Deogaon (देवगाव)

देवगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथे 7 स्थाने आहेत - १.हे स्थान देइगांव गावाच्या दक्षिनेकडे गोदावरी नदीच्या काठावर महादेव मंदीरातील चौक म्हणजे हे स्थान होय. २.दुसरे स्थान देइगांव गावाच्या दक्षिनेकडे गढीवर आहे. ३.तीसरे स्थान देइगांव गावाच्या पश्चिमेकडे रस्त्यालगतच आहे.............


जाण्याचा मार्ग :

डोमेग्रामहून ईशान्येस देवगाव दोन कि.मी. आहे, व पायमार्गे दीड कि.मी. आहे. छिन्नस्थळी पासून देवगाव जवळ आहे.


स्थानाची माहिती :

1. विहरण स्थान :

हे स्थान देवगावच्या नैर्ऋत्य विभागी गावालगतच श्रीपती पाटील मेघळे यांच्या खळ्याजवळ दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे डोमेग्राम येथे वास्तव्य असताना ते येथे विहरणासाठी येत असत. त्यावेळी त्यांना या ठिकाणी आसन होत असे. (स्था. पो. उ. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. भिडी आसन स्थान :

हे स्थान देवगावच्या दक्षिण विभागी मराठी शाळेच्या उत्तरेस गढीवर पूर्वाभिमुख मढाच्या उत्तर बाजूस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे हे विहरण स्थान होय. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. देवळाच्या चौकातील आसन स्थान :

हे स्थान मराठी शाळेच्या आग्नेयेस गोदावरी नदीच्या उत्तर काठी महादेवाच्या पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे.

लीळा : डोंबेग्रामी अवस्थान असताना एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणासाठी देवगावला आले. सोबत आऊसा मुख्यकरून सर्व भक्तजन होते. या देवळाच्या चौकात सर्वज्ञांना आसन झाले. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले. ज्या वेळी या देवळाचे उद्यापन झाले. त्यावेळी आम्ही येथे पत्रावळी टाकून जेवण केले होते. (उ.ली. 211, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. पंचगंगा नामकरण स्थान :

हे स्थान देवद्रोणी, देवतापूजा स्वीकार स्थानाच्या वायव्येस अर्धा फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी देवगाव रस्त्याच्या कडेला दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : देवगावचा एक ब्राह्मण, त्याच्या पाचीही मुली विधवा होत्या; म्हणून सर्व लोक त्याला पंचरांडा आला, पंचरांडा गेला असे म्हणत. त्यामुळे तो ब्राह्मण फार दु:खी होत असे. एके दिवशी या देवळाच्या चौकात सर्वज्ञांना आसन असताना तो ब्राह्मण सर्वज्ञांच्या दर्शनाला आला. सर्वज्ञ म्हणाले, “भटो तुमचिया पंचगंगा निकेनि असति?” हे शब्द ऐकताच ब्राह्मण म्हणाला, “जी जी निवालो. असे आजपर्यंत मला कुणीच म्हणत नव्हते. पंचरांडा या शब्दानेच सर्वजण मला संबोधित असत.” मग त्याने सर्वज्ञांना दंडवत घातले. थोडा वेळ सर्वज्ञांच्याजवळ होते. नंतर गेले. (उ.ली. 107, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. देवगावीचा ढग, विहरण स्थान :

हे स्थान पंचगंगा नामकरण स्थानापासून पश्चिमेस दीड फर्लाग अंतरावर उंच कपारी लगत नदीच्या पात्रात देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू ढगाकडे विहरणासाठी आले असता, त्यांना येथे आसन होत असे. (पाठसमुदायाची पोथी, दुपारचा पूजावसर, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. देवगावीची भोजनता स्थान :

हे स्थान देवगावीचा ढग, विहरण स्थानापासून पश्चिमेस 30 फूट अंतरावर देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथेही भक्तजनांसहित आरोगणा करीत असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. साधा जळक्रीडे बोलविणे प्रसंगीचे आसन स्थान :

हे स्थान देवगावीची भोजनता स्थानापासून वायव्येस अर्धा फाग अंतरावर देवळात आहे.

लीळा : साधाला जळक्रीडा खेळण्यास बोलविणे प्रसंगी सर्वज्ञांना येथे आसन होते. (उ. ली. 179, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) महालक्ष्मीचा देऊळी आसन स्थान.

(2) गणेशाचा देऊळी आसन स्थान.

(3) एकवीरेचा देऊळी आसन स्थान.

(4) सिवाळेयाचा चौकी आसन स्थान.

(5) सिवाळेया उत्तरे लिंगाचा देऊळी आसन स्थान.

(6) जोल्हानारायणाचा मढी आसन स्थान.

(7) जोल्हानारायणाच्या मढाच्या पटीशाळेवरील आसन स्थान.

(8) खिडकीए आसन स्थान.

(9) नाथोकोरोचा आवारी माळवधी आसन स्थान.

(10) दुसरा माळवधी आसन स्थान.

(11) उसीनेश्वराचा देऊळी आसन स्थान.

(12) पटीशाळेपूर्वील सीरा आसन स्थान.

(13) आऊसा शिक्षापण स्थान.

(14) देवगावचा उत्तराभिमुख दारवठा देवतेच्या उजव्या भूजेसी आसन स्थान.


देवगावची एकूण स्थाने : 21


  • Purvardha Charitra Lila –
  • Devgaon : देइगावीं सिवाळेया गमनी आउ डांकुली निराकरणें :।।: / देइगांवी देउळ उद्यापनीं पातळीं आरोगण :।।:
  • एकु दीं उदेयाचां पूजावसर जालेंयानंतरें गोसावी विहरणा देइगावां बिजें केलें: सरिसी आउसें मुख्यकरौनि भक्तिजनें अवघीचि असतिः देउळीं चौकीं आसन जालें: गोसावी आउसां मुख्य भक्तिजनापुढें सांघितलें: ‘‘या देउळा जै उद्यापन जालें तें हें एथ पातळी घालौनि जेविलें:’’ आउसीं म्हणितलें: ‘‘हां जीः स्वामी जगन्नाथाः’’ गोसावियांचें प्रत्यया न येचिः म्हणौनि आउसीं गुरुवातें पुसिलें: ‘‘है रेः या देउळा केतियें सें वरूषें जालीं:’’ गुरुवें म्हणितलें: ‘‘आइ स्यें तीनिः’’ मग गोसावी तेथौनि बिजें केलें: वेसीदारीं माणुसें होतीं: आउसें तेयांपासी गेलीं: तीनिसे गुरुवे सांघितलीः दोनसे आउसीं आपुली घातलीं: तेयांपुढें सांघों लागलीं: ‘‘आरे हा पाचांसं वरुषांचां तथा सातांसं वरुषांचां पुरुष आला असे रेः’’ ऐसें हरीखें म्हणत नैरूत्य कोणटांवेर्‍हीं आलीं: तेथ गोसावी उभे राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें न म्हणिजे की नायकाः लोकु डांकुली वाये तरि तुम्हा अवीधि होएः’’ आउसीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः स्वामी जगन्नाथाः आजीलागौनि न म्हणेः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलीः मग उगीची राहिलीं: मग गोसावी मढासि बिजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि डोमेग्राम येथुन देइगावला विहरणा साठी आले. येथे स्वामींचे सिवालयाच्या देउळार चौकीं आसन आसन जालें…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: