Bhankhedi (भानखेडी)

भानखेडी, ता. जि. अमरावती


येथील 2 स्थान भानखेडा गावापासून 2 कि.मी. अंतरावर आहे, जवळच महानुभाव आश्रम व श्री नागदेवाचार्य स्मृती स्थान सुद्धा आहे.


जाण्याचा मार्ग :

अमरावतीहून भानखेडी, छत्री तलाव मार्गे 10 कि. मी. आहे व बडनेरा येथून कोटेश्वरमार्गे 6 कि.मी. आहे. अंजनगावहून भानखेडी, कोटेश्वरमार्गे 6 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. सिद्धनाथाचा चौकी आसन स्थान, 2. सिद्धनाथाचे लिंग श्रीकरे स्पर्शणे स्थान :

ही दोन स्थाने भानखेडी गावापासून दोन कि. मी. अंतरावरील श्रीनागदेवाचार्यांच्या विस्मृती ठिकाणा पासून पूर्वेस 194 फूट अंतरावर सिद्धनाथाच्या पडलेल्या देवळात आहेत.

लीळा : श्रीगोविंदप्रभू नांदगावपेठहुन भानखेडीला आले. त्यांना सिद्धनाथाच्या देवळाच्या चौकात आसन झाले. गुळळा विडा झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या श्रीकराने सिद्धनाथाच्या लिंगास स्पर्श केला. नंतर ते येथून अंजनगावबारीला गेले. (ई. श्रीमाधवराज पंजाबी यांच्या जवळील हस्तलिखित स्थान पोथी.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


भानखेडी ची स्थाने : 2




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: