Belapur (बेलापूर)

वनदेव :

18. अवस्थान स्थान :

हे स्थान बेलापूर गावाच्या दक्षिणेस एक कि. मी. अंतरावर सातभाई वसाहतीत, चांदेगाव, ब्राह्मणगाव रस्त्याच्या कडेला पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे वनदेवाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात बेलापूरहून येथे आले. त्यांचे या ठिकाणी दहा दिवस वास्तव्य होते. (उ.ली. 581 स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


19. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या आग्नेयेस आहे. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. जगतीच्या दारवठ्याच्या उत्तरेकडील लिंबाच्या उत्तरेचे नाथोबा भेटी स्थान.
2. देवळाच्या उत्तर पौळी लगतचे लहान देवळातील आसन स्थान.
3. आदित्याच्या देवळाच्या आग्नेयेचे मळ्यातील विहरण स्थान.
4. प्रवरा नदीच्या काठावरील पिंपळाच्या झाडाखालील आसन स्थान.
5. प्रवरा नदीच्या वाळवंटातील आसन स्थान.
6. बेलापुर गावाच्या पूर्वेचे सिद्धनाथाच्या देवळातील अवस्थान स्थान.
7. सिद्धनाथाच्या देवळाच्या आवारातील भैरवाच्या देवळातील दुपारचा पूजावसर आरोगणा तथा आसन विहार स्थान.
8. सिद्धनाथाच्या देवळाच्या आवारातील सोमनाथाच्या देवळाच्या अंगणातील मादने स्थान.
9. सिद्धनाथाच्या देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.
10. सिद्धनाथाच्या देवळाच्या जगतीबाहेरील ईशान्य कोपऱ्याजवळचे प्रवरा नदीच्या काठावरील लिंगाच्या देवळातील आसन स्थान.
11. लिंगाच्या देवळाच्या पूर्वेचे मलीनाथाच्या देवळातील आसन स्थान.
12. वनदेव येथील देवळाच्या पश्चिमेचे भीडी आसन स्थान.
13. परिश्रय स्थान.


वासनाभेदाचे स्थान : 1


बेलापूरची एकूण स्थाने : 32


  • Purvardha Charitra Lila –

उर्पुवरित लीळा पुढील पेज वर आहेत, पेज 6 वर ज्याण्यासाठी ‘6’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾