Dabhadi (दाभाडी)

दाभाडी, ता. बदनापुर, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान दाभाडी गावातच बाजारओळीतिल मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

दाभाडी हे गाव, राजूर-फुलंब्री सडकेवर राजूरहून नैर्ऋत्येस 15 कि.मी. आहे व फुलंब्रीहन पूर्वेस 37 कि.मी. आहे. राजूर हे गाव, जालना-सिल्लोड सडकेवर आहे व फुलंब्री हे गाव, औरंगाबाद-जळगाव सडकेवर आहे. काजळा ते दाभाडी (जालना,राजूर मार्गे) 58 कि.मी. दाभाडीला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान दाभाडी गावाच्या दक्षिणेस बाजारगल्लीजवळ लहान ओढ्याच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात निल्लोडहून दाभाडीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 457, स्था.पो) दुसऱ्या दिवशी ते येथून जालन्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वसती स्थान :

वसती स्थानाच्या नैर्ऋत्येस शेतात एक स्थान आहे. एका वासनेप्रमाणे तेथे सोमनाथाचे देऊळ होते. त्या देवळात वसती झाली.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान


दाभाडीची स्थाने: 1


  • Purvardha Charitra Lila – 457
  • Dabhadi : दाभाडिये वस्ति :।।:
  • दाभाडिये वस्ति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने… येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)कडे निघाले तेव्हा दाभाडि येथे वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: