणि पूरजनः ऐसें आपुलेनि वर्गेसं बहुतें बडिवारें अंबीकापूरासि आलेः तेथ भेटि जालीः जे येति ते श्रीचरणावरि माथे ठेवीतिः घोडीं: लुगडीं: श्रेष्ठ अलंकारः उत्तमें पक्षीकुळें: अरण्याआंतुलें चतुष्पदें: ऐसें जयातें जें जें अपूर्व फळें पुष्पें आदिकरौनि ते तें समर्पीतीः रामदरणे म्हणतिः ‘‘गोसावियांसि ओळगवाः’’ आणि तें ओळगवीतिः ऐसिया परि यथावीधि गोसावी अंगिकरीलीयाः मग एकी त्यागा देतिः एकी ठेवीतिः एकी जयाचा तयासिचि देतिः एकांसि आपुलें दिधलें पाहिजे तरि तैसें करीतिः तें देखौनि रामदरणां म्हणितलें: ‘‘पूराणांतरीं आइकतों: वर्तमानी तरि महाराजांचा ठाइं न देखों: परि हें अंगिकरीति राजलीळेची परि क्वचित नास्तिः’’ ऐसें बहुत चमत्करलेः मग अवघेयांसि गंधाक्षता केलियाः वीडे देउनि पाठविलेः मग गोसावी निगालें: तें लोक मागां गोसावियांचिया अपूर्वा कथा करीतिः अनेकें परिं विशेषीतिः ‘‘हां होः तुम्हीं ऐसें कैं देखिलें:’’ आणिक म्हणतिः ‘‘आहों हें स्वप्न जालें:’’ ऐसें पूरजनासीं दरीसन देउनि संतोखातें पावविलें: गोसावी नगरांतु प्रवेसलें: तेथ नगरीचिया स्त्रिया ओवाळू आलीयाः गोसावियांसि दरीसन जालें: जे भेटि तियें गोसावियांसि ओळगवीः गोसावी जेथची तेथ देतिः मग रामदरणा घोडेयावरि बैसलाः मां गोसावियांपुढां राउताइची आंगे दाखवीः घोडा दाखवीः गोसावियांपुढां राउतः पाइकः गोसावी नगरांत उभिया हाटवटीया बिजें केलें: मग नगरबाइला ताटें घेउनि वोवांळुं आलीयाः जयांसि बाहीरि निर्गमन नाहीं तिहीं माडयाउपरियावरूनि तवंगावरूनि निरार्जिलेः ओवाळणी करौनि पाने पुष्पें फळें वस्त्रे ओवाळुनि टाकीतिः सेवक आणि मागते अभर जालें: ऐसा अवघीयां स्त्रीजनासि दरीसन देउनि परम संतोखातें पावविलीयाः रामदरणेयासि भेटी ये तें रामदरणा गोसावियांसि ओळगवीः गोसावी इकडीलाची भेटि इकडीलासि देतिः कदाचित जेथची तेथ देतिः कव्हणी म्हणें ‘हे रामदरणाचे गुरुः’ कव्हणी म्हणे ‘हे रामदरणाचे जावांइः रामदरणेयाते लेकी वाढत असे हें जावाइ करावेया आणिले असतिः’ गोसावियांपुढां भाट सासले पवाडे पढतिः वाद्यंत्राचा एक नाद जालाः मग गोसावी राऊळगणाचा दारवंठां पावलें: तेथ गाणें भाटें बहुरूपीः कळावंतें: किंभवनोक्त जेतुकीही कळापात्रें: तियें तेथ राहाविलीः आणिकही उपाधीक ओळगणे तेही राहाविलेः मग गोसावी आणि राजाआंगलगेंसि राऊळगणांतु प्रवेसलें: राऊळगणाचिये सभेसि बैसका जालीः तेथ माता मुख्यकरौनि रानवसाः समस्त संबंधीकः कणकाचा परीयेळीं रत्णाचा दीपीः अन्येका पुष्प जातिः फळ जातिः अनेक उत्तम वस्त्रें ऐसा पूजावीधि केलाः ऐसा तो अनुपम्य मंगळकाळु जालाः मग गोसावियांसि सभामंडपीं शेष भरीलीः तेथ रामदरणेयाचीया राणीया ओवाळावेया आलीयाः माता आलीः श्रीचरणां तुळसी वाइलीः तेहीं तैंलागौनि तोचि नेम घेतलाः मग मर्दनामादनें पूजा आरोगणा जालीः मग गोसावियांसि रामदरणेयाचीये देव्हारचैकीये दुर्गात अवस्थान जालें: मास दहाः गोसावी तेथ राज्यधर्म स्वीकरिलें: धानुबाइचा आवारू आणि रामदरणेयांचा एकुचि आवारूः दुर्गांत दुसरा आवारी रामदरणांची दुसरी राणी होतीः तेथ गोसावी बिजें करीतिः गोसावियांसि मर्दनामादने होएः आरोगणा होए :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)
  • Govind Prabhu Charitra Lila – 112
  • Deurwada : नरसीहासि खेळु:॥
  • एकु दी गोसावी नरसींहापासि बीजें केलें: मग भीकरें स्पीलें : मग नरसींहाचा तोंडी आंगुळीया सुति : मग म्हणेति : “आवो खाइल म्हणे : न खाये म्हणे : आवो हाँसैल: न हाँसे म्हणे : आवो बोलइ(ल)ल म्हणे : न बोले म्हणे :” ऐसा गोसावी नाएक खेळु केला : मग बीजें केलें ॥११२॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: