Bhatepuri (भाटेपुरी)

भाटेपुरी, ता. जालना, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान भाटेपूरी गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच महादेव मंदीर आहे, या मंदीराच्या मागे असेलेल्या कुंडलिका नदीच्या काठावरील मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

भाटेपुरी हे गाव, जालना-जिंतूर मार्गावरील रामनगरपासून दक्षिणेस 6 कि.मी. आहे. जालना ते रामनगर 18 कि.मी. मंठा ते रामनगर 40 कि.मी. करडगावहून वायव्येस भाटेपुरी (कार्ला,हातवण मार्गे) 12 कि.मी. आहे. भाटेपुरीला जाण्यासाठी जालन्याहून एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. गाढेसावरगाव ते भाटेपुरी (हिसवण मार्गे) 8 कि.मी. आहे. जालना ते भाटेपुरी (खरपुडी, खनेपुरीमार्गे) 13 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान भाटेपुरी गावाच्या पश्चिम विभागी महादेवाच्या देवळाच्या पाठीमागे कुंडलिका नदीच्या पूर्व काठावर पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खनेपुरीहुन भाटेपुरीला आले. त्यांना येथे आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली, पहुड, उपहुड झाला. (पू.ली. 486 स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून गाढेसावरगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. सारंगधराच्या देवळातील वसती स्थान.

2. परिश्रय स्थान.

3. गावा दक्षिणे धाबा आसन स्थान.

4. भाटेपुरी मार्गीचे आसन स्थान.


भाटेपुरीची एकूण स्थाने : 5


  • Purvardha Charitra Lila – 484
  • Bhatepuri : स्थानपरा/स्थानांतर देवता कथन :।।:
  • तीजेचां दिवसीं उदेयाचा पूजावसर जालेयानंतरें गोसावियांसि बाइसीं आंगीटोपरें ओळगवीलेः विडा ओळगवीलाः श्रीचरणीं उपान्हौ ओळगविलीयाः मग गोसावी हिवरळीयेहुनि बिजें केलें: काचराळेया मार्गी भाटपुरिये गावांआग्ने बारव असेः तेथ करंजखेडीची देवता आली होतीः गोसावी बिजें करितां तियें विहीरीपुर्वे उभे राहिलेः आणि गोसावी भक्तिजनापुढां सांघितलें: ‘‘करंजखेडीं पाणुनायकाचां गृहीं देवता होतीः तियें एथीची एजमानेः तेथ हाटगृहीं हें गेलें: आणि येही तेथौनि बिढार काढिलें: यातें न पुसत एथ आलीः तें ए वीहिरीसि रीगालीः तें एथे असे गाः’’ मग अवघेया भक्तिजना विस्मो जालाः गोसावी जै भाटापूरी बिजें केलें तें वीहिरी दोनि :।।:
  • (“गोसावी हिवरळीयेहुनि बिजें केलें: काचराळेया मार्गी भाटपुरिये गावांआग्ने बारव असेः” असा उल्लेख असल्याने ही लीळा “काजळा” या ठीकनी Upload केली आहे.)
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा ‘काचराळेया मार्गी भाटपुरिये गावांआग्ने बारव’ येथे आसन झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 486
  • Bhatepuri : भाटेपुरिये धाबां पूजाः आरोगणाः सारंगधरीं वस्ति :।।:
  • गोसावी भाटेपुरिये बिजें केलें: गावापसिमें महालखुमीयेचां धाबां आसन जालें: दुपाहारीचां पूजावसर जालाः मार्गी बाइसें नाथोबा भिक्षा करौनि आलीं होतीं: तें गोसावियांसि आरोगणा जालीं: पहूड उपहूड जालाः मग वस्तिसि विळीचेया भिक्षावसरा गोसावी लुखदेवोबासाचेया स्कंधावरि श्रीकर घालुनि गावांतु सारंगधराचेया देउळा बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा भाटेपुरि येथे वसतिस थांबले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 486
  • Bhatepuri : लुखदेवोबा भिक्षे पाठवणें :।।:
  • सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पुण्यमहात्मे हो झोळी घेयाः’’ गोसावी आपुलेनि श्रीकरें झोळीयां गांठी घालौनि तयाचां हातीं दिधलीयाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पुण्यमहात्मेः भिक्षा घेवों जाणिजे होः मंडळीकाः आपणेयांसांगातें भिक्षे नेयाः’’ मग तें दोघे भिक्षे निगालेः विळीचांची भिक्षा करौनि आलेः नाथोबाये अवघे वेगळेवेगळे घेतलें होतें: गोसावियां दृष्टीपूत झोळीया केलियाः गोसावी डावा श्रीकर झोळीयेतळीं घातलाः उजवा वरिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पुण्यमहात्मे भिक्षा घेवो नेणतीचिः पुण्यमहात्मे हो तुम्हीं भिक्षा घेवो नेणाचि मां:’’ मग तेहीं बाइसांचां हातीं झोळीया दिधलीयाः बाइसीं पूजा केलीः बरवें पदार्थ निवडीले आणि म्हणितलें: ‘बाबानि म्हणितलें घेओं जाणावें: तें बटीकु घेउं नेणेचिः’’ मग गोसावियांसि रात्रीची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः सारंगधरीं वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा भाटेपुरि येथे वसतिस थांबले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 487
  • Bhatepuri : मनोरथज्ञानें लुखदेवोबा पाठवणें :।।:
  • गोसावी पश्चातपहारीं उपहूड जालेंयानंतरे गावांदक्षिणें मळाः तेथ परिश्रया बिजें केलें: परिश्रय सारूनि उदका विनियोग केलाः मग तयाची मळेयाआंतु धाबीं दोनिः एक महालखुमीएचें धाबें तेथ आसन जालें: लुखदेवोबों रात्री मनोरथ केलेः ‘मज बहुत दिस लागलेः गावांची अवसरी करीतिः तरि गावां जावें: काही तयां तेथ वरो घालावीः निश्चिते करावीः मग यावें:’ गोसावी दंतधावन करीत असतिः एकी श्रीकरीं शिळीक घेतलीः मग म्हणितलें: ‘‘काइ गा पुण्यमहात्मे हो मनोरथ वर्ततातीः कुटुंबचिंता वर्तत असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीजीः बहुत दी निगालेयां भरलेः कुटुंब वरोविण सीनत असे जीः गावां जावें: वरो घालावीः निश्चिते करावीं: मग यावे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि पुण्यमहात्मे हो तुम्हांपासी काइ असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीः एकी आसू आहेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि ऐसें किजें: गावासि जाः तया वरो घालाः मग खडकुलीए एतुकेया मागुतें भेटाः’’ मग गोसावियांसी गुळळा जालाः उदका विनियोगु जालाः मग पूजावसर जालाः तिहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: गांवां निगालेः मग गोसावी विहरणां बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)ला आले. स्वामींचे हिवरळि(जालना)ला १ दिवस वसति व १ महिना वास्तव्यास(अवस्थान) होते. पुढे स्वामीं रावसगावकडे निघाले तेव्हा भाटेपुरि येथे वसतिस थांबले. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: