Chasnali (चास नळी)

चास (नळी), ता. कोपरगाव, जि. अहमदनगर


येथे 3 स्थाने आहेत -
1. चास गावाच्या इशान्येकडे गोदावरी नदीच्या पात्रात पूलाच्या पश्चिमेकडे हे स्थान आहे.
2. दुसरे स्थान चास गावाच्या पूर्वेकडे गोदावरी नदीच्या काठावर माणिकेश्वराच्या मंदीरातील चौक म्हणजे हे स्थान होय.
3. तीसरे स्थान मंदीराच्या बाजुलाच आहे.


जाण्याचा मार्ग :

चास (नळी) हे गाव, विंचूर – सावळे विहीर मार्गावर विंचूरहून 24 कि.मी. आहे व कोळपेवाडीहून 10 कि.मी. आहे. कानळसहून चास (कानळस फाटा मार्गे) 6 कि.मी. आहे. कानळसहून पूर्वेस चास पायमार्गे 3 कि.मी. आहे. चासला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. चासी, आसन स्थान :

हे स्थान चास गावाच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या पात्रात पुलाच्या पश्चिमेस चासाच्या दक्षिण काठावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कानळसहून चासला आले. त्यांना प्रथम चासापाशी थोडा वेळ आसन झाले. मग त्यांनी चासाचे अवलोकन केले. डखले नावाच्या भक्ताने सर्वज्ञांना विचारले, “जी जी हे चास येथे कसे काय निर्माण झाले?” तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “हे बळिभद्राचे चास, येथे गंगा कोरडी होती, म्हणून त्याने येथे नांगर घातला. तेव्हापासून गंगा वाहू लागली.” (पू. ली. 277, ख. प्र. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आसन स्थान :

हे स्थान चास गावाच्या पूर्वेस एक फलांग अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण थडीवर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे माणिकेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : चासापाशी थोडा वेळ आसन झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. (पू. ली. 273, स्था. पो.)

आसन स्थान देवळाच्या नैर्ऋत्येचे मांडलिक स्थान आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. वसती स्थान :

हे स्थान आसन स्थान देवळाच्या आग्नेयेस लिंगाच्या उत्तराभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पृ. ली. 273, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सुरेगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. जगतीच्या आग्नेयेचे परिश्रय स्थान


चासची स्थान एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 273
  • Chas (Nali) : माणिकश्वरीं लिंगाचा देउळी वसतिः चासीं आसन :॥:
  • गोसावी चासासि बीजे केलेः चास अवलोकिलेंः तेथ चासीं आसन जालेः मग माणिकश्वरा बीजे केलेः तेथ चौकी आसन जालेः माणिकश्वरीं जगतीआंतु लिंगाचा देउळी वसति जाली :॥:
  • (.. येथे हे पहील्यांदा येने. स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-कांदळदवरुण आले व सुरेगांवकडे निघले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: