Bagadi (बगडी)

बगडी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान जुन्या ओसाड बगडी गांवाच्या दक्षिणेकडे आहे.


जाण्याचा मार्ग :

जुन्या ममदापूरहून पूर्वेस जुनी बगडी 3 कि.मी. आहे, व नव्या बगडीहून दक्षिणेस जुनी बगडी 3 कि.मी. आहे. नव्या बगडीपर्यंत जाण्यासाठी गंगापूरहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान जुन्या ओसाड बगडी गावाच्या दक्षिण विभागी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे मढ होता. त्या मढातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात व उत्तरार्ध काळात असे एकूण दोन वेळा बगडी येथे आले. पूर्वार्ध काळात ते कानडगावहून बगडीला आले. (पू. ली. 387 ख. प्र.) व उत्तरार्ध काळात जामगावहून बगडीला आले. (उ. ली. 245 ख. प्र. स्था. पो. उ. को. प्र) दोन्हीही वेळेस त्यांचे या ठिकाणी एक एक रात्र वास्तव्य होते. पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून जामगावला गेले व उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून ममदापूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


बगडीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Bagadi : बागडीये मढीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने… स्वामी यावेळी डोमेग्राम-घोगरगाव-नेउरगाववरूण आले व जांबुगावकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Bagadi : बागडीये मढीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे :॥: येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी यावेळी . स्वामीचे भिंगार येथे १५ दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी पिंपळगाव-पापविनासिनि-सोनैये-भालगाव-भालगाववरुण येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Bagadi : बागडीए मढीं वस्ति :।।:
  • (टिप – पूर्वार्ध परिभ्रनण काळातही बागडी ता. गंगापूर येथे आलेले होते. उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामिंची येथे येन्याची स्वामींची ही दुसरी/तिसरी वेळ होइल…..)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: