Beed Sthan (बीड स्थान)

बीड, ता. बीड, जि. बीड.


येथील स्थाने बीड शहराच्या दक्षिणेला बिंदुसरा नदीच्या उत्तर काठावरील भव्य मंदीरात व मंदीर परीसरात 6 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

बीड हे शहर, मलकापूर, सोलापूर राज्यमार्गावर आहे. 1) पाली ते बीड 9 कि.मी. 2) गेवराई ते बीड 32 कि.मी. 3) शहागड ते बीड 44 कि.मी. 4) जालना ते बीड 103 कि.मी. 5) औरंगाबाद ते बीड 128 कि.मी. 6) अहमदनगर ते बीड 143 कि.मी. 7) आष्टी ते बीड 83 कि.मी. 8) जामखेड ते बीड 66 कि.मी. 9) उस्मानाबाद ते बीड 110 कि. मी. 11) लातूर ते बीड 133 कि.मी. बीडला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. बीड येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 6 स्थान एकाच मंदिर परिसरात आहेत)

1. अवस्थान स्थान :

हे स्थान बीड शहरातील हत्तीखाना या विभागात बिंदुसरा नदीच्या उत्तर काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे प्रसनायकांची पूर्वाभिमुख गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय. हे देऊळ, ‘महानुभाव श्रीकृष्ण’ मंदिर या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात कोळगावहून बीडला आले. त्यांचे या ठिकाणी चार महिने वास्तव्य होते. (पू. ली. 310 ख प्र. स्था. पो.) त्यानंतर ते येथून पालीला गेले.

येथील इतर लीळा :

1) बाइसा, उपाध्ये, चांगदेवभट, प्रसनायक, पद्मनाभी, दादोस, भटोबास, दायंबा, गोंदो, आबाइसा, उमाइसा, सोभागा इत्यादी भक्तजनांनी सर्वज्ञांना पविते अर्पण करून पवित्याचे सर्व साजरे केले. (पू. ली. 303, 304)

2) प्रसनायक, पद्मनाभी, रेमनायक, जोगनायक.सारस्वतभट, आपदेवभट, विद्यावंत.दायंबा.गोंदो. चांगदेवभट, उपाध्ये, आबाइसा, उमाइसा सोभागा इत्यादी भक्तजनांची भेट येथे झाली. (स्थान पोथी उ. प्रत)

3) प्रसनायक आणि पद्मनाभी या दोघांना प्रथम भेटीच्या वेळी सर्वज्ञांच्यापासून स्थिती. (पू. ली. 295, 296)

4) प्रसनायकाने अर्पण केलेल्या वस्त्राचा स्वीकार करणे. (पू. ली. 295)

5) पद्मनाभीच्या उपहाराचा आणि वस्त्रपूजेचा स्वीकार करणे. (पू. ली. 297)

6) एकादशीच्या दिवशी सोभागाला तृप्ती होईपर्यंत केळे खाऊ घालणे. (पू. ली. 305)

7) आबाइसा व उमाइसा यांना आप्तधर्माचे निरुपण करणे. (पू. ली. 306)

8) उमाइसाला नरकाचे निरुपण करणे, (पू. ली. 307)

9) अनंत-चतुर्दशीच्या दिवशी आबाइसाने सर्वज्ञांना रेशमाचा अनंत अर्पण केला. त्याप्रसंगी आबाइसाला, खरा जो अनंत परमेश्वर त्याविषयी निरुपण करणे (पू. ली. 308)

10) चांगदेवभटांना परमेश्वर सन्निधानाचे श्रेष्ठत्व निरुपण करणे (पू. ली. 311) 11) महालक्ष्मीच्या पर्वणीच्या दिवशी आबाइसाकडून दृष्ट काढणे. (पू.ली. 315)

12) माइबासांचे ‘सोभागा’ नामकरण करणे (पू. ली. 316)

13) दायंबा सोभागांना हसत असताना त्यांना निवारण. (पू. ली. 317)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस 4 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या ठिकाणी आरोगणा करीत असत व त्यांना कधी कधी मर्दनाही येथेच होत असे. (पू. ली. 298)


3. मादने स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्वेस बाहेरील पडवीत पश्चिम बाजूस आहे. (स्था.पो.)


4. निंब माधुर्य करणे स्थान :

हे स्थान मादने स्थानापासून पूर्वेस 5 फूट अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पटीशाळा होती. त्या पटीशाळेवरील हे स्थान होय,

लीळा : 1) एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पटीशाळेवर आले. बरोबर आपदेवभट आणि इतर सर्व भक्तजन होते. देवळाच्या आवाराच्या भिंतीला लागून एक लिंबाचे झाड होते. ते अर्धे बाहेर व अर्धे आत होते. त्याच्या फांद्या गुंफेवर आल्या होत्या, सर्वज्ञ भक्तजनांना म्हणाले, ”हा लिंब गोड आहे की, कडू आहे ?” भक्तजन म्हणाले, “कडू आहे” मग तो लिंब सर्वज्ञांनी दृष्टीने अवलोकन केला; आणि म्हणाले, “आता पहा कसा आहे?” भक्तजनांनी चाखून पाहिला, तेव्हा तो गोड झालेला होता. मग भक्तजनांनी लिंबाचा पाला ओरबाडून खाल्ला (पू. ली. 312)

2) रेमनायकांना अवसर, अनअवसर कथन करणे. (पू. ली. 298)


5. सुंकीया जोगनायकाचे दुःखहरण करणे स्थान :

हे स्थान निंब माधुर्य करणे स्थानापासून उत्तरेस 1 फूट अंतरावर आहे.

लीळा : संसाराच्या त्रिविध तापांनी पोळलेल्या सुंकीया जोगनायकाचे सर्वज्ञांनी येथे दुःखहरण केले (पू. ली. 300)


6. चरणचारी उभे राहणे स्थान :

हे स्थान देवळाच्या आवारात ईशान्य विभागी पश्चिमाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : 1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कोळगावहून आल्यावर प्रथम त्यांनी येथे थोडा वेळ चरणाचरी उभे राहुन अवलोकन केले (पू. ली. 310 ख प्रत)

2) एके दिवशी सर्वज्ञ सर्व भक्तजनांसह महालक्ष्मीच्या देवळात आले. चौकात उभे राहिले. चौकात वर चांदोवा लावलेला होता व त्याला, शेणामातीने तयार केलेली आणि वरून रंग भरलेली फळे लावली होती. ते पाहून सर्वज्ञ प्रसनायकाला म्हणाले, “ही तुमची ब्रह्मे आहेत. “ते ऐकून प्रसनायक गप्प बसले, मग बाइसांनी विचारले, “ते कसे?” यावर सर्वज्ञांनी चांदोव्याचा दृष्टांत निरूपण केला; (पू.ली. 309) आणि नंतर भटोबासांना रूभणेयाचा दृष्टांत निरूपण केला. (पू.ली. 310)



अनुपलब्ध स्थान :

1) लिंबाच्या झाडाखालील आसन स्थान

2) नदीच्या घाटावरील आसन स्थान

3) दक्षिणेश्वराच्या देवळातील विहरण स्थान

4) कोले घाएखंडी दाखविणे स्थान

5) गरुडी आसन स्थान

6) दायंबा वखरी चुकी सांगणे स्थान

7) बनातील विहरण स्थान

8) अनुलेश्वराच्या देवळातील आसन स्थान


बीडची एकूण स्थाने : 14


  • Purvardha Charitra Lila – 294
  • Beed : बीडीं आटवलीये महालखुमीये गुंफे अवस्थानः प्रसनायका भेटि :।।:
  • गोसावी बीडासि बिजें केलें: नावेक चरणचारी उभे राहूनि बिढार अवलोकित होतें: तवं महाप्रासाद महालखुमीएचे देउळ पाहिलें: चौकीं नावेक आसन जालें: देउळादक्षिणें पटिशाळ पांतपांत देउळानैरूत्ये गुंफाः तेथ बिजें केलें: दोन्हीं दारशंका धरूनि भितरीं आवलौकिलें: तवं प्रसनायक संन्यासी ओटयावरि बैसले होतें: तेहीं ‘‘येइजो जीः भितरीः’’ म्हणौनि विनउनी बोलाविलें: गुंफेंआतुंनि बाहीरि निगालेः प्रसनायकें पुसिलें: ‘‘काइ पाहिजत असिजे जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बिढार पाहिजत असिजेः’’ प्रसनायकें विनविलें: ‘‘जी जीः एथ बिढार किजो जीः हें गोसावियांचें नव्हेः मीं एथ बाहिरी पटिशाळेसि असेन जीः एथ बिढार किजो जीः’’ आपुला परिग्रहो परता ठेउनि गोसावियांसि ओटा संपादीलाः आपण पटिशाळेवरि राहीलेः प्रसनायकांसि दोनि गुंफा होतियाः तयांतु आटवली झाडूनि बाइसीं आसन केलें: गोसावी आसनीं उपविष्ट जालें: बाइसीं मात्रा भितरीं आणिलीः मग तेथ बिढार केलें: दुपाहाराचां पूजावसरूः आरोगणाः पहूडः उपहूड जालाः गोसावियांसि गुंफे मास च्यारि अवस्थान जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 295
  • Beed : प्रसनायका स्तीतिः दुटी स्वीकारू :।।:
  • प्रसनायकें गोसावियांसि पानेंपोफळें दरीसनां केलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: प्रसनायक पुढां श्रीमूर्ति पाहात बैसले होतेः तयां गोसावी कृपादृष्टी अवलोकिलेः आणि स्तीति जालीः भोगिलीः भंगलीः मग तेहीं ओटयावरि आपुलें आसन रचीलें: चरणक्षाळण केलें: चरणोदक घेतलें: गंधाक्षता केलियाः मग चातुर्मासी रेमनायके प्रसनायकासि अपरपक्षीं बरवी उंच दुटी वाइली होतिः तें धौ लाउनी ठेविली होतीः तें गोसावियांसि ओळगवीलीः गोसावी स्वीकरिलीः ऐसीं तयासीं गोसावियांची अधिक आवडी संचरलीः मग प्रसनायकें गोसावियांसि उपहारालागी विनविलेः गोसावी विनती स्वीकरिलीः तेहीं उपाहाराची आइती आणुनि बाइसापासी दिधलीः बाइसीं उपहार निफजविलाः गोसावियांसि पूजावसर केलाः ताट केलेः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळाः विडा ओळगवीलाः भक्तिजना प्रसाद जालाः प्रसनायक स्तुति करीतिः मां म्हणतिः ‘‘गोसावियांपासूनि आम्हा ब्रम्हव्यूत्पत्ती जालीः ब्रम्हविद्या जालीः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 296
  • Beed : पदुमनाभी भेटिः स्तीति :।।:
  • रेमनायकाचेया घरा प्रसनायक पुडिएसि गेलेः प्रसनायकें: रेमनायक जोगनायक पदुमनाभीदेव सारस्वतभट या समस्ताप्रति स्तवन करौनि सांघितलें: ‘‘जे श्रीचांगदेवोराऊळ गोसावी इश्वरपुरूखः एथ बिजें केलें असेः तुम्हीं गोसावियांचिया दरीसना याः’’ ‘‘हो कां तरि दरीसनासि चालाः’’ म्हणौनि तें अवघें गोसावियांचिया दरीसना आलेः तवं गोसावियांसि पटिशाळें आसन असेः भेटी जालीः पानेपोफळे ओळगउनी नमस्कारू करौनि गोसावियांसि दंडवते घातलीः श्रीचरणां लागलेः गोसावियांपुढां बैसलेः गोसावी क्षेम पुसौनि काही निरूपण केलें: तेणें तपोशमन जालें: हर्षनिर्भर होतसातें गोसावियांची श्रीमूर्ति अवलोकीत ऐसें नावेक होतेः मग गोसावी तेयांसि पाठवणी दिधलीः रेमनायकः जोगनायकः सारस्वतभट हें तिघै निगालेः पदुमनाभीदेव राहीलेः पदुमनाभीदेव बैसलैचि होतेः गोसावी कृपादृष्टी अवलोकुनी स्तीति संचरिलीः तें भोगिलीः भंगलीः सारस्वतिभटां भोगनारायणाचां देउळीं दरीसन जालें होतें: म्हणौनि तें गोसावियांचिया दरीसना येतिः तयासवें पदुमनाभीदेवही येतिः तें नावेक चळबळेः बाइसां काही म्हणिये करूं लागतिः बाइसें म्हणतिः ‘‘बटिकाः येइजे होः बाबा निकेः’’ मग एकलैचि येवो लागलेः ऐसें गोसावियांचें सेवादास्य करूं लागलेः मग तें गोसावियांचिपासी असतिः सारस्वतभटाची सोय टाकीलीः सर्वज्ञें म्हणितलें ‘‘सुरी असेः तें निसिजेः इतुलेनि तेजां येः झळका करौनि पोगर आच्छादतीः आंबवती दीजे आणि झळक जाएः पोगर निवडतिः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 296
  • Beed : पदुमनाभी सन्निधानें सारस्वतिभटां शिक्ष्याभिमानु कथन :।।:
  • सारस्वतिभट देहा एका आड येतिः दिसां दो आड येतिः मग दिसां आठां येतिः बाइसें पुसतिः तरि ‘‘मी अमुकेया तमुकेयाचीया ठाया गेला होतां: तें आरायेचिनाः’’ ऐसें बाइसासि सांघतिः मग सारस्वतिभट न येतिः निच गोसावी उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें दक्षिणेस्वरा विहरणा बिजें करीतिः मागौतें बिढारा बिजें करीतिः ऐसां एकु दीं गोसावी दक्षिणेस्वराकडें बिजें केलें: बनीं आसन जालें: पासी पदुमनाभीदेव बैसले असतिः तिया वाटा सारस्वतिभट गंगेकडुनि गांवांकडें येतातिः गोसावियांतें देखिलेः आणि आडवा पालव गोसावियांवरूनि कानवडे कानवडे निगालेः तवं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः पैल सारस्वतिभट नव्हति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘होतिः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हे बाबातें देखौनि आडवे आडवे कां जात असति? हा ब्राम्हणः बाबापासी येउनि बैसेः दंडवत करी आता आडपालौ वोडौनी कानवडेकानवडे कां जात असति?’’ गोसावी श्रीकरें पदुमनाभीदेवांकडें दाखविलें: आणि म्हणितलें: ‘‘हा एथ असे म्हणौनिः’’ तवं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः हा एथ असे तरि यांसि आडवेया जावेया कारण काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा याचा शिक्ष्यः यांसि शिक्ष्याचा अभिमान वर्तत असेः हा एथ राहिला म्हणौनि तो एणेसि अभिमानु चाळतु असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हां बाबा एवंपर्येंत काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः शिक्ष्याभिमानु तो म्हेळीचीयापसि अधिकः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘तो कैसा बाबाः’’ याउपरि गोसावी पंचकौळाचार्याची गोष्टि सांघितलीः आणि म्हणितलें: ‘‘तरि तुम्हीं याचिए उठीबैसीचा अतिशयो न करावाः’’ यावरि जरठ इंद्रावणाचा दृष्टांत निरूपीलाः बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकाः तरि तू एथनि येः’’ तवं तिहीं म्हणितलें: ‘‘कां नकोः तो माझा काइ आणि मीं तयाचां काइ?’’ मग गोसावी बिढारासी बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 297
  • Beed : पदूमनाभीचा उपाहारूः वस्त्रपुजा :।।:
  • मग पद्मनाभीं मोटका गोसावीयांचिपुरता उपाहारू नीफजविलाः गोसावीयांसि वस्त्रपुजा केलीः ।।
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 298
  • Beed : रेमनायका भेटिः अनअवसरीं अवसरू कथन/भाषण :।।:
  • एकु दी पदुमनाभीदेवीं रेमनायकांपुढें गोसावियांची प्रशंसा केलीः तें ऐकोनि रेमनायक गोसावियांचिया दरीसना निघालें: गोसावियांसि पदुमनाभीदेव मर्दना देत होतें: तवं रेमनायक आलेः रेमनायक पटिशाळेवरि उभे ठेलेः कव्हणा एकातें पुसिलें: ‘‘गोसावियांसि कैसा अवसर असे?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘मर्दना होत असेः’’ रेमनायके म्हणितलें: ‘‘तरि गोसावियांपुढां जाणवाः’’ मग तेहीं गोसावियांपुढें जाणविलें: ‘‘जीजीः रेमनायक आलेः’’ गोसावी तेचि आसनीची जाडी एकुनी पांगुरुनी तथा कोंगतें घालुनि पडदणीसि बाहीरि बिजें केलें: पटिशाळेवरि उभे राहिलेः रेमनायक गोसावियांसि नोळखता पुसिलें: ‘‘श्रीचांगदेवोराऊळां गोसावियांसि अवसर कैसा असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसा असेः’’ म्हणौनि जाडी फेडुनि अवघी श्रीमूर्ति उघडी करौनि दाखविलीः मग तियेची पटिशाळेवरि आसन जालें: रेमनायकें दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: गोसावियांपुढां बैसलेः गोसावियांसि गोष्टि करीतिः तेवीचि पश्चात्तापु करीतिः ‘‘जीजीः अवसरू नेणेचि जीः मीं अनावसरीं आला जीः मियां गोसावीयांसि कैसा अवसर असे म्हणौनि सोधावें कीः मग मियां यावें कीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकोः तुम्हां अवसरू अनअवसरू नाहीं कीं:’’ रेमनायके म्हणितलें: ‘‘जी जीः आतां मर्दनां हों दीजो जीः मग मीं मागुता येइन जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हा अनावसरीं अवसर होः तुम्हीं भले तेव्हेळीचि यावें होः’’ यावरि गोसावी पदुमनाभीतें म्हणितलें: ‘‘कव्हणी एकु व्यवहारा असें: तो ब्राम्हणासि व्यतिपात दें: तयाचां दारवंठां ब्राम्हण राखत असतिः तो सारी खेळत असेः कां निजैला असेः एकाधा एकु उबगला म्हणें: ‘फळे मोडैल कां चेइलः’ ऐसें म्हणौनि उबगला जाएः मग फळे मोडे कां चेएः तो आंघोळी स्नान देवपूजा करीः ब्राम्हणासि व्यतिपात देः तो तया लाभां चुकेः’’ मग पाठवणीं जालीः गोसावियांसि मर्दना मार्जने जालें: मग तें प्रतिदीनी अवसर शोधुनि येति :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 299
  • Beed : कोलें घायेखंडी दाखवणें :।।:
  • एकु दिसीं उदेयाचां पूजावसर जालेयानंतरे गोसावी दक्षिण दिसें बनाकडें विहरणा सपूजीत बिजें केलें: तवं राजगुरु एकु आपुलेया शिक्ष्यां सरावुं देवों गेला होताः तो गरूडीकडुनि शिक्ष्यासहितु येत होताः बनातु नदीचां वाकाणी गोसावियांचें दरीसन जालें: गोसावी येत देखिलाः आणि तयाचां ठाइ गर्व देखौनि साधनेचें पाउल घातलें: आणि गरूडेयाचेनि साजेनसी ऐसा सराउवाचां अनुकार दाखविलाः आणि तेणें जाणितलें: मग साउमे येउनि आपुलीये होतचां चित्रिव कोलु गोसावियांचां श्रीकरीं ओळगवीलाः पांड दोनि मागुता सरलाः ‘‘देया रे दंडुः’’ म्हणौनि शिक्ष्याचीये हातीचां कोलु आपण घेतलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें भिक्षु कीं:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जी तें मीं जाणतों:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो कां:’’ म्हणौनि गोसावी कोल ऐसा दाखविलाः आणि झडकरौनि परजिलाः तेणेंही झडकरौनि परजिलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हाणः हाणः नायकाः’’ तो हाणता हाणे तवं गोसावी ‘‘हा नव्हे ऐसाः’’ म्हणौनि बदकरौनि चौरंगी घावो लाविलाः आणि कोलु ठेविलाः आणि तैसेचि निगालेः तोही सरिसा निगालाः गोसावियांतें विनंउ लागलाः तेणें म्हणितलें: ‘‘एकु दी घाखंडी दाखविजो जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां न दाखविजेः’’ ऐसें तेणें त्रिशुध्दी विनविलेः गोसावी निराकरिलेः मग राहिलाः तो निगालाः भक्तिजनी म्हणितलें: ‘‘कां न दखविजे जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोर प्राज्ञ असेः एकु दी दाखविजैल आणि कळौनि घेइलः घायाघाया प्राणियांतें ठेविलः म्हणौनि दाखविजेनाः’’ मग गोसावी रामनाथामागें बिजें केलें: तेथ आसन जालें: विहरण सारूनि बिढारा बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 300
  • Beed : सुंकीया जोगनायका दुःखा उपनीति :।।: / सुंकीया जोगनायका भेटिः दुःखनिवृत्ति :।।:
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी विहरणा बिजें केलें: विहरणानंतरें बिढारा बिजें केलें: बाइसीं भितरीं ओटयावरि जाडीचें आसन रचीलेः आसन जालें: बाइसें चरणक्षाळण करितें असतिः तवं सुकी जोगनायक महालक्ष्मीचेया दरीसना आलेः गोसावियांतें देखिलें: आणि दरीसनासरीसें सुख जालें: इतुलेनि गोसावियांकडें आलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायको याः’’ जोगनायके म्हणितलें: ‘‘जी जीः’’ मग पासी आलेः तिहीं दंडवते घातलीः श्रीचरणां लागलें: बैसलेः तथा श्रीचरणोदक प्रसाद होए म्हणौनि म्हणितलें: ‘‘जी जीः मज चरणोदक प्रसाददान होआवे जीः’’ गोसावी बाइसाकरवी चरणोदक देवविलेः तेंही चूळ दोनि भितरीं घेतलेः चूळ एक माथेयावरि घातलाः एतुलेनि तो गेलेः मग म्हणितलें: ‘‘जीजीः निवालो जीः माझे तागिेले जीः जळतचि होतां:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो काइसे नायको? ऐसें काइसेनि श्रमलेति नायको?’’ जोगनायके म्हणितलें: ‘‘जी जीः मीं मिरजेकडील उभयमार्गचा सुंकीः तेलंगदेशा गेलाः तेथ मज उभयमार्गचें सुंक होतें: ते मियां द्रव्य बहुत जोडिले जीः मग विचारिलेः आतां देशासि जावोः मां सोयराधायरीयांतु वेचूं: लेकासि व्वेव्हवर्‍हाडें करूं: ऐसें म्हणौनि बैलु भरूनि द्रव्य घेउनि येत होताः तवं एकी ठाइं मीं मागां राहिलाः जनु पुढेचि बैल तापटवीत जात होताः तें बडुवेनि बैलु फांकिलाः आणि घेउनि पळालाः तें द्रव्य गेलें: मग गावां आलाः घरीचा वेलुवाकु विकुनी गाठीमुदी विकुनी वडीलु पुत्रु सोवनहाटीं बैसविलाः तो मेलाः मग तेंचि भांडवल देउनि धाकुटा बैसविलाः तोही मेलां: ब्राम्हणीं मेलीः ऐसा दुःखिया जाला जीः तेणें दुःखे मीं अखंड जळतचि असें जीः तें दुःख विसरावेया देउळा जायें: संतामहंता संन्यासीयांपासी विद्वांशांपासी बैसेः तेथही सुख नाहीं: पूराण कीर्तनी आइकों जायेः तेथही सुख नाहीं: ऐसीं जे विश्रांतीस्थानें तेथ जाये परि कव्हणीं ठाइं सुखा न येः एथ आलां: आणि तो जातां देखत असे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पुरूखासि घरभंगुः पुत्रुशोकुः द्रव्यशोकुः ये तिन्ही असाहियें कीं नायकोः’’ ऐसें संबोखिलेः नावेक होतेः गोसावियांचें निरूपण प्रवेशन जालें: मग गोसावी पाठवणी दिधलीः तेहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: निगतां सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘नायकोः एथ येवों आवडे तेधवा येइजे होः’’ तवं तेहीं म्हणितलें: ‘‘तरी काइ जी? आतां मीं एथचि येइन जीः’’ मग नमस्कार करौनि निगाले :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 301
  • Bid : बाइसां महात्मेयांची वाट पाहाणें :।।: / बाइसांकरवी पाणीभातु साचवणें :।।:
  • एकु दीं बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः सांपें बाबाचीं भक्तें महात्मे कोण्हीं न येतिः आळसु लागतु असेः खंती लागत असे बाबाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हो बाइः तैसेचि एथही लागत असेः हें एथ असेः ऐसें कोण्हीं जाणेनाः आजी पाहे येतिः पाणीभातु साचाः अभ्यागतें येतें असतिः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ मग बाइसें पाणीभातु सांचू लागली :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 302
  • Beed : देवां: भटां भेटि :।।: / दादोसां: भटां भेटिः भक्ता आवाहनीं अनुज्ञा :।।:
  • दादोस आणि भट कांबखेडाहुनि बीडासि आलेः हाटवटीया जात असतिः विळीचा गोदरी भरली असेः दोहीं सूरकनी दिवे लागलें असतिः ऐसें जात असतिः तवं भटीं म्हणितलें: ‘‘कैसीं बरवीं चोखें पानें पोफळें: नारीएळें: बरवीं फळें: फुलें गोसावियांजोगी विकतें असतिः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘हो नागदेयाः गोसावी कव्हणीं ठाइं राज्य करीत असति? ऐसें नेणिजेः एर्‍हवी घेउनि जातों:’’ मग गेलेः एकांचां घरीं वसिनलेः उदेयाचि आटवलीये चिया घाटासि धोत्रें धुआवेया आलेः दादोस बैसलेः भट धोत्रें धुत असतिः गोसावीयांसि उदेयाचां पूजावसर जालेयांनंतरें महालखुमीएसि आसनीं उपविष्ट असतिः तवं दादोसीं उजाइ केलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः उजाइ महात्मेयाचीयासारिखीः महात्मा आला असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः महात्मा एथ काइ येइलः बाबाः महात्मे एथ नेणो किती असतिः’’ गोसावी प्रसनायकाची दुटी प्रावर्ण केलीः उठिलेः उपान्हौ श्रीचरणीं घालुनि सामोरे खिडकीयेपासी बिजें केलें: दोन्हीं द्वारशंका धरूनी अवलोकिलें: सूर्याचेनि तेजें गोसावियांची श्रीमूर्ति आणि दुटीचा प्रकाशु उदकांतु पडिला आणि तें छायाप्रतिबींब देखौनि भटीं मागुतें पाहिलें: तवं गोसावियांतें देखिलें: मग म्हणितलें: ‘‘दादोः दादोः गोसावीः’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ना क्यें असति?’’ भटीं म्हणितलें: ‘‘ना हें नव्हेतिः’’ तैसेचि दादोस धाविन्नलेः गोसावी पायरीया दोन्हीं उतरूनि सामोरें बिजें केलें: तवं भट साउमे आलेः गोसावी दादोसासि क्षेमालिंगन दिधलें: तवं भटीं मागिलाकडौनि क्षेम दिधलें: गोसावी ऐसा मागां श्रीकरू करौनि भटातें पुढां आणिलें आणि क्षेम दिधलें: गोसावी गुंफे बिजें केलें: दादोसः भट सरिसेचि आलेः गोसावियांसि बाइसीं आसन घातलें: दादोस भट पासी बैसलेः गोसावी उभयांतें क्षेम पुसिलें: तेहीं सांघितलें: दादोसीं भटाकरवी पूजाद्रव्यें आणविलीं: दादोसीं म्हणितलें: ‘‘नागदेयाः कालि म्हणतु होतासि तें करि जाएः’’ भटीं म्हणितलें: ‘‘हो कां:’’ मग भट हाटांआतु गेलेः पूजाद्रव्यें घेतलीः पानें पोफळेः नारीयळेः फुलेः कापूरः कस्तुरीः चंदनाचां गोळीयाः घेउनि आलेः चंदनाचिया वडीया परीतीलियाः तयाचा गोसावियांसि आडा रेखिलाः पूजा केलीः आणिली होतीं: तियें एक दोनिः गोसावी आरोगणा केलीः गुळळा जालाः विडा जालाः मग दादोसीं विनविलें: ‘‘जी जीः अवघीं भक्तिजनें गोसावियांची वाट पाहातें असतिः गोसावियांकारणें आर्तभूतें असतिः गोसावी कव्हणी ठाइं राज्य करितातीः ऐसें नेणिजे जीः तरि पर्वाकारणें तियें एथ बोलाउं? नागदेयातें बोलाउं धाडूं?’’ गोसावी मानिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘धाडाः’’ आणि बाइसातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुमतें पाणीभात असे?’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो बाबा असेः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे होः भुकैले असाल तरि नावेक पाणीभात घेयाः’’ तेही म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ दादोसः भट जेविलेः मग भटातें बोलाउं धाडिलेः भट साडेगावांसि गेलें: तयां अवघेयांतें सांघितलें: भटीं आधींंिच आपणेयां एकः दादोसां एकः ऐसीं दोनि वस्त्रें साडेगावीं विणविलीं होतीः आपणांतें दामें हीनः तें सरिसी घेतलीं: मग आबैसेः उमाइसें: भट ऐसीं बळ्हेग्रामासि आलीः तेथ उपाध्येः चांगदेवभटः गोंदोः माइंबाइसें: दायंबा होतें: भटः आबैसें: उमाइसें: सोभागबाइसें: द्रिढपुरूखः चांगदेवभटः गोंदोबाः दायंबाः ऐसीं अवघीचि आलीं: महादाइसें तियें पाडळीयेसि गेली होतीः तियें न वचतीचिः एरें अवघीचि आलीः दादोसाचेया बिढारा गेलीः दादोसांसी भेटि जालीः तियें दिवसीं पवितेपर्वाचा चतुर्दशुः उपाध्ये गोसावियांचिया दरीसना गेलेः गोसावियांसी भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागले :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 303
  • Beed : पर्वि पूजा स्वीकारू :।।:
  • तियें दिसीं बाइसीं पवितेपर्वाचा मंगळ उत्सव केलाः सकाळीचि सडासंमार्जनेः चौकरंगमाळीका भरीलियाः उपाध्यीं दादोसाचेया बिढारीं सिदोरि ठेविली होतीः तें जाउनी घेउनि आलेः तवं बाइसीं उपाध्यांतें पुसिलें: ‘‘बटिकाः महात्मेयांचां ठाइं पर्व वर्तत असे?’’ उपाध्यीं म्हणितलें: ‘‘हो बाइः वर्तत असेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘देखिले कीं बाबाः या रामासि काइ जालें? एथीचां एथ बाबा असतिः आणि आधीं आपुला ठाइं पर्व केलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः दोनिचारि भातवेळिती जालीतरि पोरा जीवाचें माथेया डोळें जातां वेळुचि न लगेः’’ बाइसीं उपाध्यातें म्हणितलें: ‘‘तरि तू कां आलासि?’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें ‘‘हें काइ बाइः या ऐसें म्हणिजेना कीं: हा हन चांगो हन एथचे कीं: हें तेथ कां जाति? याचां ठाइं ऐसिया ऐसिया चेष्टा नाहीं कीं:’’ एणें वाक्यामृतें उपाध्ये थोर निवालेः ऐसें गोसावी उपाध्यातें अति आत्मत्वें अंगिकरिलेः बाइसीं: उपाध्यीं: प्रसनायकें: चांगदेवभटीं: पदुमनाभीं गोसावियांचा ठाइं पर्व केलेः गोसावियांसी मर्दनामार्जनें केलें: पूजा केलीः अवघा पवितीं वाइलीं: गोसावीयांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः गोसावी आसनीं उपविष्ट असतिः ऐसा मंगळावसरु जालाः मग गोसावी उपाध्या पदुमनाभीदेवातें प्रधान करौनि व्यतिपाताचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु व्यवहारा असेः तथा रावोः तो ब्राम्हणासि व्यतिपात देः तयाचा दारवंठां ब्राम्हण राखत असतिः तो सारी खेळत असेः कां निजैला असेः एखादा एकु उबगला म्हणेः ‘फळे मोडैल कां चेइलः’ ऐसें म्हणौनि उबगला जाएः तवं फळे मोडे कां चेएः तो आंघोळी स्नान देवपूजा करीः ब्राम्हणासि व्यतिपात देः तो तया लाभा चुकेः तैसें परमेस्वरे औदास्य स्वीकरिले असेः कां पहूडले असतिः अनुसरला असे तो म्हणेः ‘औदास्य परिहरैलः कां उपहूडतिः’ ऐसें म्हणौनि बाहीरि जाएः तवं औदास्य परिहरेः कां उपहूडतिः तो तया लाभा चुकेः म्हणौनि धर्माचा दारवंठां ओळगिजेः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 304
  • Beed : देवक्षळीत वस्त्र स्वीकारू :।।: / दादोस वस्त्रपूजा स्वीकारीं अवीधि कथन :।।:
  • एरीकडें दादोसाचां ठाइं पर्व जालें: मां आपणेयांसि पूजा करविलीः भटीं दादोसांसि पूजा केलीः दादोसीं आपणेयासि पवितें वावविलें: आबैसें: उमाइसें: सोभागें: दायंबा गोंदोः भट दादोसाचां ठाइं पर्व करू लागलीः अवघां पवितीं वाइलीं: भटीं आपणेयांसि हीन वस्त्र विनविलें होतें: तें दादोसांसि वाइलें: एर दादोसाकारणें विणविलें होतें तें गोसावीयांलागी ठेविलेः मग दादोस गळां मुठि एकीं पवितीः सर्वांगी चंदनाची भोवरिः टिळाः गंधाक्षतां: शिक्ष्यांसहित गोसावियांसि पवितें वावेया डवरत निगालेः भटीं तें वस्त्र काखे सुदलें असेः दादोसीं पुसिलें: ‘‘नागदेयाः काखे काइ?’’ भटीं म्हणितलें: ‘‘ना वस्त्र:’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘वस्त्र काइसें?’’ भटीं म्हणितलें: ‘‘ना गोसावियांसि वावेयाः तुम्हांकारणें विनविलें तें गोसावियांकारणें ठेविलें: आपणेयांकारणें विनविलें तें तुम्हांसि वाइलेः’’ दादोसीं नेत्र वाटारूनि विकारें म्हणितलें: ‘‘मां तुज गोसावी काइ होति? गोसावी आमचे गुरुः आम्हीं गोसावियांसि वावें: तुवां आम्हासि वावें: सरः हें तुझें नव्हें: घेउनि ये आरूतें: मां वाये आम्हांसिः’’ म्हणौनि वाटेसीचि बैसलेः मग भटीं वाइलें: तेचि वस्त्र घेउनि तैसेचि गोसावियांपासी पवितें वावया आलेः गोसावी आसनीं उपविष्ट असतिः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: बैसलेः दादोसीं म्हणितलें: ‘‘जी आम्ही अवघे गोसावियांचां ठाइं पर्व करौनिः’’ गोसावी मानिलेः मग गोसावियांसि पवितें वाइलें: पूजा केलीः तें वस्त्र ओळगवूं आदरिलें: तवं गोसावी डावेनि श्रीकरें निराकरिलें: मग श्रीचरणापासी घडीसी ठेविलेः तेहीं गोसावी डावेनि श्रीचरणीचेनि आंगुठेनि परतें केलें: दादोसीं ऐसें आडवेतिडवें पाहिलें आणि बाइसां पवितें वाइलें: दंडवत केलें: मग बिढारां गेलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाणा पां गाः हा बाइसांसि पवितें वावों कां गेला?’’ भक्तिजनीं म्हणितलें: ‘‘ना जीः बाइसें वडीले म्हणौनि आणि काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें नव्हे कीं गाः एणें बाइसाचां ठाइं वावेः मग तुम्हीं अवघां याचां ठाइं वावें: पोरू कव्हण वडील ऐसेंही नेणें: बाइसापासौनि मीचि वडीलु ऐसेंही नेणें:’’ मग गोसावी तें वस्त्र धुवविलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिकाः हें वस्त्र धुनि आणा गाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘काइसेया धुववावें बाबा? हें वस्त्र नवेः वोहळविलेया विसाइलें ऐसें होइल कीः एकदोनि दिस तर्‍हीं वस्त्र पांगुळरजो कां:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पोरे आपुलें वोविळें वस्त्र एथ ओळगवीलें: आपुली आंगसिकें एथ वावों येत कीं न येति? एतुलेंही प्राणियांसि आपुलिया वीधिअवीधिचें ज्ञान नाहीं:’’ म्हणौनि मागील वृत्तांतु सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘प्राणियांसि आपुलेया इष्टा अनिष्टाचें ज्ञान नाहीं: काइ करितां काइ होइल? ऐसेंही नेणें:’’ यावरि बाइसे कोपलीं: घागरा बांधलाः तें वस्त्र वोहळुनि आणिलें: गोसावी तें भटाचें म्हणौनि प्रावर्ण केलें: यावरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘साजात्यां विषयात्मकाचें म्हणितलें केलेयां गोमटें नाहीं: तें कां? ना तें प्रतारक म्हणौनिः’’ यावरि गोसावी लाडाचिये बासीचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘वासरू तान्हैले होतें: तें पाणियाची ओल देखौनि आडाभवते भवेः वाटा लाडु जात होताः ‘बापुडी बासी तान्हैलीः’ म्हणौनि चहुं पायी धरौनि आडांतु घालीः तें जीवें जाएः तयासि नरक होतिः तैसा कव्हणी एकु संसारत्रसित महात्मवेष देखौनि जवळी जाएः तयाते तो प्रतारीः ‘हे अवघे तें तूचिः’ तयाही नरक होतिः तयाही नरक होतिः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 305
  • Beed : एकादसि सोभागाकरवि खाववणें :।।: / तथा हास्यक्रीडें खाववणें :।।:
  • एकु दीं गोसावियांसि दुपाहारीचां पूजावसर जालेयानंतरें आरोगणा जालीः पहूड जालाः उपहूड जालेयानंतरें गोसावी आसनीं उपविष्ट असतिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः बहुतें साचली असतिः नासतिः वेचिजतु कां?’’ गोसावी आणविलीः ‘‘बाइः घेउनि याः’’ आणिलीः वाटे केलेः गोसावी आबैसासि देत होतेः ‘‘बाइः घेयाः’’ आबैसी म्हणितलें: ‘‘जी जीः आजी एकादसीः आम्हां बारमासिया एकादसीः’’ गोसावी उमाइसांतें म्हणितलें: ‘‘ये तवं मासोपवासियेः एथ तवं काही म्हणावेचि न लगेः’’ मग सोभागांतें म्हणितलें: ‘‘बाइः खाल?’’ तवं सोभागीं म्हणितलें: ‘‘जी जीः मज एकादसीः मीं न खाये जीः’’ ऐसें अवघांचि निराकरिलेः मग गोसावी उगेचि राहिलेः नावेक जालेयानंतरें सोभागासि भूक लागलीः आणि तियें बाइसापासी आलीः म्हणों लागलीः ‘‘बाइः मातें गोसावी म्हणत होतें: ‘ं खाल?’ तवं मीया म्हणितलें: ‘जी जीः मज एकादसी असेः’ तवं आतां मज थोरी भूक लागली असेः’’ तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः इए काइ म्हणति असति?’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः हें ऐसें म्हणत असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सोभागे होः याः हें तुम्हां देइलः’’ तियें आलीं: पासी बैसलीः गोसावी बाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः आणाः’’ गोसावी मांडीयेवरि ऐसीं श्रीकरें धरूनि तयाचि मान घातलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आ कराः’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चांग आ कराः’’ तियें आ करीतिः गोसावी सोलेतिः वाटां साकर असेः तेथ घासु माखीतिः तयाचेया तोंडाकडें दाखवीति आणि श्रीमुखी घालीतिः आणि तियें म्हणतिः ‘‘हें काइ बाइकीये चाळविजता असिजे? ना गे आइ मातें चाळविजतें:’’ मागुतें म्हणतिः वेळा दोनि च्यारि केलें: पुढति म्हणितलें: ‘‘आ कराः चांग आ कराः’’ तिया म्हणितलें: ‘‘ना गे आइः आपण आरोगण करीत असिजेः आणि मातें चाळवीजतो बाइकीयेः’’ आणि तेहीं मांडीएवरूनि माथा काढीलाः तिया म्हणितलें: ‘‘आतां न खेळों बाइकीयेः’’ पुढति सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘याः आतां न चाळविजेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘ना बाइकीये चाळविजत असिजेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां चाळविजे तरि माल्हुबाइची आनः’’ मग गोसावी तयांसि धायेवरि खावविलीः मग गोसावियांसि श्रीकर प्रक्षाळण जालें: गुळळा जालाः विडा जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 306
  • आबैसां आपद्धर्मु/आपदिधर्म निरूपण :।।:
  • आबैसें उमाइसें रात्री निद्रास्थाना गेलीं: तयाचां घरीं अवघेयां उपवासुः तिहीं रात्री रांधिलें परंधिलेः दादुले जागरणा गेलेः घरीचीं अवघीं निजैलीं: तियें भानवसीं निजैलीं: पहाः दीढ रात्री भरली आणि आबैसां पिडा असप्त देखौनि उठिलीः तिहीं उमाइसांतें म्हणितलें: ‘‘उमैः उमैः मज थोरी पिडा उठिलीः बारमासिया एकादसीं करीं: एकवतें केलीं: दसवीं केलियाः नक्षत्र पारणी केलें: परि ऐसीं पिडा नाहीं कहीं:’’ तियें उगीचि होतीः मग आबैसीं कोपौनि म्हणितलेः ‘‘उमैः ये कां: मज थोरी पिडा होति असेः’’ मग तियें उठिलीं: डेरांचा भातु काढिलाः आसानीचा कांजी घेतलाः भातु सिंपीलाः मुटकळा वळुनि दिधलाः तिहीं भितरीं घेतलाः पाणियांचा चुळु भरीलाः एतुलेनि तयाची पिडा शमलीः मग निजैलीः नावेक गेलें: तवं उमाइसांही तैसीचि पिडा उठिलीः तिहीं म्हणितलें: ‘‘आबै आबैः मजही तैसीचि पिडा उठिलीः इतुके मासोपवास केलेः एतुकी एकवतें केलीः इतुकीं व्रतें कृछचांद्राएणें केलीः परि ऐसीं पिडा कहीचि नाहीं जालीः’’ तांहीं तैसेचि केलें: उदेयांचि गोसावियांचिया दरीसना आलीः तवं गोसावीयांसि दंतधावन जालें: गुळळा होत असेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पारणाइती बाइया साविया श्रमलियानाः भिक्षा अवसरू जाला मां: उसीरू जालाः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘काइसा अवसरू जी?’’ म्हणौनि मागील अवघें सांघितलें: ‘‘मग निद्रा आली जीः तैसेचि उमायेसि जालें जीः जी जीः आम्हीं तेयाचें आपसेयाची घेतलें: तरि काइ आम्हासि दोषु जाला जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तैसां अवसरीं तेतुलें घेतलेयां तैसा दोषु नाहीं: प्राणापदीची पिडा समे इतुकें मुठिभरी घेइजेः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागली :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 307
  • Beed : उमाइसां निरे निरूपण :।।: / तथा निरय निरूपण :।।:
  • एकु दीं उमाइसें ऐसीं खडकाकडें अवकाशा गेलीं होतीं: तवं एकी ठाइं माणुस अवकाशा बैसलें होतें: तयांसि किवीं पडिले असतिः वरि पाउसु पडिलाः तेणें कश्मळ वाहौनि गेलेः किवियांचा पुंजा उरलाः तें उन्हें सुळबुळ सुळबुळ करीत असतिः तयातें मुंगिया तोडतोडूं नेति होतियाः तें उमाइसीं देखिलें आणि कांटाळैलीं: आणि म्हणितलें: ‘‘अइ रेः गोसावी जे नरक निरूपीति तें ऐसें कीः ‘नरक नरकः’ ऐसें म्हणतिः तें एथचि मां:’’ बिढारा आलीः आबैसांपुढें सांघितलें: सांघतां गोसावी आइकीलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः मासोपवासीये काइ म्हणतें असति?’’ मग आबैसीं अवघे सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः जाणता एथचि नरकः नरक काइ दुरि असति?’’ मग गोसावी निरयांचा राशी निरूपीला :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 308
  • Beed : आबैसां अनंतु निरूपण :।।: / तथा अनंतु निरूपण :।।:
  • एकु वेळु अनंताचां चतुर्दशीं सायंकाळीच प्रहरा एका उपहूड जालेयानंतरें गोसावी आसनीं उपविष्ट असतिः तियें दिसी आबैसां अनंतव्रत असेः आबैसीं भटाकरवी पाटसुताचां अनंतु करविलाः गोसावियांलागी क्षीरीप्रधान उपहारू निफजविलाः आपणांलागौनि हविक्षान्न केलें: गोसावियांसि मर्दना दिधलीः मार्जनें जालें: बरवीं पूजा द्रव्यें आणिलीं: गोसावियांसि बरवी साष्टांग पूजा जालीः आबैसीं श्रीचरणावरि अनंतु ठेविलाः श्रीचरणां लागलीः ऐसा अनंताचा पूजावीधि तो गोसावियांचां ठाइ केलाः गोसावी अनंत ऐसा श्रीकरीं घेतलाः अवलोकिलाः दोहीं श्रीकरीं दोन्हीं सेवट धरिलेः आणि पुसिलें: ‘‘बाइः हें काइ?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः हा अनंतुः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः अनंतु तो काइ सुताचा? सोळा ताथुवाचां? चैदा गाठीचां? यांसि एकु सेवटु इकडें: एकु सेवटु इकडें: बाइः अनंतु तो काइ एवढा? आणि ऐसा? आदि अंत नाहीं तो अनंत कीं: जेथ अनंतु सामाए तेथ आणिकु न समाएः आणिकु सामाए तेथ अनंतु न समाएः कां अनंतु तो अनंतु कीं:’’ मग आबैसीं म्हणितलें: ‘‘जी अनंत ऐसें शेषशायी नारायणातें म्हणतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नारायणासि एक अंत असेः तो कैसा अनंतु होइल?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘जी नारायणासि अंत किती?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मायेचां रोमकुपीं एके भागीं अनंतें ब्रम्हांडेः तयां मध्ये एके ब्रम्हांडी विश्वरूपः तया विश्वरूपाचां गर्भी अष्टधा प्रक्रतिः तिचां सेवटीं नारायणः मां कें नारायण आणि कें मायाः मां मायेपरौता परात्पर परमेस्वरः ऐसा अनंतरूप परमेस्वर तो अनंत कीं:’’ ऐसें अनंताचें ज्ञान केलें: मग गोसावियांसि ताट जालें: गोसावी आरोगणा करितां आबैसाचें हविक्षान्न देखिलें: पुसिलें: ‘‘बाइः हें काइ?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘जी जीः हें हविक्षान्नः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणा आरूतें:’’ आणिलें: प्रसादु केलाः मग आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 309; 310
  • Beed : प्रसनायका चांदोवां ब्रह्मकथन :।।: / रूम्हणेयाचा दृष्टांत कथन :।।:
  • एकु दिसीं गोसावी महालक्ष्मीचेया देउळा विहरणा बिजें केलें: सवें बाइसें: भटः प्रसनायक हें मुख्य करौनि समस्त असतिः गोसावी चैकी उभे ठेलेः तवं कव्हणी एक चैकी चांदोवा केला होताः सेण मातीः लादीः हरीताळु आणिकही वर्त ऐसयाचीं फळें केलीं होतीः गोसावी भितरीं अवलोकीले तवं श्रीमुकुटीं चांदोवा लागलाः आंबेसारिखे आंबें: केळासारिखीं: नारीयळासारिखीं नारीयळें: बोरासारिखीं बोरें: जांबुळासारिखीं जांबुळें: ऐसीं फळें केलीं असतिः जो जयाचा वर्ण तो तैसाचि सारिला असेः भितरीं सेनमाती परि वानवतीचेनि ठकारें सजीवता आणिली असें: गोसावी तें सारिखें अवलोकूनि म्हणितलें: ‘‘परसयाः ए घेया गाः तुचीं ब्रम्हें:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ बाइसीं पुसिलें: ‘‘तें कैसें बाबा?’’ भटीं पुसिलें: ‘‘तें कैसें जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें ‘‘कव्हणी एकु क्षुधार्थि देउळासि येः’’ म्हणौनि चांदोवेयाचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु क्षुधार्थि देउळासि येः तवं चांदोवां आंबेंयासारिखें आंबें देखेः केळासारिखी देखेः नारिएळासारिखी नारिएळें देखेः जांबुळासारिखी जांबुळे देखेः तियें तोडुनि खावो बैसें: तवं सेणें मातीया तोंड भरेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसी गा इंद्रादिका ब्रम्हादिका देवतेची फळेः मूर्ते आणि च्युतिमतें आणि निरयदायकें: ऐसीं गा परसेयाची ब्रम्हें:’’ ‘‘कव्हणी एकु दुधाचें गुणविसेख आन्मोदीत होतें: तेथ जात्यंधु आला होताः तेणें पुसिलें: ‘हां गा दूध तें कैसें?’ ‘ते पांढरें:’ ‘पांढरें तें कैसें?’ ‘पांढरे तें बळ्हयासारिखेः’ ‘बळ्हे तें कैसी?’ ‘बळ्हे तें रूंभणेयासारिखीः’ ‘रूंभणें तें कैसे?’ ‘रूंभणे तें ऐसें:’ म्हणौनि हातु वाकुडा करौनि दाविलाः एकु दीं तेणें रूंभणें कोठां देखिलेः तथा आंगणीं देखिलें: हातु वांकुडा करौनि पाहिलाः ‘दूध तें हें:’ म्हणौनि पेवो लागलाः हिरडीया फुटतिः रगत निगेः ‘आरेः हें काइ करीतासि?’ ‘ना दूध पीतायेः’ ‘आरेः सांडिसांडिः हें रूंभणें हिरडिया फुटतिः’ ‘ना माझेनि बापें सांघितलें:’ दुःख होए परि न संडीः’’ मग गोसावी गुंफेसि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 311
  • Beed : अन्यवस्त्र प्रक्षाळणीं चांगदेवोभटां आज्ञास्वरूप कथन :।।: / चांगदेवोभटां धोत्रा ज्ञानस्वरूप कथन :।।:
  • चांगदेवोभट धोत्रें धों गेले होतेः धोत्रें धुतलीं: घडिया करीत होतेः तवं चाटे धोत्रें धों आलेः तिहीं म्हणितलें: ‘‘आरेः यांसि श्रीचांगदेवराऊळांची आण घालाः आणि हें आमचींहीं धोत्रें धुतिः’’ एतुलेनि चाटा एकु आलाः तिहीं म्हणितलें: ‘‘श्रीचांगदेवोराऊळा गोसावियांची आणः जरि हें धोत्रें धुआनाः’’ तें धुतिः तवं आणिकु येः तोही तैसेचि म्हणें: तयाचींहीं धुतिः ऐसीं अवघेयांचींही धुतलीः दोन्ही पाहार जालें: भागलेः भुकैलेः मग वाडावेळां आलेः गोसावी पुसिलें: ‘‘बटिकाः उसीरू कां लाविला?’’ तींहीं अवघें सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें ‘‘तुम्हीं एथ यावें कीं: तुम्हां धोत्रें धुआवेया काइ कारण? तुम्हीं तयातें एथ घेउनि यावें कीं:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आण देतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथचिये आणें हें समर्थ कीं:’’ यावरि गोसावी आज्ञा परिपाळणाचें निरूपण केलें: श्रीउद्धवदेवां आज्ञाभंगाची गोष्टि सांघितली :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 312
  • Beed : आपदेवोभटां निंबमाधुरीये करणें :।।
  • आपदेवोभट तें बळ्हेग्रामकारः कै गोसावियांचिया दरीसना आले होते हें नेणिजेः जगतिआंतु पसिमीली भितीसी पूर्वाभिमुख उत्तरदक्षिण पटिशाळः एकु दीं गोसावी तियें पटिशाळेवरि बिजें केलें: सरिसे आपदेवोभट मुख्य अवघीं भक्तिजनें असतिः पौळीसीं निंब होताः अर्ध बाहीः अर्ध आंतुः गोसावियांचीए गुंफेवरि निंबाचियां डाहाळीया गेलिया होतियाः गोसावी निंबाचें पान तोडिलेः आपदेवोभटासि दिधलें: ‘‘घेया गाः भागेयाः चाखा हें पान कैसें असे?’’ तिहीं चाखिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भागेयाः कैसें असे गा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः कडु असेः’’ मग गोसावी अमृत संजीवना कृपादृष्टी अवलोकुनी दुसरें दिधलें: आणि म्हणितलें: ‘‘आतां चाखाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः निंबुेचः मां निंबु काइ गोड असैलः कडु आणि काइ जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘चाखा पां:’’ तिहीं तें चाखिलें: तवं तें गोड साकरे ऐसें असेः मागौतें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भागेयाः कैसें असे गा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः हें गोड असेः’’ एतुलेनि गोसावी अवलोकुनी खांदीचि गोड केलीः तेही असिकी खांदीचि वोरपौनि खादलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोराः काइ खांदियासकट खासि?’’ यांत गोसावी ऐसें सांघितलें: ‘जे आपुलिया वासना खाल तरि कडूः आणि आमचियां वासना जेतुके खाल तेतुके गोडचिः’ मग अवघी भक्तिजनें ओरपूं ओरपूं खादलेः गोसावी हें लीळा करौनि वासनानिषेदु सांघितला :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 313
  • Beed : विद्यावंता भेटि :।।:
  • गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें आसनीं उपविष्ट असतिः विद्यावंत एक धोत्रः सेंडीः टिळाः जाणिवें ऐसा ब्राम्हणाचा वेषु धरूनि आलेः आंगी लेइले होतेः गोसावियांसि दरीसन जालें: तयासि गोसावी बरवा आदरू केलाः गोसावी उभे ठाकलेः अर्धासनी बैसविलेः बाइसांकरवी पाय धुववलेः टिळा उगाळविलाः मग तयासि गंधअक्षत करविलें: खारीकः खोबरें: चारवळीयाः फुटाणे ऐसें भातुकें वाटां घातलें: तिहीं खादलें: गोसावी वाटा उदक घालुनि देवविलेः तेहीं गुळळा केलाः तांबुळ दिधलें: मग तें अनुज्ञा मागौनि निगालेः गोसावी उभेया ठाकौनि अनुकरण केलें: तें गेलेः बाइसीं पुसिलें: ‘बाबाः यांसि ऐसा मानु केलाः तरि हें कव्हण?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें श्रीचांगदेवराऊळांचे अनुग्रहितः’’ बाइसीं पुसिलें: ‘बाबाः एक एळापूरा आलेः एक एथ आलेः हें ऐसें किती असति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें ऐसें तेथचे बावन विद्यावंत असतिः तेथौनि ऐसया बावना पुरूखां विद्यादानः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 314
  • Beed : दादोस गंगातीरप्राणी घाटप्रशंसा :।।: / देवांप्रति गीरीकपाटें प्रशंसा :।।:
  • एकु दीं विळीचां पूजावसर जालेंयानंतरें गोसावी निंबातळी आंगणी आसनीं उपविष्ट असतिः चांदिणें पडिलें असेः तवं दादोस आलेः सेंभरी दंडवतें घातलीं: नमस्कार करौनि पुढां पोफळ ठेविलेः मग गोसावी पुसिलें: ‘‘महात्मेयां: प्रभातें काइ गंतुकाम?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें घाटावरि कीं गंगातीरां?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः गंगातीरां:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होएः घाटु तो कोणासिं? जयाचा हृदयीं परमेस्वर वसे तयासि कीं: तुम्हा घाटु काइ होए? तुम्हां गंगातीरचि उचित होएः कां जे गंगातीरी नवीं नवीं अग्रारें: श्राद्धीं: सणीं: श्रद्धाधान लोकः सवें सातपांच भातवेळितीः बरवी सोपस्कार भिक्षाः बरवीं साल्योदनें: सरवळेयाचां नाखवेयाचेया खीरीः वरि वाटियाभरीभरी तुपाः पंचधारः साकरः पाटपिढी बैसावाः ताटीं ठाणवा जेवणः गंगातीर तुम्हांसीचि होएः’’ पुढति सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘घाटु तो कोणासिः जे अदृष्टार्थिएः परमेश्वपरायेण तयासि कीं: बरवी गिरी गहींवरें कपाटें: निर्झरोदकें: बरवे वृक्षांचें मांदाडेः बरविया मंजिष्टं छायाः संचरते चंद्ररश्मि ये सुखें कव्हणासिः जयाचेया हृदयी परमेश्वरू वसे तयासि कीं: बरवी रूखें: रूक्षेः भिक्षान्नें: निरसीविरसी अन्नें: ऐसें ठाए योग्य दमनसीळाः लहाना लहाना झाडाचें मांदाडें: कुहाची उदकें: ऐसीं स्थानें योग्य परमेश्वपरायेणासिः बरवी गिरीं गहीवरि कपाटें: सीळातळें: वाळुवंटें ऐसें प्रदेश योग्य त्यागीयासिः’’ मग तें म्लानवदन उगेचि निगालेः’’ बाइसीं पुसिलें: ‘बाबाः परमेश्वपरायेणु तो कैसा?’’ सर्वज्ञे म्हणितलें: ‘‘बाइः एकु पाउण आहारियाः एकु एकाहारियाः एका साधनचि न लागेः एकु दर्या एकु मात्रेचाः एकु संयमें वर्ते एकु प्रयत्नें वर्ते एकु आर्तिपूर्वक कांटिये एकीं तळीं शोकुनी पाडीः तयासि लवकरि इश्वर आपुली भेटि देतिः ऐसा जयाचा हृदयीं इश्वर आणि अदृष्टार्थिया तो परमेश्वपरायेण बोलिजेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पोरासि कीर्तिपर वैराग्य करूं आवडेः’’ यावरि गोसावी कीर्तिकठीयाचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु कठीया असेः तो भोगस्थानाची शुश्रुषा करीः झाडीः सडासंमार्जन करीः तें देखौनि गावीचें म्हणतिः ‘कठिये होः निकें करीत असाः बरवे करीत असाः’ तें आइकौनि दिसवडीचां दिसवडी हातुहातु चढवीः तयासि देवता आपुलें फळ नेदीः तयासि कीर्तिचेचि फळ जालें: तैसें अनुसरलेनि पुरूखे कीर्तिपर क्रिया कव्हणीचि न करावीः’’ बाइसीं दंडवतें घातली :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 315
  • Beed : आबैसां दिठीविधानां अनुज्ञा :।।: / आबैसे दिठी उतरणें :।।:
  • महालखुमीयेसि पर्वणी एकीं आलीः तेवीचि गोसावियांची प्रसिद्धि ऐकोनि तो लोकु अपारू दरीसना आलाहोताः तें गोसावियांचें दरीसन सकळ लोकां जालें: गोसावी दिठीची प्रवृत्ति स्वीकरिलीः श्रीमूर्ति अलौहितः नेत्र अलौहित जालें: श्रीमुख कामेाइलें: बाइसें चिंता करूं लागलीः आबैसीं बाइसांतें म्हणितलें: ‘‘बाइः गोसावियांसि दिठी जालीः श्रीमुख कोमाइलें: नेत्र अलौहित जालें:’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘तू उतरूं जाणसि?’’ आबैसीं म्हणितलें: ‘‘हो बाइः जाणें:’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘तरि उतरि कां?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो बाइः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः वृधाबाइसें काइ म्हणते असति?’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबासि दिठी लागली असेः ऐसें म्हणत असतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथ सांपे माणुसांची मांदी बहुत कीं: नाना वासनांचीं नव्हतीं माणुसें आलीं होतीं: मग बाइसीं गोसावियांतें विनविलें: ‘बाबाः वृधाबाइसांकरवी दिठी उतरवू?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उतरवाः बाइः ए पुत्राची माताः ए दृष्टी उतरूं जाणतिः’’ मग आबैसीं सातां घरिचि कुहिठी आणिलीः हळखुंडाची बाहुली केलीः थाळां पाणी घातलें: गोसावियांतें ओवाळुनि घागरी आंतु घातलीः हळदी सिंदफडेयाचियां पानावळिया सरकिया ऐसें ओवाळुनि सांडीलियाः ऐसें आबैसीं हळदीची दिठी उतरविलीः गोसावियांसि समाधानाची प्रवृत्ति जालीः मग श्रीमुख जैसें होतें तैसेचि प्रसन्न जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 316
  • Beed : सोभाग नामकरण :।।:
  • एकु दीं उदेयाचा पूजावसर जालेयानंतरें गोसावी आसनीं उपविष्ट असतिः जवळी दायंबा बैसले होतेः तवं माइंबाइसें गोसावियांचिया दरीसना आलीं: पानेपोफळे आसनावरि ठेउनि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः नमस्कार करूनी तियें पुढां बैसलीं असतिः गोसावियांची श्रीमूर्ति अवलोकितें असतिः तियेचिये परभत फाळा एसणें वेखंड ऐसें दातः आवेया ऐसीं डोइः तें देखौनि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तुम्हीं वरैतया पढिया?’’ तिया म्हणितलें: ‘‘हो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते कैसी?’’ तिया म्हणितलें: ‘‘तरि काइ जी? मीं वरैतयासि जीउ ऐसीं पढियें जीः आपण कोरडें खातिः तेल तूप मज सुतिः बरवे अशन आछादन तें मजचिः निउन तें आपणांसि करीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मां रे अपूर्व सोभागा मां: तरि तुम्हीं सोभाग म्हणाः’’ तिया म्हणितलें: ‘‘तेवीचि जी गाये दुभेः गाडुगाभरी दूध होएः आपण ताक जेवीतिः मज गाडुगाभरी दुधा रीचवीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मां रेः तरि तुम्हीं सोभागाचा गाडुगा म्हणाः’’ ऐसें गोसावी प्रसादिक नाम ठेविलेः तियें दिउनी सकळ भक्तिजन सोभागबाइ एणेंचि नामें पाचारीति :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 317
  • Beed : दायंबा सोभाग हास्यश्रवणें सोहदरत्व वीधि पुढारू :।।:
  • मग दायंबा सोभागातें हांसो लागलेः ‘‘ऐया माझेया सोभागाः माझेया सोभगेयाः माझेया सोभयाः माझेया सोगौरयाः माझेया सोभलेयाः माझेया सोगयाः एया माझेया सोभागाचेया गाडुगेया भरणेयाः’’ ऐसें हांसतिः मग सोभागीं म्हणितलें: ‘‘आतां उगा गाः’’ परि तें न र्‍हातिः मग सोभागीं गोसावियांतें म्हणितलें: ‘‘जी जीः हा भोजया मातें हांसतु असेः या वरिजो जीः हा मज हांसतें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सोभागे हो काइ म्हणत असति?’’ सोभागीं म्हणितलें: ‘‘जी काइ नेणो म्हणत असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भोजयाः काइ म्हणत असा गा?’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः ऐसें म्हणत असेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘उगे असा गा भोजयाः सोभागातें हांसा ना राभस्य करूं नयें: ज्ञानें राभस्य भोगितां वरि दरडी पडेः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘ना जीः हें आम्हां शक्य नव्हेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि तुम्हीं एथौनि जाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः हें वर होववैलः परि ना हांसणें अशक्यः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जा पडो वाटः’’ आणि सोभागाते म्हणितलें: ‘‘सोभागा हांसों द्याः’’ मग दायंबाते म्हणितलें: ‘‘हां गाः तुम्हीं सोभागातें हांसत असा तरि मेलेया काइ कराल?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘गोसावी काइ करीति?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘माबाहिणी वौजे तें हें करीलः पीतेयाबंधु मातेबहिणी जे कर्तव्य तें हें करीलः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीः पुत्रा वौजे करणीये तें करीन जीः सोभाग मरैल तरि मीं सोभागाचे आंगुठे बांधेनः किडडी करीनः किडडीयेवरि घालीनः तिकटें करीनः खांदी रीगैनः चैघांचा खांदी देइनः सरणावरि घालीनः भवते उदक देइनः घडा फोडीनः उंडीपिंडी देइनः सोभागाचा संस्कार करीनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जरि न करीसी तरि काइ?’’ मग दायंबाये म्हणितलें: ‘‘जी जीः तरि आतांची करूं? परि सोभाग मरेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोरूं आतांची म्हातारियेसि मारू पांत असेः’’ म्हणौनि इखित हास्य केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 318
  • Beed : भोजेया सरावीं चुकि :।।: / दायंबा सरावीं चुकि दाखवणें :।।:
  • गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें विहरणा बिजें केलें: गरूडीयेपासी पसिमे आसन जालें: गोसावी दायंबातें म्हणितलें: ‘‘भोजयाः तुम्हीं सरावुं करूं जाणा?’’ तेही म्हणितलें: ‘‘जी जीः जाणोः हें काइ जाणावे असे जीः काइ ब्रह्मविद्या?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ करौनि दाखवा पां:’’ मग दायंबाये वस्त्रे ठेविलेः गोसावियांतें दंडवतें घातलीं: आंगवणें पायवणें केलें: सराडेयाचा कोलु केलाः दाखविलेः वळण घेउनि परवडी दोनिचारि दाखविलियाः आलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भोजया होए गाः परि एक चुकलेतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘तें काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वेताळापुढें कोलु ठेउनि वेताळासि नमस्कारू विसरलेतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जी?’’ पुढति दायंबाए म्हणितलें: ‘‘हे काइ जीः आम्हीं वेताळासि काइसेया नमस्कारू करूं? आम्हीं आपुलेया गोसावियांतें करौनिः’’ आणि गोसावियांसि नमस्कारू केलाः दंडवते घातलीं: बैसलेः गोसावी इखित हास्य केलें: ए अर्थी गोसावीं सिंदेराणेयाचा दृष्टांत निरूपीलाः ‘‘कव्हणी एकु रावो असेः तो राज्यभ्रष्ट होएः तयाचा पाइकपरिवार कव्हणी कव्हणातें ओळगेः कव्हणी कव्हणातें ओळगेः सिंदेराणे तें सिंहासनावांचैनि कव्हणाते ओळगतिनाः कव्हणातें जयजय शब्दीं बोलावीतिनाः कव्हणाचें दिधलें नेघेतिः कव्हणाचीया हातातळी हात नोडवीतिः एकिपरीचा उद्यममात्र करौनि आपुलेया कुटुंबाचा निर्वाहो करौनि असतिः मग तो रावो मागौता आपुलेया राज्यीं बैसेः तयाचा पाइकपरिवार मागौता तयापासि आलाः एकु दी तो सिंहासनी बैसला होताः तेणें ऐसें पाहिलें: ऐसें पाहिलें: मग तेणें म्हणितलें: ‘हां गाः तुम्ही अवघे आलेतिः आमचे सिंदेराणे देखिजेतिनाः तें कें असति?’ मग तें सांगतिः ‘ते कव्हणाते ओळगतिनाः कव्हणाचेया हातातळी हात नोडवीतिः एकिपरीचा उद्यममात्र करौनि आपुलेया कुटुंबाचा निर्वाहो करौनि असतिः’ मग तो रावो दांडीडोळीकाः पाठउनी तयातें आणू धाडीः आपण सर्व दळेसि साउमा जाएः तयाते वाजत गाजत घेउनि येः मग अर्ध राज्य देउनि आपुलेया समान करीः तैसें अनुसरला पुरूख कव्हणाते ओळगेनाः कव्हणाते जयजय शब्दीं बोलावीनाः एकिपरीची क्षुधानिवृत्ति करौनि देहाचा निर्वाहो करौनि असेः मग परमेश्वरू तयासि सन्निधान देतिः अर्ध शक्ति देउनि आपणेया समान करीतिः’’ मग भक्तिजनासहित बिढारासीं बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 319
  • Beed : गोंदो माळ देणें :।।:
  • सत्यादेवीचें गोंदो तें बळ्हेग्रामकारः पर्वालागी गोसावियांचिया दरीसना आले होतेः तें म्हणतिः ‘गोसावियांचां श्रीकंठीं कैसी बरवी माळ मिरवत असेः गोसावी आपुली गळांची माळ मज देति कां तरि बरवें होतें:’ ऐसा अखंड मनोरथु करीतिः एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसरू जालेयानंतरें आंगणी आसन जालें असेः तवं गोंदो गावांसि निगालेः तेव्हेळी गोसावियांसि पुसावया आलेः दंडवते घातलीं: श्रीचरणां लागलें: मग गोसावी श्रीकंठीची माळ होतीते ‘‘गोंदोः माळ घेयाः’’ ऐसें म्हणौनि गोंदोचेंया गळां घातलीं: तेहीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ श्रीमुखीचें तांबुळ दिधलें: मग गोंदोनि म्हणितलें: ‘‘जी जीः गोसावी कैसें माः जीवीचें जाणीतलें जीः’’ म्हणौनि थोर सुखीये जालें: मग तें दंडवतें करौनि निगालेः तें अवघेयां माळ दाखवीतिः ‘‘मज गोसावी माळ दिधलीः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 320
  • Beed : भोजेया वखरीं चुकि :।।: / तथा(भोजेया) वखरीं चुकि :।।:
  • एकु दीं उदेयाचां पूजावसर जालेयानंतरें गोसावी विहरणा बनाकडें गरूडीउत्तरे बीजें केलें: तवं कुणबी आउत वाहातु असेः तेथ गोसावियांसि आसन जालें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भोजयाः हें तुम्हीं काही जाणा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘तरि काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वखर वाहों जाणा गा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हें आम्हीचि जाणो कीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘दाखवा पां: पावों:’’ मग सराडेयाचा वखरू केलाः दोरियांचे नाडे केलेः मां दाखविलें: परतने ऐसें दोनि एक परतिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भोजयाः आउत बरवें वाहिलें: परि एक चुकलेतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘तें काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘वोसान फेडूं विसरलेतिः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः’’ गोसावी इखित हास्य केलें: मग तेथौनि बिजें केलें: अनुलेस्वरीं नावेक आसन जालें: मग गुंफेसि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे बिडला येथे हे पहील्यांदा येने… स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे डोमेग्राम-घोगरगाव-बागडी-सुरेगाव-ब्राम्हनि-काऊळगाव-देउळना-चापडगाव-पारेगाव-कोळेगाव-पांगरीवरूण बिडला आले व बिडला स्वामींचे येथे ४ महिने वास्तव्य(अवस्थान) होते तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: