Bhishnur (भिष्णुर)

भिष्णूर ता. आष्टी जि. वर्धा


भिष्णूर येथील येथील 12 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) 2 ठिकाणी गावातच आहेत.
7 स्थाने गावाच्या पश्चिमेकडे गावात आवारात एकाच ठीकाणी आहेत.
5 स्थाने गावात गढीवर आहेत. आवाराजवळुन गढी जवळच आहे.


जाण्याचा मार्ग :

भिष्णूर हे गाव, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावरील ‘वरखेड’ फाट्यापासून उत्तरेस 2 कि. मी. आहे. तिवशाहून पूर्वेस वरखेड फाटा 7 कि. मी. आहे. स्वतंत्र वाहनांसाठी ‘खडका’ फाट्याच्या जवळून भिष्णूरला जाण्यास कच्ची सडक आहे. खडका फाटा ते भिष्णूर 4 कि. मी. तिवशाहून भिष्णूर वणी फाटा मार्गे 6 कि. मी. आहे. भिष्णूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. श्रीगोविंदप्रभूचे अवस्थान स्थान :


हे स्थान भिष्णूर गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख आवारात उंच जागेवर पूर्वाभिमुख देवळात आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे ब्राह्मणाचा वाडा होता.

लीळा : श्रीगोविंदप्रभू तिवशाहून भिष्णूरला आले. त्यांचे या ठिकाणी 3 दिवस वास्तव्य होते. (भी. प्र.ली. 222, स्था. पो.) त्यानंतर ते येथून नमस्कारीला गेले.


2. आरोगणा स्थान :


हे स्थान अवस्थान स्थानाच्या वायव्येस आहे. (स्था. पो.)



3. मर्दना स्थान :


हे स्थान आरोगणा स्थानापासून ईशान्येस 4 फूट अंतरावर आहे. (स्था.पो.)

4. मादने स्थान:


हे स्थान मर्दना स्थानापासून पूर्वेस 3 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.)



5. महाजना भेटी स्थान :


हे स्थान आवारामध्ये पश्चिमाभिमुख देवळात आहे. या स्थानाचा उत्तरदक्षिण ओटा आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू येथे रात्र झाल्यावर तिवशाहन आले होते. त्या दिवशी एकादशी होती. त्यामुळे घरातील सर्व महाजन मंडळी एकादशीच्या जागरणाला गेली होती. त्यांना भटोबासांनी बोलावून आणले. या ठिकाणी श्रीप्रभूची व महाजनांची भेट झाली. (गो. प्र. च. 240, स्था. पो. द. मा. शा.प्र.)


6. महाजना भेटी:


स्थानाच्या वायव्येस 6 फूट 6 इंच अंतरावर षट्कोनी ओटा असलेले एक स्थान आहे. हे स्थान कोणत्या लीळेचे आहे. हे निश्चितपणे सांगता येणार नाही.

7. चरणचारी उभे राहणे स्थान :


हे स्थान आवाराच्या पूर्वेस बाहेरील बाजूस आहे.


लीळा : श्रीगोविंदप्रभू तिवशाहून आल्यावर प्रथम येथे चरणचारी उभे राहिले. मग माहादाइसांनी गरम पाण्याने त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (भी. प्र. ली. 219)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (वरील सातही स्थान)


गढीवरील स्थाने :


आवाराच्या नैर्ऋत्येस अर्धा फर्लाग अंतरावर गढी आहे.

8,9. विहरण स्थाने:


ही दोन स्थाने गढीवर उत्तराभिमुख देवळात आहेत. (स्था. पो.)



10. परिश्रय स्थान :


हे स्थान विहरण स्थान देवळाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (वरील तीनही स्थान)


अनुपलब्ध स्थाने :

1. घोडवडीचा सिरा आसन स्थान

2. खडकावरील आसन स्थान



भिष्णूर ची एकूण स्थाने : 12


  • Govind Prabhu Charitra Lila – 240
  • Bhishnur : माळधरा दांडी खालवणे :॥ तीवसा दांडी खालवणे :॥ सेंदुरजनी दांडी खालवणे :॥वरान उतरौनि भीस्नौरी अवस्थान:॥
  • मग खडकीए दांडी सांडीली : आवी भगवतीजनें टणकली : तीय राहीली : भट माहादाइसें ये दोघे गोसावियांसवें नीगाली : तवं रात्री जाली : मग गोसावी आरचि वरान उतरले : गोसाविया मागें भट माहादाइसें उतरली : तयाचेया आवारासि बीजें केलें : यकादसीचा दीम : तीये अवघीं वेसि घालुनि जागरना गेली होती : मटी वेसि माथां घेउनि उघडीली : माहादाइसी साउले फाडुनि काकडा केला : वाति लावीली : डेरामरि पाणीया तापतु होता : तेणें गोसावियाचे श्रीचरण प्रक्षाळीलें : मग भटाचे पाय धुतले : मग आपुले धुतले : मग मट तयातें बोलवाबया गेले : तयाते महणीतलें : ‘आगा! काइ जागरण करीत असा : राउळ तुमचेया घरासि आले असेति :” मग ते आवघेचि आले : गोसाविया से दंड. बत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियासि मर्दना मादणे जालें : पुजा केली : वन वोळगवीलें : मग आरोगणा जाली : पाट-बाज घालुनि सुपवति घातली : तीयवरि न नीजति : आवषया बाजा धातलीया : तयावरि न नीजति : मग लेकरवें नीजैली होती : मग गोसावी म्हणीतलें : “आवो हे घाल घालि :” म्हणौनि तिय बाजेपासि बीज केलें : मग लेकर उठवीली : मग तीय बाजेकरि पहुड स्वीकरीला : मग म्हणीतलें : “ऐया माशा होय म्हणे :” मी म्हणीतले : ” जी जी! आता को नव्हे : लेंकरुवें तवं उठवीली की “” आवो मेली जाय ” म्हणौनि हास्य केलें : मग मी माहादाइसी आंघोळ केलीया : माहादाइसी मणीतलें : “नागदेया जेवि:” भटौं म्हणीतले : ” तुमी यकादसि मोडाल तरि मी जेवीन : ” संग्रहेन म्हणीतलें : ” ना : हो का: ” मग दोघे जेवीली :॥ २४०।।
  • Govind Prabhu Charitra Lila – 241
  • Bhishnur : आवो तु आलीसि म्हणणे :॥
  • तवं उदीयांचि आबाइसें आली : मग गोसावी म्हणीतले : “आवो ! तु आलीसि :” “जी जी! आलीयें जी!” मग दंडवत घातले : श्री चरणा लागली : तवं म्हाइंभट : लक्ष्मींद्रभट भागले : तें यकाचे घोडें चरत होते : तें तीही धरीले : कटी-बंधनेंयांची धारी घातली : दोघे वरि बैसले : मग मीस्नौरासि आले : तें घोडे सोडुनि दीधलें : आकळवणीं पडीले होते : तें चीखले हात पाय माखले होते ते पांढरे जाले होते : ते देखौमि गोसावी म्हणीतले : ” आवो मेला जाय : सोबरें सोवरें होती म्हणे :” तीही म्हणीतले : ” जी जी ! गोसावियावीन सोच्यें सोवरोंच दीसत असों जी” तीय दीसी दुसरेया माउवाचा उपहारु जाला : तीसरी दीसी तीसरेयाचा जाला : ऐसा तीघां भाउवांचा उपहारु जाला : चौथेयाचा उपहार न स्वीकरीति : मग बीजें केलें ॥२४१॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: