Bramhani (Ramdoh) (ब्राह्मणी)

ब्राह्मणी, ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान वरखेड-घटसिद्दनाथ स्थानापासून 3 कि.मी. आहे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

अ) वरखेड-रामडोह-पाटापाटाने उत्तरेस, गावाबाहेर जाऊन डावीकडे वळून पुन्हा उजवीकडे वळा. समोर मंदिर दिसते. (अंतर 7 कि.मी.)

ब) घटसिद्धनाथब्राह्मणी (पायी अंतर 3 कि.मी.)


स्थानाची माहिती :

ब्राह्मणी हे गाव नाथसागरात बुडाले असून नवीन वसती झालेली आहे. हल्ली ही वस्ती रामडोह या गावाच्या हद्दीत आहे. स्वामींच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. सारंगपाणी भट (अनंत कुंची) यांचा पुत्र चक्रपाणी भट त्यांचे पुत्र गोपाळ पंडित होते. यांची आणि स्वामींची भेट घटसिद्धनाथ येथे झालेली होती. त्यावेळी चक्रपाणी भट यांनी स्वामींना विनंती केली की, आपण ब्राह्मणी येथे यावे. त्यांच्या विनंतीवरून स्वामी येथे आले. त्यावेळी गोपाळ यांना स्वामींच्या दर्शनाचा लाभ झाला. गोपाळ यांचे वर्तन बालपणापासून इतरांपेक्षा श्रेष्ठ होते. विद्वता देखील अपूर्व होती. स्वामींच्या कृपा प्रसादामुळे त्यांना ज्ञानचक्षु प्राप्त झाले होते. बालपणीच गोपाळ यांना, लोकं गोपाळ पंडित म्हणू लागले. गोपाळ पंडित जे पाहत होते ते कोणीही पाहात नसे. पुढे गोपाळ पंडितांनी संन्यास दीक्षा घेतली. अनुसरले, उत्तम चर्या केली. गोपाळ पंडित यांचे ‘आचार्य अनेराजव्यास’ असे नामकरण करण्यात आले. त्यांच्या नावाने महानुभाव पंथाच्या 13 आम्नाय महंतांपैकी ‘श्रीलासूरकर’ ही आम्नाय महंती प्रतिष्ठा चालू झाली.

ठिकाणाचे महत्त्व : पारमांडल्य कुलाचार्य श्रीलासूरकर या प्रतिष्ठेचे मूळ पुरुष आचार्य श्री अनेराजव्यास हे असून ते याच ब्राह्मणी गावचे आहेत. (पारमांडल्य म्हणजे परमाणुवत सुक्ष्मातिसुक्ष्म जानणारे तथा दिव्य प्रकाशरुप परमेश्वराचे मंडळाचे ज्ञानी.)

1. वसती स्थान :

घटसिद्धनाथ येथून स्वामी ब्राह्मणी येथे आले. ब्राह्मणी हे गाव नाथसागरात बुडाले असून नवीन वसती झालेली आहे. हल्ली ही वस्ती रामडोह या गावाच्या हद्दीत आहे. स्वामीच्यावेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देऊळाच्या चौकात स्वामींना वसती झाली.

लीळा : ‘ब्राह्मणीए वस्तिः’

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. मादने स्थान.

2. मर्दना स्थान.

3. आरोगणा स्थान.


ब्राह्मणीची एकूण स्थान : 4


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: