Bramhanawada (ब्राह्मणवाडा)

ब्राह्मणवाडा (दिवे) ता. मोर्शी जि. अमरावती


ब्राम्हणवाडा येथील 1 स्थान एकाच - ब्राम्हणवाडा येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) तिवसा रोडवर बसस्थानकाजवळ शेतात मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

ब्राह्मणवाडा (दिवे) हे गाव, परतवाडा-तिवसा मार्गावर रिद्धपूरहून आग्नेयेस 4 कि. मी. आहे व तळेगावहन वायव्येस 1 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. मांगजयेशी खेळ करणे स्थान :

हे स्थान ब्राह्मणवाडा एस. टी. बस थांब्याच्या वायव्येस शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभूनी शिरखेडहुन रिद्धपूरला येताना येथे पालखी थांबवून मांगजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (गो.प्र.च.247, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


ब्राह्मणवाड्या चे स्थान : 1


  • Govind Prabhu Charitra Lila – 247
  • Bramhanawada : इस्वरनायका आभर्तणी रीघपुरा प्रयाण :॥
  • इस्वरनायका आभर्तणी रीघपुरा प्रयाण : ॥ मग गोसावी सीरखेडासि बीज केलें । ऐसें आइकौनि इखरनायक आले : गोसांवियासि भेटि जाली : मग दंडवत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियांतें वीनवील ” जी जी ! गोसावीं रीधपुरासि बीजें करावें जी ! बहुत दीस जाले जी!” मग गोसांवीं वीनवणी स्वीकरीली : मग गोसावी घोडेयावरि आरोहण केलें : एकी वासना : दांडीयचिवरि आसन जालें : ऐसे रीधौरीयासि बीजें कलें : तळेगावी तळेयाचीय दक्षीणीली पाळी दांडी खालवीली : मग बाजे केलें : मांगजैसी खेळू केला : मग मढासि बीज केलें ॥ २४७ ॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: