Ashti (आष्टी)

आष्टी, ता. आष्टी, जि. बीड.


येथील स्थाने ही आष्टी गावाच्या पूर्वेकडे तलवार नदी आहे, त्या एदाच परीसरात ही 6 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

जाण्याचा मार्ग: आप्टी हे गाव, अहमदनगर बीड मार्गावर अहमदनगरपासून आग्नेयेस 60 कि. मी. आहे व बीडहून नैर्ऋत्येस 83 कि.मी. आहे. जामखेड ते आप्टी 17 कि.मी. पारगाव ते आष्टी 11 कि.मी. पारगावहून उत्तरेस आष्टी पायमार्गे (वाळूज मार्गे) 9 कि.मी. आहे. आष्टी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच जामखेड मार्गावर गीता आश्रमही आहे. आष्टीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील 6 स्थान एकाच मंदिरात आहेत.)

1. कुडी वसती स्थान :

हे स्थान आष्टी गावाच्या पूर्वेस दोन फलांग अंतरावर तलवार नदीच्या पलीकडे पूर्वाभिमुख देवळात आहे. मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे हरिश्चंद्राचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.


2. मर्दना स्थान :

हे स्थान देवळाच्या दरवाजापासून पूर्वेस 8 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञांचे विनायकाच्या देवळात क्षौर झाल्यावर त्यांना येथे मर्दना झाली. (पू. ली. 357 ख. प्र.)


3. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानापासून उत्तरेस 9 फूट 3 इंच अंतरावर आहे.

लीळा : मर्दना झाल्यावर येथे मादने झाले. (पू.ली. 344,स्था.पो.)


4. जगतीच्या दारवठ्यातील स्थान :

हे स्थान मादने स्थानापासून आग्नेयेस 8 फूट 2 इंच अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे चरणचारी उभे राहत (स्था. पो.)

जगतीच्या दारवठ्यातील स्थानाच्या उत्तरेस पश्चिमाभिमुख देवळात एक स्थान आहे. लीळाचरित्राच्या एका पोथीनुसार तेथे मादने झाले. ही पोथी म्हणजे डॉ. वि. भि. कोलते यांनी लीळाचरित्राच्या पूर्वार्ध विभागाच्या संपादनासाठी स्वीकारलेली गो2 प्रत होय,


5. क्षौर करणे स्थान :

हे स्थान मर्दना स्थानापासून दक्षिणेस 23 फूट 6 इंच अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे विनायकाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : येथे एका न्हाव्याने सर्वज्ञांचे क्षौर केले. बाइसा त्याला एक दाम देत होत्या; परंतु त्याने घेतला नाही. (पू. ली. 357, ख, प्र. स्था. पो.)


6. स्थान :

क्षौर करणे स्थानापासून पूर्वेस 9 फूट 7 इंच अंतरावर एक स्थान आहे. एका वासनेप्रमाणे तेथे सर्वज्ञांचे क्षौर झाले. (स्था. पो. उ. प्र.)




अनुपलब्ध स्थान :

1) परिश्रय स्थान


आष्टीची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila – 344
  • Aasti (Beed Distt) : आसुटिये हरिचंद्रीं वसति :॥:
  • मग गोसावी उदेयाचि आसुटिये बीजें केलें: तेथ गावांतु मार्जनें जालेंः हरिचंद्रीं वसति जाली :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने… स्वामीचे रामदरा येथे २० दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळिवरुण आष्टीला आले…)
  • Purvardha Charitra Lila – 344
  • Aasti (Beed Distt) : विनायकीं (आसुटीये) क्षौर करणे :।।:
  • एरी दिसीं विनायकीं उदेयांचि आसन असेः बाइसीं म्हणितलें: ‘बाबा क्षौर जालें: तरि न्हावी बोलाउं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बोलावाः’’ बाइसी उपाध्याकरवी भला संभावनिकु म्हाला बोलाविलाः तया एक दाम देउं केला म्हणौनि तो आलाः तवं गोसावियांची श्रीमूर्ति देखौनि क्षोभलाः आणि म्हणितलें: ‘‘याचें क्षौर माझेनि नव्हवेः गोसावी रावो कां देवो होति?’’ गोसावीचि म्हणितलें: ‘‘या तुमचेनि होववलिः’’ मग तयाचा क्षोभ फिटलाः गोसावियांचें क्षौर मुख्य बरवी सेवा केलीः बाइसीं तयासि एक दामु दिधलाः परि तो नेघेचिः मग गोसावी बाइसाकरवी तयासि जेउं घालविलेः तो जेविलाः विडा देवविलाः मग श्रीचरणां लागौनि निगालाः गोसावियांसि आंगणीं मार्जनें जालें: पूजाः आरोगणाः गुळळाः विडाः पहूडः उपहूड जालाः वस्ति जालीः दुसरी वस्ति गावांतु जालीः तो म्हाला देहपर्येंत तेही हातीं आणिकाची सेवा न करीचिः कोण्ही पुसतिः ‘‘कां न करीसि?’’ तो सांघौनि म्हणेः ‘‘एहीं हातीं तेया पुरूखाची सेवा केलीः आतां तें हस्त आणिकांसी लाउं न येतिः तें भेटति तैचि करीनः’’ ऐसा व्रतस्थु जालाः ऐसा तो अतिकणवेचाः तयांसि बहुत खावेया जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे पहील्यांदा येने… स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात रामदरा येथे २० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी मात्रकौळिवरुण आष्टीला आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: