Asthamahasidhi (अष्टमहासिद्धी)

अष्टमहासिद्धी, ता. अचलपूर जि. अमरावती


अष्टमहासिद्धी हे गांवाचे नसुन स्थानाचे नाव आहे, येथील 2 स्थाने एकाच परिसरात आहेत, आता येथे मोठे मंदीर बांधकाम झालेले आहे. 1 स्थान मांडलीक आहे ते आंघोळीच्या विहीरीजवळ विशेष बसऊन नवीन तयार केलेले आहे.


जाण्याचा मार्ग :

अष्टमहासिद्धी हे ठिकाण, अमरावती – परतवाडा सडकेवर अमरावतीहून वायव्येस 46 कि. मी. आहे व परतवाड्याहून दक्षिणेस 4 कि. मी. आहे. रिद्धपूर ते अष्टमहासिद्धी 30 कि. मी. आहे. अष्टमहासिद्धी बस थांब्यापासून पूर्वेस एक कि. मी. अंतरावर अष्टमहासिद्धी हे ठिकाण आहे. अचलपूरहून पूर्वेस अष्टमहासिद्धी 3 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील दोनही स्थान.

1. अष्टमहासिद्धीशी खेळ करणे स्थान :

हे स्थान पश्चिमाभिमुख देवळात आहे.

लीळा : 1. श्रीगोविंदप्रभुंनी येथे अष्टमहासिद्धी देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्रत ली. 67)

2. शोधकारांच्या मते आमच्या सर्वज्ञांना येथे आसन झाले. (स्था, पो.)


2. अवस्थान स्थान :

हे स्थान अष्टमहासिद्धीशी खेळ करणे स्थानाच्या वायव्येस दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : एकांकामध्ये, रामदरणा राजा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना अचलपूरला घेऊन जात होता. नगरात प्रवेश करण्यासाठी मुहर्त नव्हता. त्यामुळे येथेच तंबूमध्ये त्यांचे तीन रात्र अवस्थान झाले. मुहूर्ताची वेळ झाल्यावर सर्वज्ञ पालखीमध्ये बसून अचलपूर नगरात गेले. (पू. ली. 74, स्था, पो.)


देवळाच्या नैर्ऋत्येची विहीर अवलोकनीय असल्याचा उल्लेख स्थान पोथी व लीळाचरित्रात नाही. विहिरीच्या जवळील स्थान मांडलिक आहे.


अष्टमहासिद्धी येथील एकूण स्थाने : 2

  • Purvardha Charitra Lila – 75
  • Asthamahasidhi : अळजपूरीं अवस्थान :।।: तथा विनतीस्वीकारें अळजपूरीं आवारीं अवस्थान :।।:
  • रामदरणेनि गोसावियांतें विनविलें: ‘‘जी जीः अळजपूर निके असे जीः सुंदर आणि पूराणप्रसिध्दः तेथ तिनी गंगाः नवदुर्गा अकरा स्वयंभ स्थानें बरवी असतिः सिद्धसाधकांजोगे बरवें लाखारबनः बरवीं देउळें असतिः बरविया वनस्थळीया असतिः’’ ऐसें बहुती परि विशेषुनि म्हणितलें: ‘‘जी तें राऊळासिचि क्रीडा/कृडावया योग्यः तरि तेथ गोसावी बिजें करावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ पूर्वदृष्ट असेः’’ रामदरणेनि म्हणितलेः ‘‘तरि माझेया कुटुंबासि दरीसन देयावें जीः माझी माता गोसावियांचिया श्रीचरणां तुळसी वाइल जीः माझीए मातेसि इष्ट देयावें जीः जी जीः तेथ बिजें करावे जीः’’ गोसावी विनवणी स्वीकरिलीः तेणें वस्त्रें ओळगवीलीः अलंकार ओळगवीलेः गरूड घोडा गोसावियांलागी दिधलाः वेगळे दूस ओळगवीलेः हडपीः सागळीयाः चवरधरः भोइः मादुरीः सुआरः बडवाः वेंचकरः थोटेः मैळवटे ऐसें दाही सेवक दिधलेः गोसावी जैसे राज्यधर्म स्विकरावे तैसेचि स्विकरिलेः गोसावियांचा परिवारू गोसावियांसरिसा वेगळा चालें: मार्गी गरूडा घोडेयासि स्तीति होएः तेणें गति क्षाळेः उभे राहिलयावाचैनि सरेचिनाः मग गोसावी एकाधी शास्त्रीची कां राजकी गोष्टि सांघतिः जें उभे राहिलेयावाचैनि आइकोंचि न येः रामदरणा गोसावियांसि पुसेः गोसावी सांघेति तें साच होएः तवं घोडेयाची स्तीति भंगेः मग गोसावी साउमे बीजें करीतिः ऐसें पेणोवेणां बिजें केलें: खेडीं जानापेया वरिलीकडें पसिमीली पाळीं मेळीकार जालाः तेथ वस्ति जालीः तेथ गोसावियांसि मर्दना मादनें जालें: पूजा आरोगणा जालीः गुळळा जालाः कापूरें निबंधु विडा जालाः प्रभाते पालाणिलें: वाद्यंत्रें लागलीः गोसावी देउळवाडेयां पेणे केलें: काजळेस्वरामांगा उत्तरें मेळीकार जालाः मर्दनामादनेः पूजावसरः आरोगणाः गुळळाः विडाः पहूडः उपहूड जालाः मग काजळेस्वरां बिजें केलें: तेथ चैकीं आसन जालें: रामदरणेनि अळजपूरा लिखिते पाठविलीः जें ‘अवघें नगर श्रृंगारावें: अवघी आइत करावीः’ सर्व मोहोत्सावो आरंभिलेः अळजपूर श्रृंगारविलें: एरी दिसी गोसावी अळजपूरासि बिजें केलें: गोसावियांसि नगराआंत बिजें करावया मुहुर्त नाहीः जव मुहुर्त निगे तवं नगरापूर्वे बनांत अष्टमहासिद्धी त्रीरात्री अवस्थान जालें: रामदरणेनि गावांत निरोप पाठविलाः घरोघरी सडासंमार्जनेः चैकरंगमाळीकाः गुढीयाः तोरणें: मखरें उभिलीः चळदृपा पताकाः चांदोये वितानेः राजबीदी उदकें सिंचीलियाः मंगळवाद्ये लाविलीं: मुहुर्ताची वेळ जालीः गोसावी दांडियेवरि आरोहण जालें: वाद्यंत्रे लागलीः मग अंबीकापूरा बीजें केलें: तेथ नावेक आसन जालें: तेथ गावीचा लोकु साउमा आलाः मग मानियेः मंडळीकः प्रधानः महाजनः आणि पूरजनः ऐसें आपुलेनि वर्गेसं बहुतें बडिवारें अंबीकापूरासि आलेः तेथ भेटि जालीः जे येति ते श्रीचरणावरि माथे ठेवीतिः घोडीं: लुगडीं: श्रेष्ठ अलंकारः उत्तमें पक्षीकुळें: अरण्याआंतुलें चतुष्पदें: ऐसें जयातें जें जें अपूर्व फळें पुष्पें आदिकरौनि ते तें समर्पीतीः रामदरणे म्हणतिः ‘‘गोसावियांसि ओळगवाः’’ आणि तें ओळगवीतिः ऐसिया परि यथावीधि गोसावी अंगिकरीलीयाः मग एकी त्यागा देतिः एकी ठेवीतिः एकी जयाचा तयासिचि देतिः एकांसि आपुलें दिधलें पाहिजे तरि तैसें करीतिः तें देखौनि रामदरणां म्हणितलें: ‘‘पूराणांतरीं आइकतों: वर्तमानी तरि महाराजांचा ठाइं न देखों: परि हें अंगिकरीति राजलीळेची परि क्वचित नास्तिः’’ ऐसें बहुत चमत्करलेः मग अवघेयांसि गंधाक्षता केलियाः वीडे देउनि पाठविलेः मग गोसावी निगालें: तें लोक मागां गोसावियांचिया अपूर्वा कथा करीतिः अनेकें परिं विशेषीतिः ‘‘हां होः तुम्हीं ऐसें कैं देखिलें:’’ आणिक म्हणतिः ‘‘आहों हें स्वप्न जालें:’’ ऐसें पूरजनासीं दरीसन देउनि संतोखातें पावविलें: गोसावी नगरांतु प्रवेसलें: तेथ नगरीचिया स्त्रिया ओवाळू आलीयाः गोसावियांसि दरीसन जालें: जे भेटि तियें गोसावियांसि ओळगवीः गोसावी जेथची तेथ देतिः मग रामदरणा घोडेयावरि बैसलाः मां गोसावियांपुढां राउताइची आंगे दाखवीः घोडा दाखवीः गोसावियांपुढां राउतः पाइकः गोसावी नगरांत उभिया हाटवटीया बिजें केलें: मग नगरबाइला ताटें घेउनि वोवांळुं आलीयाः जयांसि बाहीरि निर्गमन नाहीं तिहीं माडयाउपरियावरूनि तवंगावरूनि निरार्जिलेः ओवाळणी करौनि पाने पुष्पें फळें वस्त्रे ओवाळुनि टाकीतिः सेवक आणि मागते अभर जालें: ऐसा अवघीयां स्त्रीजनासि दरीसन देउनि परम संतोखातें पावविलीयाः रामदरणेयासि भेटी ये तें रामदरणा गोसावियांसि ओळगवीः गोसावी इकडीलाची भेटि इकडीलासि देतिः कदाचित जेथची तेथ देतिः कव्हणी म्हणें ‘हे रामदरणाचे गुरुः’ कव्हणी म्हणे ‘हे रामदरणाचे जावांइः रामदरणेयाते लेकी वाढत असे हें जावाइ करावेया आणिले असतिः’ गोसावियांपुढां भाट सासले पवाडे पढतिः वाद्यंत्राचा एक नाद जालाः मग गोसावी राऊळगणाचा दारवंठां पावलें: तेथ गाणें भाटें बहुरूपीः कळावंतें: किंभवनोक्त जेतुकीही कळापात्रें: तियें तेथ राहाविलीः आणिकही उपाधीक ओळगणे तेही राहाविलेः मग गोसावी आणि राजाआंगलगेंसि राऊळगणांतु प्रवेसलें: राऊळगणाचिये सभेसि बैसका जालीः तेथ माता मुख्यकरौनि रानवसाः समस्त संबंधीकः कणकाचा परीयेळीं रत्णाचा दीपीः अन्येका पुष्प जातिः फळ जातिः अनेक उत्तम वस्त्रें ऐसा पूजावीधि केलाः ऐसा तो अनुपम्य मंगळकाळु जालाः मग गोसावियांसि सभामंडपीं शेष भरीलीः तेथ रामदरणेयाचीया राणीया ओवाळावेया आलीयाः माता आलीः श्रीचरणां तुळसी वाइलीः तेहीं तैंलागौनि तोचि नेम घेतलाः मग मर्दनामादनें पूजा आरोगणा जालीः मग गोसावियांसि रामदरणेयाचीये देव्हारचैकीये दुर्गात अवस्थान जालें: मास दहाः गोसावी तेथ राज्यधर्म स्वीकरिलें: धानुबाइचा आवारू आणि रामदरणेयांचा एकुचि आवारूः दुर्गांत दुसरा आवारी रामदरणांची दुसरी राणी होतीः तेथ गोसावी बिजें करीतिः गोसावियांसि मर्दनामादने होएः आरोगणा होए :।।:
  • (टिप: अचलपूरला स्वामि पहिल्यांदा भांडारेकारासोबर आले होते. यावेळी स्वामि रामदरना राज्या सोबत दुसर्यांदा आले.)




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: