Belapur (बेलापूर)

बेलापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील स्थाने बेलापुर गावाच्या नैऋत्येकडे श्रीरामपूर-अहमदनगर रोडच्या जवळ असलेल्या भव्य मंदीरात आहेत.

बेलापुर मंदीरात 12 स्थाने आहेत, तर मंदीराच्या बाहेर आवाराबाहेर 5 स्थाने आहेत, अशी एकूण 17 स्थाने आहेत. येथे बरीच स्थाने निर्देशरहीत आहेत त्यामुळे संपुर्ण परिसर पवित्र आहे.

वनदेव - बेलापूर गावाच्या दक्षिणेस एक कि. मी. अंतरावर सातभाई वसाहतीत, चांदेगाव, ब्राह्मणगाव रस्त्याच्या कडेला 2 स्थाने आहेत


जाण्याचा मार्ग :

बेलापूर हे गाव, श्रीरामपूर अहमदनगर मार्गावर श्रीरामपूरहून दक्षिणेस 6 कि. मी. आहे व राहुरी साखर कारखान्यापासून 12 कि. मी. आहे. अहमदनगर ते बेलापूर 60 कि. मी. सोनई ते बेलापूर 43 कि. मी. बेलापूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. बेलापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. बेलापूर हे गाव, दौडमनमाड लोहमार्गावरील बेलापूर रेल्वे स्थानकापासून दक्षिणेस 6 कि.मी. आहे. श्रीरामपूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे आश्रम आहेत.


स्थानाची माहिती :

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात भोकरहून बेलापूरला आले. प्रथम गावाच्या पूर्वेस असलेल्या सिद्धनाथाच्या देवळात त्यांचे पाच दिवस वास्तव्य होते. त्यानंतर गावाच्या दक्षिणेस एक कि. मी. अंतरावर असलेल्या वनदेवाच्या देवळात त्यांचे दहा दिवस वास्तव्य होते व त्यानंतर बेलापूर येथे आदित्याच्या देवळात त्यांचे तीन महिने वास्तव्य झाले. त्यांच्या परम पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली स्थाने आम्ही क्रमाने देत आहोत.

1. अवस्थान स्थान :

हे स्थान बेलापूर गावाच्या नैर्ऋत्येस श्रीरामपूर अहमदनगर मार्गाच्या पूर्व बाजूस प्रवरा नदीच्या उत्तर काठावर पुलाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. देवळाच्या पूर्व-पश्चिम बाजूसही एक-एक दरवाजा आहे. देवळाच्या आवाराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून पूर्व बाजूलाही एक प्रवेशद्वार आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. आज हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे येथे तीन महिने वास्तव्य होते. (स्था.पो.)

येथील इतर लीळा : 1) माहादाइसा, सर्वज्ञांच्या ठायी सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा असे तीन्हीही पूजावसर येथील ओट्यावर करीत असत. (उ, ली. 601)

2) भटोबास, म्हाइंभट, दायंबा, नाथोबा, माहादाइसा, आऊसा इत्यादी भक्तजनांना आचारपर आणि विचारपर शास्त्राचे अपार निरूपण करणे. (उ. ली. 586 ते 597, 602, 605, 607 ते 624, 626 ते 629, 633 ते 647)

3) भटोबास आणि म्हाइंभट यांना असंनिधान धर्म तथा असतिपरी प्रकरण निरूपणे. (उ.ली.595)

4) भटोबासांचे आचार्य नामकरण करणे (उ.ली.622)

5) भटोबासांना महावाक्य प्रकरण निरूपणे, (उ.ली.633)

6) म्हाइंभटांना बोलाविण्यासाठी भटोबासांना सराळ्याला पाठविणे. (उ.ली.598)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे दररोज आरोगणा करीत असत. (स्था.पो.उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. माहादाइसा तूप वाढणे स्थान :

हे स्थान आरोगणा स्थानाच्या उत्तरेस आहे.

लीळा : माहादाइसा भिक्षा मागून आल्यावर भोजन करीत होत्या. तेव्हा सर्वज्ञ हातामध्ये तुपाची बुधली घेऊन माहादाइसाला तूप वाढण्यासाठी आले. माहादाइसा सर्वज्ञांना म्हणाली, “आपणच सांगितले की, तूप मिळाले असतानाही सेवन करू नये.” सर्वज्ञ म्हणाले, “तुम्ही आपल्या इच्छेने कोणताही पदार्थ सेवन करू नका; परंतु आम्ही दिला असता तुम्हाला सेवन करण्यास हरकत नाही.” मग माहादाइसाने तूप घेतले. (उ. ली. 604, स्था, पो.)

माहादाइसा तूप वाढणे स्थानाच्या उत्तर बाजूस एक स्थान आहे. गोपाळबासांच्या मते सर्वज्ञांनी येथे वज्री घडली.
आरोगणा स्थानाच्या पूर्व बाजूस देवपूजेचे आसन आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. दक्षिण सोंडी आसन स्थान :

हे स्थान देवपूजेच्या आसनाच्या पूर्वेस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथून दायबांना रिद्धपूरला पाठविले. त्यांनी श्रीप्रभुंच्यासाठी पंचरंगी जाडी, चवरी, आडकित्ता, सुपाऱ्या, आरती, धुपटणे, कापूर इत्यादी वस्तू दायंबा हाती पाठविल्या. (उ. ली. 630, स्था. पो.) तसेच या सोंडीवर सर्वज्ञांना कधी कधी आसनही होत असे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. उत्तर सोंडी आसन स्थान :

हे स्थान दक्षिण सोंडी आसन स्थानाच्या उत्तरेस आहे.

लीळा : म्हाइंभटांना वायु (अन्यव्यावृत्ती) निरूपण करणे. (उ.ली. 585, स्था. पो.) तसेच या सोंडीवर सर्वज्ञांना कधी कधी आसनही होत असे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 2 वर ज्याण्यासाठी ‘2’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾