चतुर्विध मढ वेरुळ

चतुर्विध मढ


चतुर्विध मढ वेरूळ गावाच्या उत्तरेस होता' पण  काळाच्या ओघात अस्तित्व राहिले नाही. त्यामुळे तेथील स्थाने आज उपलब्ध नाहीत.


चतुर्विध मढ वेरूळ गावाच्या उत्तरेस होता’ पण काळाच्या ओघात अस्तित्व राहिले नाही. त्यामुळे तेथील स्थाने आज उपलब्ध नाहीत. त्याचे अवशेष पाहून हे निश्चित होते कि हे चतुर्विध मढ असावा. सध्या ही जागा वेरूळ येथील अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड (सेवाळे तळे) च्या उत्तरेस गट नं. ५८९ या वैय्यक्तिक शेतात असलेल्या या जागेबद्दल निश्चिती असली तरि शेत मालक ही जागा महानुभावांना दान अथवा विकत सुद्धा देन्यास तयार नाही.

चतुर्विध मढाच्या अवशेष शेताकडे जाण्यास रस्ता अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड (सेवाळे तळे) च्या पश्चिमेकडून आहे.

सेवाळे तळे ते चतुर्विध मढाच्या अवशेष शेत 350 मीटर

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दोन वेळा वेरूळला आले. पहिल्या वेळेस ते गदान्याहून वेरूळला आले. त्यावेळी त्यांचे वेरूळ येथे एकूण 10 महिने वास्तव्य होते. त्यापैकी चतुर्विधाच्या मढात 9 महिने 24 दिवस वास्तव्य होते. दुसऱ्या वेळेस सर्वज्ञ फुलशिवऱ्याहून वेरूळला आले. त्यावेळी त्यांचे चतुर्विधाच्या मढात 15 दिवस वास्तव्य होते.

अनुपलब्ध स्थानांची माहिती :

(1) चतुर्विधाच्या मढाचा अंगणी चरणचारी उभे राहणे

(2) मढातील अवस्थान

(3) मढाच्या पटीशाळेवरील रिंगता डाव्या हाताचे ओट्यावरील दुपारच्या पहूडाचे स्थान

(4) मढाच्या पटीशाळेवरील । निरूपण करणे स्थान

(5) रिगता उजव्या हाताच्या सोंडीवर पाणीभात आरोगणे

(6) दुसऱ्या सोंडीवरील आसन

(7) मढाच्या अंगणातील मादने

(8)पटीशाळेवरील वेढे करणे

(9) उत्तर बाजूच्या मढाच्या पटीशाळेच्या दक्षिण सिहाडा आसन

(10) मढाच्या पटीशाळेवरील वेढे स्थान

(11) मढातील विहरण

(12) मढाच्या संदीतील द्रीढपुरूष नामकरण स्थान

(13) मढाच्या ईशान्येच्या लिंगाचा देऊळी आसन

(14) मढाच्या पश्चिमेचे परिश्रय

(15) विहिरी पश्चिमे रवणीएवरी आसन

(16) शांतबाइसाशी बोरीबाभूळ शिंपण्याचा विधी निरूपणे

(17) चांगदेवभटा निरूपण करणे

(18) मढाच्या मागचे लघुपरिश्रय


चतुर्विध मढ चे स्थान : 18


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: