Chichondi (Patil) (चिंचोडी-पाटील)

चिचोंडी (पाटील), ता. जि. अहमदनगर


चिचोंडी(पाटील) गांवाच्या पश्चीमेकडे मुस्लीम गल्लित मंदीरात मुख्य स्थाना सहीत 5 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

चिचोंडी हे गाव, अहमदनगर बीड मार्गावर नगरहून आग्नेयेस 20 कि. मी, व आष्टीहून वायव्येस 40 कि. मी. आहे. चिचोंडीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. केळीपिंपळगावहून दक्षिणेस चिचोंडी (केळ, दौलावडगाव मार्गे) 9 कि. मी. आहे. हा मार्ग जीप व पायी जाण्यासाठी आहे. केळीपिंपळगावहून चिचोंडी (नगर मार्गे) 44 कि. मी. आहे. चिचोंडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान चिचोंडी गावाच्या पश्चिम विभागी मुस्लीम गल्लीत पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. हे देऊळ महानुभाव मंदिर तथा श्रीकृष्ण मंदिर या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात केळीपिंपळगावहून चिचोंडीला आले. त्यांचे या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य होते. (उ. ली. 266, स्था. पो.) पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर ते येथून । मठपिंपरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. परिश्रय स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून नैर्ऋत्येस 17 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस 20 फूट अंतरावर आहे. (वि. स्था. पो. क्र. 1137, 1625)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. आडदांडीवरील स्थान :

हे स्थान अवस्थान मंदिराच्या पूर्वेस 29 फूट अंतरावर दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : पूर्वी देवळाच्या आवाराचा दरवाजा या ठिकाणी होता आणि त्या दरवाजाला आडदांडी होती. बडव्याच्या घरी गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. आडदांडीवर लोंबता श्रीचरणी आसन झाले. साधा भिक्षेहून आली. तिने सर्वज्ञांना दंडवत घातले. सर्वज्ञांच्या भाळप्रदेशी जोंधळ्याचा टिळा लावलेला पाहून तिने विचारले, ”हा जोंधळ्याचा टिळा कुणी लावला?” सर्वज्ञ म्हणाले, “बडव्याच्या येथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम झाला. शेतात पुष्कळ ज्वारी पिकावी म्हणून त्याने दहीमिश्रीत जोंधळ्याचा टिळा लावला आहे.”(उ. ली. 265, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. दहीमिश्रीत जोंधळ्याचा टिळा लावणे स्थान :

हे स्थान देवळापासून आग्नेयेस एक फलांग अंतरावर ब्राह्मण मोहल्ल्यात उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बडव्याचे घर होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू केळीपिंपळगावहून चिचोंडीला आल्यावर प्रथम बडव्याच्या घरी आले. तेथे गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता. घराच्या दरवाजाला आडदांडी होती. त्या आडदांडीवर सर्वज्ञांना आसन झाले. मग बडव्याने दहीमिश्रीत जोंधळ्याच्या अक्षता लावून सर्वज्ञांची पूजा केली. (उ. ली. 265, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


चिचोंडीची एकूण स्थाने : 5


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: