Chandegaon (चांदेगाव)

चांदेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 2 स्थान - हे स्थान चांदेगांव गावाच्या पश्चिमेकडे मंदीरात आहे. चांदेगांव गावात चौकशी करून जावे लागते.


जाण्याचा मार्ग :

वांजरगावहून आग्नेयेस चांदेगाव (डागसपिंपळगावमार्गे) 7 कि.मी. आहे. चांदेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. चांदेगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान चांदेगावच्या पश्चिम विभागी टेकावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वांजरगावहून चांदेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते.
(पू. ली, 287, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून तपोवनला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. परिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या ईशान्येस आहे. (स्था.पो.उ.प्रत)


चांदेगावची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: