Ashti (आष्टी)

आष्टी, ता, भातकुली जि. अमरावती


येथील 2 स्थाने एकाच ठीकाणी आहेत - आष्टी येथील 2 स्थाने आष्टी गावाच्या पश्चिमेकडे मंदीरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

वाकीहून किंचित ईशान्येस आष्टी (चिंचखेडा, हातखेडा मार्गे), 9 कि, मी. आहे. हा पायमार्ग आहे. आष्टी हे गाव, अमरावती – परतवाडा मार्गावर अमरावतीहन वायव्येस 19 कि. मी. आहे व परतवाड्याहन किंचित आग्नेयेस 31 कि. मी. आहे आष्टी येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान आष्टी गावाच्या पश्चिम विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे महालक्ष्मीचे देऊळ होते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात टाकरखेड्याहून आष्टीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. येथे आल्यानंतर बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या. “बाबा वेचू संपला.” सर्वज्ञांनी चांगदेवभटांना आडकित्ता 16 दामाला गहाण ठेवण्यास सांगितले. बाइसा म्हणाल्या, “बाबांना एकच आडकित्ता आहे, तो एकदा गेल्यावर पुन्हा काही परत येणार आहे?” सर्वज्ञ बाइसांना म्हणाले, “बाई, या देवतेखाली सात लोखंडाच्या कढई द्रव्याने भरलेल्या आहेत; परंतु ते काढण्याची आमची इच्छा नाही.” मग चांगदेवभट गेले. एका वाण्याकडे सोळा दामाला आडकित्ता गहाण ठेवला. आठ दामाचे सामान घेतले. आठ दाम रोख आणले. मग बाइसांनी उपहार तयार केला. सर्वज्ञांना पूजा आरोगणा झाली. (पू. ली. 172 स्था. पो.)


2. पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून ईशान्येस 6 फूट अंतरावर आहे.

लीळा : पूजा, आरोगणा, पहूड, उपहड, झाल्यावर सर्वज्ञांना येथे आसन होते, त्यावेळी ज्या वाण्याकडे आडकित्ता गहाण ठेवला होता, तो वाणी देवतेच्या दर्शनाला आला. त्याने सर्वज्ञांना पाहिले. पिशवीतले 16 दाम काढून अर्पण केले व आपला आडकित्ता घेऊन येण्यास सांगितले. मग सर्वज्ञांच्या आज्ञेवरून चांगदेव भट आडकित्ता घेऊन आले. (पू. ली. 172) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून वाठोड्याला गेले. 

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील दोनही स्थाने.


आष्टीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 172
  • Aasti : आसुटीये द्रव्यकथन :।।: / आसुटीये महालखुमीये वस्तिः द्रव्य
  • गोसावी आसुटीयेसि बिजें केलें: महालखुमीएचें देउळ उत्तरामुखः तेथ महालक्ष्मीचां देउळी राहिलेः बाइसीं चरणक्षाळन केलें: विडा ओळगवीलाः गोसावी तीं दिसांचा वेचु घेतला होताः तो सरलाः बाइसांजवळी वेचावेया काहीचि नाहीं: तीनि रूके उरले होतेः तें मागाचि सरलेः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः वेचु सरलाः वेचावेया काहीचि नाहीं: काइं करू?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिका जा गाः सोळा दामी पोफळफोडणा गाहाण ठेवाः आठा दामाचा वेंच आणाः आठ दाम रोख आणाः’’ तेही म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ बाइसीं गोसावियांते म्हणितलें: ‘बाबातें एक पोफळफोडणा रवणुभवनु बाबा तो गाहाण ठेवीतिः बाबाः पोफळफोडणा गाहाण ठेविजैलः मां बाबासि काइ मागुतें एथ येणें असे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः एथ द्रव्याची जरि प्रवृत्ति असे तरि हें देवता देखिलीः ये खाली एकें दांडेनि सात लोही द्रव्या भरलीया खांबी आळीलीया असतिः आळमाळ माती परती किजैल आणि दिसतीः परि एथ काढावेया प्रवृत्ति नाहीं: बाइः तैसें होइलः मग हें काइ?’’ बाइसी म्हणितलें: ‘‘तरि ना बाबाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बटिका जाः बाइसें सांघेति तो हाटकविा आणाः’’ मग चांगदेवोभट गेलेः पोफळफोडणा वाणीययपांसि गाहाण ठेविलाः आठां दामाचां वेचु आणिलाः आठ दाम रोकडें आणिलें: बाइसीं उपहारू गोसावियांचि पूरता निफजविलाः गोसावियांसि पूजावसरू जालाः आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहूड जालाः गोसावी आसनीं बैसले असतिः तवं क्षणा एका तो वाणीया ‘जा पुरूखाचां पोफळफोडणा ऐसां: तें पुरूख कैसें असति?’ म्हणौनि पहावेया आलाः गोसावियांतें देखिलें: तेणें गोसावियांचें अगाधत्व देखिलें: सर्व सौभाग्याचा निधि देखौनि मग चांगदेवोभटातें पुसिलें: ‘‘पोफळफोडणा गाहाण ठेविला तो या गोसावियांचा?’’ चांगदेवोभटी म्हणितलें: ‘‘ना होएः’’ पिसवीयेचे सोळा दाम काढिलेः गोसावियांपुढां ठेविलेः श्रीचरणां लागलाः आणि म्हणितलें: ‘‘जी तरि आपुला पोफळफोडणा आणू धाडावाः’’ चांगदेवोभटांतें म्हणितलें: ‘‘भटो चालाः आपुला पोफळफोडणा घेउनि याः’’ गेलेः घेउनि आलेः मग गोसावी तेथौनि बीजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात येथे ऋद्धपूरवरुन बेलौरां-सिराळां-टाकरखेडां मार्गे अष्टी येथे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: