Bhandara (भंडारा)

File:MaharashtraBhandara.png - Wikipedia

भंडारा जिल्ह्यात एकच स्थानाचे गाव आहे. ते म्हणजे स्वयमेव जिल्ह्याचे ठिकाण भंडारा शहर.


भंडारा येथील 4 स्थाने 3 ठीकाणी आहेत. शहरात प्रसिद्ध खांब तलाव नावाचे तळे आहे याच्या पश्चिमेकडे मोठ्या मंदिरात 1 व लहान मंदिरात 1 अशी 2 स्थाने आहेत. खांब तलावाचे दक्षिणेकडे व शीतला माता मंदिराच्या पाठीमागे 1 स्थान नवीन मंदिरात आहे. व एक स्थान शहरात पांडे महालाशेजारी टिळक वार्डात श्री. खुराणा यांच्या वाड्यात कंपाउंड मधे लहान मंदीर मंदिरात आहे.


जाण्याचा मार्ग :

भंडारा हे शहर, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूरहन पूर्वेस 62 कि. मी. आहे. सुकळी ते भंडारा (तुमसर मार्गे) 60 कि मी. रामटेक ते भंडारा 36 कि. मी. नागपूर-गोंदिया लोहमार्गावरील भंडारारोड रेल्वेस्थानकावर उतरून भंडायला जाता येते. भंडारा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1.  वसती स्थान :

हे स्थान खांब तलावाच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंहाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 46, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2.  आसन स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या वायव्येस पूर्वाभिमुख देवळात आहे. (ए. ली. 40 ख प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3.  आरोगणा स्थान :

हे स्थान शीतला माता मंदिरच्या पाठीमागे व खांब तळ्यात दक्षिण काठाला आहे. याला ‘पंचदेऊळी’ असे म्हणतात.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू गावातून भिक्षा करून येथे आले. श्रीचरणाने शिळेवर पाणी टाकून शिळा स्वच्छ केली. त्यावर श्रीकरीचे भिक्षान्न ठेवले. भांडारेकारांनी अर्धे धोतर फाडून आसन रचले. सर्वज्ञ आसनावर बसले. मग आरोगणा केली. नंतर भांडारेकारांनी प्रसाद घेतला. (पू. ली. 46, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4.  पाणिपात्र स्थान :

हे स्थान भंडारा शहरात पांडे महालाशेजारी टिळक वॉर्डमध्ये श्री. खुराणा यांच्या वाड्यात आहे. या स्थानाच्या जागेवर लहानशे देऊळ आहे.

लीळा : पूर्वी येथे निळभट भांडोरकारांचा वाडा होता. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे भिक्षेला आले होते. त्यावेळी निळभट ओसरीवर बसून पोथी वाचत होते; परंतु त्यांना अर्थ उमटत नव्हता. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “भटो मागील फांकी पाहा.” लगेच त्यांनी सर्वज्ञांच्याकडे पाहिले व ओळखले हे माझे हितक्ष आहेत आणि त्या वेळेसच निळभट सर्वज्ञांच्या सोबत निघाले. (पू. ली. 46, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान :

1. वसती स्थान देवळाच्या आग्नेयेचे उत्तराभिमुख देवळातील स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

वसती स्थान मंदिरातील निर्देशरहीत स्थान

2. वैशालीनगरमधील ‘वनदेव’ नावाचे स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. भंडारा शहरातील जेलमधील स्थान.

येथे पोलिसांची परवानगी घेऊन जाता येते, हे स्थान जेल च्या अंदर आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अशी एकूण तीन स्थाने निर्देशरहित आहेत.


अनुपलब्ध स्थान :

1. लिंगाच्या देवळातील वसती स्थान.


भंडाऱ्याची एकूण स्थाने : 5

निर्देशरहित स्थाने : 3


  • Lila : Purvardha Charitra – 46
  • Bhandara  :  भांडारेकारां भेटि :।।: अनुसरण स्वीकारू :।।: 
  • सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मग हें तेथौनि भांडारेयासि गेलें:’’ गोसावी भांडारां भांडारेकारांचेया घरां पाणिपात्रसि बिजें केलें: तयां नांव नीळभटः तें काणवः तवं तें सोळा हात साउला उत्तरासंगें धोत्र घालूनि वासिरिये पाटयाउपरि बैसौनि गीतेची पोथी वाचित होतेः वाचितां काही विवरण करीतां तो गीतेचिया श्लोकीचां अर्थ अवगमेनाः तो मागील फांकी असेः आणि तें पुढीली फांकीये पहात होतें: भांडारेकाराचिया ब्राम्हणीं गंगाळीं तयां स्नानालागौनि पाणी सारिलें होतें: अभ्यंगाची आइत होत असेः चोखणी आणिलीः मग गोसावियांसि पाणिपात्र दिधलेः पाणिपात्र जालें: परि भांडारेकार विवरणी गुंपले म्हणौनि गोसावियांची वास उधातीया दृष्टी न पाहतिः मग साउमेया बीजें करौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः मागिल फाकी पाहाः’’ तेही पाहिलेः तवं अर्थ अवगमलाः तिहीं परतौनि पाहिलें: तवं गोसावियांतें देखिलें गोसावियांचां कटीप्रदेशीं सुडाः श्रीमुकुटी सुडाः श्रीकरीं पाणिपात्रः भांडारेकारी पोटी म्हणितलें: ‘ज्ञात होतिः’ मग पुनति गोसावियांचें अवलोकन करौनि पोटीं म्हणितलें: ‘काळ रूसलाः काळ सारूनि महाकाळाते बुझाउं निगाले की काळाचिवरि रूसले ऐसें दिसतातिः अवयव गळले असतिः तया वार लाविले असतिः भोजनार्थीया भोजन मिळेः मां या न मिळेः तरि माझे हितक्ष होतिः तथा आप्तः’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भांडारेकारां दरीसनासरिसी ज्ञात आप्त ऐसीं प्रतीति अवधारीलीः ज्ञातृत्वः सुहृदयत्वः हितक्षत्व एं तिन्हीं उमटलीं:’’ आणि तैसेचि गोसावी बिजें केलें: सरिसेचि तेही पुस्तक ठेविलेः गोसावियांसरिसे निगालेः तयाचि ब्राम्हणींहीं तयासरिसी निगालीः दारवंठेयावरि आलीः तवं घरीचां तथा ब्राम्हणीं: म्हणितलें: ‘‘तुम्हीं क्यें निगालेति? तुम्हां पाणी सारिलें असेः’’ गोसावी मागील वास पाहिलीः आणि भांडारेकारीहीं पाहिलीः तयातें येत देखिलें: तवं भांडारेकारीं म्हणितलें: ‘‘तुम्हीं कां येता? हें इतुके दिस तुम्हांपासी होतें: आतां जयांचें तयांपाठी जात असेः तुम्हीं राहाः’’ मग तियें शब्दासरिसींचि राहिलीं: भक्तिजनी तथा महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः तियें शब्दासरिसीं कैसी राहिलीं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तियें आज्ञाधरें कीं: तयाची काढिली रेघ नोलांडीतिः’’ तैसेचि गोसावी देवकीततळेयासि बिजें केलें: चार्‍ही दिसा अवलोकीलीयाः तळां डावेनि श्रीचरणें सिळातळावरि उदक घातलें: वरि पाणिपात्र ठेविलेः भांडारेकारीं सोळा हात धोत्र अर्ध फाडिलें: आसन रचीलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: तें सेवकवृत्ति अवलोकीत बैसलें: आरोगणा जालीः तयां तीं बोटांचेंनि माने प्रसादु जालाः मग परतें ऐसें वृक्षातळी बीजें केलेः आसन केलें: गोसावी नावेक आसनीं उपविष्ट जालें: तें पुढां जानू मोडौनि मांडखुंटिया बैसलेः गोसावी सांघतां एथचि तयाची उठीबैसी प्रशंसिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ओम म्हणौनि भांडारेकारांचेया सारिखे उठीबैसों कव्हणीचि नेणिजेः सोळा वरिषें सन्निधान परि पुष्टिविभागु केव्हळांहीं देखिलाचि नाहीं: ऐसें ते निळभट सर्वाधीकार्ये कुसळ कीं बाइः’’ मग भांडारेकार पोटीं मनोरथ करूं लागलें: जे ‘माझे काइ गोसावियांचिया ठाइं प्रवेशन नव्हेचि कीं: काहीचि घेउनि न निगेचिः’ ऐसें दुख करीत बैसले असतिः परि काही पदार्थ घरौनि आणावया ऐसें स्फूरेनाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भांडारेकार हो जो मनोरथ करीत असा तो एथौनि पूरेवजैलः सिद्धी नइिजैल होः’’ ‘‘जी जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलें: तयाची तळेयाचिये पाळीं वडातळीं पूर्विलीये पालवी आसन जालें: पुढां भांडारेकार मांडीखुटी घालूनि बैसले होतें: तवं भांडारेकाराची मातापिता आलीः गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः भांडारेकारातें म्हणितलें: ‘‘भटोः आतां चालाः’’ तवं तेही म्हणितलें: ‘‘तुम्हीं चालाः मीं न येः’’ इतुकेनि तियें उगी निगालीः महादाइसीं म्हणितलें: ‘‘जी जीः तियें शब्दासरिसीचि कैसी गेली?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तयांचे मोहोपास एथौनी उछेदिलेः’’ ऐसें भांडारेकार सकळ परीत्येजुनि सन्निधानी अनुसरलें: मग बोधु जालाः तियें दिसीं नृसिहीं वस्ति जालीः उदेयाचि गोसावी नीळभट्टातें घेउनि निगालें:’’ :।।:


Bhandara Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: