Bel Pimpalgaon (बेल-पिंपळगाव)

बेलपिंपळगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील1 स्थान - हे स्थान पिंपळगांव गावाच्या पूर्वेकडे 1 की.मी.अंतरावर रस्त्याच्या लगतच मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

बेलपिंपळगाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील बेलपिंपळगाव फाट्यापासून उत्तरेस 2 कि.मी. आहे. श्रीरामपूर ते बेलपिंपळगाव फाटा 20 कि.मी. नेवासा ते बेलपिंपळगाव फाटा 11 कि.मी. बेलपिंपळगावला जाण्यासाठी नेवासा येथून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. जुने घोगरगाव ते बेलपिंपळगाव 5 कि.मी. आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान पिंपळगाव सुरेगाव रस्त्यावर पिंपळगावपासून पूर्वेस एक कि.मी. अंतरावर रस्त्याच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे चाचरमुदेचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : डोंबेग्राम येथे रात्री आरोगणा झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अंगणामध्ये शतपावली करीत होते. शुभ्र चांदणे पडले होते. सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, “अशा चांदण्यामध्ये ग्रामांतर करण्यास काय हरकत आहे?”काही हरकत नाही.” भक्तजन म्हणाले. मग बाइसांना तयारी करावयास सांगितले. सर्वज्ञ सर्व भक्तजनांसह डोंबेग्रामहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गुळळा,विडा झाला. त्यानंतर ते येथून नेवाशाला गेले. (उ. ली. 221, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


बेलपिंपळगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: