Barshitakali (बार्शिटाकाळी)

बार्शीटाकळी, ता. बार्शीटाकळी जि. अकोला


बार्शिटाकाळी येथील १ स्थान बार्शिटाकाळी गावातच माळीपूर्यात नदीच्या काठावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

बार्शीटाकळी हे गाव, अकोला मंळरूळपीर मार्गावर अकोल्याहून आग्नेयेस 16 कि. मी. आहे व मंगरूळपीरहन वायव्येस 48 कि. मी. आहे. पातूर ते बार्शीटाकळी मार्गे कापशी 24 कि. मी. आहे. पातूर ते बार्शीटाकळी पायमार्गे (राजंदा मार्गे) 20 कि. मी. आहे. बार्शीटाकळी हे पूर्णा खांडवा लोहमार्गावरील रेल्वे स्थानक आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान बार्शीटाकळी गावातील माळीपुरा विभागात विद्रुपा नदीच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे उत्तरेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना पातूरहून बार्शीटाकळीला आले. त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 148, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून एळवणला गेले.

मंदिराच्या मुख्या प्रवेशद्वारातील स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या पूर्वेचे परिश्रय स्थान


निर्देशरहित स्थान : 1


बार्शीटाकळीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 148
  • Barshitakali : टाकळिये उत्तरेश्वरीं वसति :॥:
  • तेथौनि गोसावी टाकळीयेसि बीजें कैलें: गावां इशान्य कोनीउत्तरेश्वराचां देउळी आसन जालें: बाइसी चरणक्षाळण केलें: उपहार निफजविला: दुपारचा पूजाअवसर केला : आरोगणा जाली: गुळळा जाला: विडा ओळगविला: पहुडः उपहुड जाला: विळीचां पूजावसर जाला : वसति जाली:।।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: