Bhokardan (भोकरदन)

भोकरदन, ता. भोकरदन, जि. जालना


येथील 2 स्थाने 2 ठीकानी आहेत -
1. वसती स्थान - येथील 1 स्थान - भोकारदन वरुण दीड कि.मी. आलापूर कडुन गेल्यास केळना नदीच्या काठावरील 5 खांबांचे पूरातन मंदीरात आहे. याला तुकाई मंदीर म्हणुन ओळखतात. (हा दलदलीच भाग आहे.) (येथे भीक्षुक राहतात.)
2. लेन्यातील स्थान - येथील १ स्थान - वसतीस्थानाच्या मागील भागात पूरातन लेन्यात आहे. (येथे आता ओटा झाला आहे.) (स्थानपोथीच्या नुसार हे स्थान निर्देशरहीत आहे. मात्र लेनी पहान्यासारखी आहेत.)


जाण्याचा मार्ग :

भोकरदन हे गाव, जालाना-सिल्लोड सडकेवर राजूरहून किंचित वायव्येस 26 कि.मी. आहे. व सिल्लोडहन किंचित आग्नेयेस 14 कि.मी आहे. जालना ते भोकरदन 51 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

भोकरदन गावाच्या उत्तरेस आलापूर गाव आहे. त्या गावाच्या वायव्येस तीन फर्लाग अंतरावर खेळणा नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात हे स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे रामनाथाचे देऊळ होते. आज हे देऊळ ‘तुकाई मंदिर’ या नावाने प्रख्यात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पिंपळगाव (रेणुकाई) हून भोकरदनला आले. दुसऱ्या दिवशी ते येथून सिल्लोडला गेले. (पू.ली. 426)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


लेण्यातील स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान.


भोकरदनची स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 426
  • Bhokardan : भोगवर्धनी रामीं वस्ति :।।:
  • गावांवाव्यें दुरि पैलाडी नेदचिये थडी पूर्वाभिमुख रामाचें देउळः तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…विसृत लीळा नाही. एवढीच लीळा चरीत्रात आढळते… स्वामींच्या आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाववरुन पूढे आन्व्याकडे जाताना भोकरदन येथे स्वामी वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: