Bheticha Vad (भेटीचा वड)

भेटीचा वड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर


येथील स्थान पाथर्डी-पाडळशिंगी रोडवर असलेल्या तुळजवाडी या गांवाजवळ रोडचे बाजुलाच वडाखाली मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

भेटीचा वड हे ठिकाण, पाथर्डी पाडळशिंगी मार्गावर खरवंडीहून वायव्येस 2 कि. मी. आहे. व पाथर्डीहून पूर्वेस 23 कि. मी. आहे. भेटीचा वड येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तसेच तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. भेटीच्या वडाचे स्थान :

हे स्थान तुळजवाडीजवळ पाथर्डी-पाडळशिंगी मार्गाच्या दक्षिण बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वडाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात खरवंडीहून येळीला जात होते. त्यावेळी म्हाइंभट ऋद्धपूरहून आले. सर्वज्ञांची व त्यांची रस्त्यातच भेट झाली. त्यानंतर सर्वज्ञांना येथे वडाच्या झाडाखाली आसन झाले. मग म्हाइंभटांनी, सराळ्याहून ऋद्धपूरला कसा गेलो, का गेलो, जाताना काय काय घडले व तेथे जाऊन श्रीप्रभूना अनुसरलो. याची सर्व माहिती सर्वज्ञांना सांगितली. (उ. ली. 575, स्था, पो.)

2. म्हाइंभटांना वस्तूसंबंध निरूपणे (उ. ली. 576)

3. आरोगणेच्या वेळेला सर्वज्ञांनी म्हाइंभटांना वडाच्या झाडाची एका पत्रावळी पुरतीच पाने आणण्यास सांगितली; परंतु म्हाइंभटांनी त्यापेक्षा अधिक पाने आणली. त्यामुळे सर्वज्ञ त्यांना रागावले. नंतर सर्वज्ञांना येथे आरोगणा झाली. गुळळा झाला, विडा झाला. मग सर्वज्ञ येथून येळीला गेले. (उ. ली. 577)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


येथून पश्चिमेस 1 कि. मी. अंतरावरील बाग ओढ्याच्या पूर्वेचे व रस्त्याच्या उत्तरेचे श्री अंबाजी ढोले यांच्या शेतातील देवळात असलेले स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


भेटीच्या वडाचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: