BagPimpalgaon (बागपिंपळगाव)

बागपिंपळगाव, ता. गेवराई, जि. बीड.


येथील स्थान हे पिंपळगाव च्या वायव्येकडे शेतात असलेल्या मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

बागपिंपळगाव, शहागड गेवराई मार्गावर शहागडहून दक्षिणेस 9 कि.मी. आहे व गेवराईहन उत्तरेस 3 कि.मी. आहे. खामगाव ते बागपिंपळगाव 8 कि.मी. बागपिंपळगाव येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान बागपिंपळगावच्या वायव्येस 200 मीटर अंतरावर श्री. प्रल्हाद साळीकाम कोटंबे यांच्या मळ्यात पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय,

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गेवराईहून बागपिंपळगावला आले. मग भक्तजन भिक्षा करून आले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला. (पू. ली. 524, स्था. पो.) त्यानंतर ते येथून खामगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


बागपिंपळगावचे स्थान :1


  • Purvardha Charitra Lila – 524
  • Pimpalgaon (Bag) : पींपळगावीं मळां आरोगणा :।।:
  • बारसीचां दिसीं गोसावी पींपळगावां बिजें केलें: गावांउत्तरें मळां: तेथ पींपळातळीं आसन जालें: बाइसें मुख्यकरौनि अवघीं भक्तिजनें बारसीची भिक्षा करौनि आलीं: कामधेनु दृष्टीपूत केलियाः मग बाइसीं गोसावियांसि पूजावसरू केलाः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः भक्तिजनासि जेवणें जालीः नावेक पहूड जालाः मग गोसावी तेथौनि बिजें केलें :।।
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)वरुण पिंपळगाव(बाग)ला आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: