Bhokar (भोकर)

भोकर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथे 2 स्थाने आहेत -
1. हे स्थान भोकर गावाच्या पूर्वभागात ग्रामपंचायत जवळ आहे.
2. दुसरे स्थान याच्या जवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

भोकर हे गाव, श्रीरामपूर नेवासा मार्गावर श्रीरामपूरहून पूर्वेस 11 कि.मी. आहे व नेवाशाहून वायव्येस 21 कि.मी. आहे. घुमनदेवहून नैर्ऋत्येस भोकर 5 कि.मी. आहे. भोकरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान भोकर गावाच्या पूर्व विभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात आव्हाण्याहून भोकरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 579,स्था.पो.)

दुसऱ्या दिवशी ते येथून बेलापूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून उत्तरेस 16 फूट अंतरावर आहे. (स्था.पो.उ.प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. पटीशाळेच्या पूर्वील सिहाडा आसन स्थान.
2. देवळाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान.


भोकरची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila –
  • Bhokar : भोकरीं महालक्ष्मीये वस्ति :।।:
  • तेथौनि गोसावी भोंकरासि बिजें केलें: भोकरी गावापूर्वे उत्तरामुख महालक्ष्मीचें देउळः तेथ वस्ति जाली :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांबा-सेकटा-चकलांबा- पारेगाव(घोगस)-खरवंडी(कासार)-एळी-आव्हाणे(बु) असा मार्ग क्रमण करित भोंकर येथे आले व वस्तीस थांबले तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: