Charner (चारनेर)

चारनेर, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान चारनेर गावाच्या पश्चिमेकडे गावातच मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

चारनेर हे गाव, सिल्लोड घाटनांद्रा मार्गावर सिल्लोडहून वायव्येस 27 कि.मी. आहे. व घाटनांद्र्याहून आग्नेयेस 4 कि.मी. आहे. चारनेरला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान चारनेर गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात आन्व्याहून चारनेरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 220 तु.प्र.स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून करंजखेडला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळाबाहेरील दरवाजाच्या दक्षिण बाजूचे स्थान निर्देशरहित आहे.


व गावापासून पश्चिमेस एक फर्लाग अंतरावरील महादेवाच्या देवळाजवळचे स्थान सुद्धा निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) देवळाच्या अंगणातील पिंपळाच्या झाडाखालील आसन स्थान.

(2) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

(3) चारनेर मार्गीचे आसन स्थान.


मार्गीचे स्थान मिळून चारनेरची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –
  • Charner : चारनेरीं वसति :॥:
  • मग गोसावी चारनेरा बीजें केलेंः गावांतु आग्नेय कोनी पूर्वाभिमुख लिंगाचे देउळः तेथ वसति जाली :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने…स्वामींच्या आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर करंजखेडकडे जाताना चारनेर येथे स्वामी वसतिस थांबले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Charner : चारनेरिं मार्तंडा रोगनासा उपाये कथन :।।: / मार्तंडा रोगनाशोपायभंगें शिक्षापण :।।:
  • गोसावी जेव्हळी बिजें केलें तेव्हेळीसीचि देउळाचां आंगणीं उत्तरें पींपळुः तेथ गोसावियांसि आसन जालें: बाइसें गोसावियांतें अखंड विनवीतिः ‘‘अवघेयांसि बाबा काही करीतिः परि या मार्तंडासि काहीचि न करीतिः’’ ऐसें तियें अखंड खोदितेंचि असतिः तैसेचि मार्तंडही अखंड म्हणितेचि असतिः तियें दिसीं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मार्तंडा गावांतु जाः भिक्षा करौनि याः एथ अठरा घांस भिक्षान्न संपादाः तुमचे अठरा रोग धाडिजतिः ए पींपळीं बांधीजतिः’’ तेहीं ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलेः मग आपुलेंनि श्रीकरें गोसावी झोळीयेसि गांठी दिधलीयाः श्रीकरें झोळी दिधलीः ते गावांतु गेलेः तें आपुलीये मामीचेया घरा गेलेः तिहीं पाय धुतलेः उटिलेः न्हाणिलेः उन्हतीन्ह रांधिलें आणि जेउं सुदलें: मग निजैलेः भिक्षा अवसरीं उठिलेः ‘‘मामीः तुमतें काही भातु असे?’’ तिया म्हणितलें: ‘‘हा असेः’’ मार्तंडे म्हणितलें: ‘‘तरि घेउनि याः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘मार्तंडारू भातु काइं कराल?’’ मार्तंडे म्हणितलें: ‘‘तुम्हां काइ तेणें? आणा पां:’’ तेही म्हणितलें: ‘‘ना मार्तंडाः सांगा ना काः काइ गोसावी बिजें केलें असे?’’ मार्तंडे म्हणितलें: ‘‘ना होएः’’ तेही म्हणितलें: ‘‘कटकट भास्कराः सकाळी सांघतेति कां: तरि मीं गोसावियांकारणें उपहार निफजवितियेः’’ मार्तंडे म्हणितलें: ‘‘ना तैसें आमचीयां गोसावियांपासी काही न लगेः तुम्ही भातु आणाः’’ मग तेहीं भातु रांधिलाः झोळी भरीलीः गोसावियांपासी घेउनि आलेः गोसावियांसि दृष्टीपूत झोळी केलीः तवं गोसावी श्रीकरीं घेउनि अवलोकिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मार्तंडाः हें अन्न एकी घरीचें ऐसें दिसत असेः भातु एकेचि घरीचा?’’ मार्तंडे म्हणितलें: ‘‘ना जीः गावीं एकचि पेव काढिलें: सारिखेचि जोन्हळें: अवघेया गावांतु अवघा घरीं सारिखाचि भातुः’’ त्याउपरि बाइसीं म्हणितलें: ‘‘काइ बाबाः एथ काइ याची मायबाहिणी असे? मां तें घालीलः बापुडे उदास भिक्षा करौनि आलेः’’ गोसावी उगेचि राहिलेः तवं तियें मागिलीएकडौनि ताकः मीठः भाजीः ऐसें घेउनि आलीः गोसावियांसि दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलीः बैसलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः अपार अन्न धाडिलेः तुमचा भातु निके वेळे पातलाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी काइसा भातु? मार्तंडु सांगेचि नाः’’ म्हणौनि मागील अवघे सांघितलेः गोसावी बाइसांची वास पाहिलीः बाइसें उगीचिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ऐसा असे मूर्ख तुमचा मार्तंडुः’’ बाइसीं घागरा बांधलाः ‘‘पोरा तुजकारणें मियां बाबातें उरोधिलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ यांसि कां कोपतें असाः याचे रोग न वचावे असतिः तें कां जाति? आवेयाचें दिवेया कां येइल? प्राणियां आपुले हिताहित नेणें: स्वार्थार्थ मीं करीन ऐसेहीं न करीचिः मार्तंडाः एथौनि म्हणितलें तें करितेति तरि तुमचे रोग धाडिजतेः इतुलेही आपुलें हिताहित नेणाः तरि ऐसें कां होइल? पसेयाचें पाइलीये कां येइल? खांडियेचें उंडिये कां येइल?’’ ऐसें गोसावी शिक्षापिलें: आणि मागौते म्हणितलें: ‘‘मार्तंडा आझुइ तर्‍ही जाः भिक्षा घेउनि याः’’ परि तें खालुती मान घालुनि उगेचि राहिलेः मग गोसावियांसि तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने…स्वामींच्या आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर करंजखेडकडे जाताना चारनेर येथे स्वामी वसतिस थांबले. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: