Belapur (बेलापूर)

6. मादने स्थान :

हे स्थान उत्तर सोंडी आसन स्थानाच्या पूर्व बाजूस आहे. (उ.ली.601,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. वज्री घडणे स्थान :

हे स्थान उत्तर सोंडी आसन स्थानाच्या उत्तरेस आहे.

लीळा : वज्रीच्या स्थानाची जागा म्हणजे प्राचीनकाळीच्या आदित्याच्या देवळाच्या अंगणाचा वायव्य कोन होय.
एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना या ठिकाणी उत्तराभिमुख गरूडासन होते. त्यांनी अंगी परिधान केलेली होती, आंगीचे कसे मोकळेच होते. श्रीमगुटी टोपरे, त्याचेही कसे मोकळेच. उपरण्याचे दोन्हीही पदर श्रीमुगुटावर सोडलेले होते. त्यांनी आंगीच्या बाह्या वरती करून डाव्या श्रीकरी काळी वीट घेऊन उजव्या श्रीचरणाच्या अंगठ्याने खाली दाबून धरली आणि उजव्या श्रीकरीच चिपतळ घेऊन वज्री घडली. पुन्हा दोन्ही श्रीकरांनी धरून दगडी चियावर घासून सारखी केली. आंगीच्या बाह्या पुन्हा वरती करून वजी दृष्टीने अवलोकन केली, आणि पुन्हा घडली. माहादाइसा ही लीळा पाहात होत्या. त्यांनी श्रीनागदेवाचार्यांनाही ही लीळा पाहण्यासाठी बोलाविले. माहादाइसांनी सर्वज्ञांना विचारले, ” हे आपण काय करीत आहात?” सर्वज्ञ म्हणाले, “आम्ही वज्री घडत आहोत.” “जी जी वज्री म्हणजे काय?” माहादाइसांनी विचारले. सर्वज्ञ म्हणाले, “वज्री म्हणजे वारितुरंग” ‘जी जी वारितुरंग म्हणजे काय?” पुन्हा माहादाइसांनी विचारले. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “वारितुरंग म्हणजे एक प्रकारचे घोडे. ते बेटांमध्ये असतात. ते पाण्यावर चालतात, तशी ही वजी. ही पण पाण्यावर तरंगते, म्हणून यालाही वारितुरंग असे म्हटले जाते.’ ही लीळा माहादाइसा देहांतपर्यंत आठवित होत्या. ही लीळा आठवितच त्यांनी देहत्याग केला. (उ. ली. 632, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


8. भीडी आसन स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या पश्चिमेस आहे.

लीळा : आदित्याच्या मंदिरांची पश्चिम भिंत या ठिकाणी होती. सर्वज्ञांना येथे कधी कधी आसन होत असे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


9. उदका विनियोग स्थान :

हे स्थान भीडी आसन स्थानाच्या वायव्येस आहे. आदित्याच्या देवळाच्या जगतीआंतुल हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू परिश्रयाला जाऊन आल्यावर येथे श्रीचरण, श्रीकर प्रक्षाळण करीत असत. गुळळा करीत असत. (स्था. पो. उ. प्र.)

देवळातील स्थाने संपूर्ण.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 3 वर ज्याण्यासाठी ‘3’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾