Chapadgaon (चापडगाव)

चापडगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - हे स्थान चापडगांव गावाच्या पूर्वेकडे 1 कि. मी. अंतरावर काटपाडी नदीच्या काठावर महादेव मंदीरापुढे आहे.


जाण्याचा मार्ग :

चापडगाव, शेवगाव-गेवराई मार्गावर शेवगावहून पूर्वेस 15 कि. मी. आहे व गेवराईहून वायव्येस 49 कि. मी. आहे. नेवासा ते चापडगाव 55 कि. मी. चापडगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उबलब्ध आहे. वरखेडहून कुकाणा शेवगावमार्गे चापडगावला जाता येते.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान चापडगावच्या पूर्वेस अर्धा फर्लाग अंतरावर काटपाडी नदीच्या पश्चिम काठी श्री. शंकर हडके यांच्या शेतात सिद्धनाथाच्या (महादेवाच्या) पश्चिमाभिमुख देवळापुढे उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात घोटणहून चापडगावला आले. त्या वेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते (पू.ली. 306 ख प्रत) व उत्तरार्ध काळातही घोटणहूनच चापडगावला आले. त्या वेळीही त्यांचे येथे एकच रात्र वास्तव्य होते. उत्तरार्धात येथे आउसांची व हंसराजांची भेट झाली. रात्री आरोगणा झाली. (उ.ली. 423 ख प्रत, स्था. पो.)
पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ येथून बोरीपिंपळ गावला गेले व उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून लाडजळगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.


चापडगावची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: