Asadpur (असदपूर)

असदपूर, ता. अचलपूर जि. अमरावती


असदपूर येथील 4 स्थाने एकाच परिसरात आहेत-येथील 4 स्थाने गांवाच्या पूर्वेकडे चंद्रभागा नदीच्या काठावर मंदीर आहे. पायर्यांनी चढुन मंदीराकडे जावे लागते.


जाण्याचा मार्ग :

असदपूर हे गाव, आसेगाव-दर्यापूर मार्गावरील निंभारी फाट्यापासून पश्चिमेस 2 कि. मी. आहे. आसेगाव ते निंभारी फाटा 9 कि. मी. अमरावती ते असदपूर 41 कि. मी. परतवाडा ते असदपूर 34 कि.मी. आसेगाव, अमरावती-परतवाडा मार्गावर आहे. असदपूरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील तीनही स्थान.

1. वसती स्थान :

हे स्थान असदपूर गावाच्या पूर्वेस चंद्रभागा नदीच्या काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाकडे चढून जाण्यासाठी दक्षिण बाजूने 36 पायऱ्या आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात वडनेरहून असदपूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून परत वडनेरला गेले. (पू. ली. 83, स्था. पो.)


2. परिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख देवळात आहे. (स्था. पो.)

देवळाच्या उत्तरेचे दक्षिणाभिमुख देवळातील स्थान निर्देशरहित आहे.


3. जगतीच्या दारवठ्यातील स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे. (स्था.पो.)

वसती स्थान देवळाच्या दक्षिणेचे मांडलिक स्थान आहे.


अनुपलब्ध स्थान :

1. नदीकाठ चे आरोगणा स्थान.


निर्देशरहित स्थान: 1


असदपूर ची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 83
  • Asadpur : वासनिये वस्ति :।।: / वासनिये लींगाचां देउळीं वस्ति :।।:
  • एकु दीं गोसावी बिजें करूं आदरिलें: तवं रामदेवीं विनविलें: ‘‘जी मज पुनरपी दरीसन देयावें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें वासनिये जाउनी येइलः मग देइलः’’ वासनीये बिजें केलें: तेथ वस्ति जालीः नगरांत पाणिपात्र करौनि गंगेसि आरोगण करौनि वंकनाथाचा लिंगाचा देउळीं पहूड जालाः चौकीं आसन जालें: दिस तीनि अवस्थान जालें :।।:
  • Purvardha Charitra Lila –
  • Asadpur : छर्दाेबा भेटि अनुसरण :।।: (वासनि/असदपुर)
  • सर्वज्ञे म्हणितलेः ‘‘छर्दाेबा तें कर्‍हाडे ब्राम्हणः तें एथिचेया दरीसनासि आलेः दरीसन जालें: काही द्रव्य दरीसना केलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: बैसलेः मग तयां स्तीति जालीः स्थित्यानंद भोगिलाः’’ छर्दाेबाए म्हणितलें: ‘हां जीः संसार काइसेनि तरिजे?’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सकळही परीत्यजौनि सर्वभावे अनन्य होउनि अनन्यगति परमेस्वरासि शरण रीगीजेः तेणेंचि परमेस्वरु पविजेः’’ मग बोधु जालाः तें सर्वसंगपरित्याग करौनि गोसावियांसि अनुसरलेः गोसावी असतिपरि निरूपीलीः ‘‘देशाचा सेवटी झाडातळी जन्म क्षेपावेः देशाचा सेवटाः झाडाचा तळवटाः देवळाचा कोनटाः ये तिन्ही सेउनी असावेः स्वल्प अन्नः स्वल्प उदकः स्वल्प जीर्ण ठिगळ प्रावर्ण परिग्रहः देउळाचा कोनी वस्तिः मेलेया ऐसया असावेः अटन विजन किजेः भिक्षा मागिजेः भोजन किजेः निद्रा किजेः एथीचे स्मरण किजेः ऐसया परि जन्म क्षेपावेः एणें संसाराची निवृत्ति होएः’’ तैसेचि तें अनुष्ठानीं प्रवर्तलेः मग तें नित्याटना निगाले :।।: (हे गोष्टि गोसावी ढोरेस्वरीं बाइसांप्रति सांघीतलीः।।:)
  • (टीप: वासनाभेदानुसार ही लीळा वासनि/असदपूर या गावी केली आहे…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Asadpur : मुकेया वाचा देणें :।।: (वासनि/अ‍सदपुर)
  • गोसावियांसि नैचियें थडीये वंकनाथाचां देउळीं वस्ति जालीः उदेयाचि गोसावी चौकीं आसनी उपविष्ट असतिः तवं महिपाळनायक आलेः तयां वंकनाथाची भक्तिः गोसावियांतें देखिलें: सरिसा पुत्र ऐसें दरीसनां आलेः दरीसन जालें: आणि तयां स्तीति जालीः स्थित्यानंदु भोगिलाः मग तयातें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ हो तुम्हीं एथ असा?’’ तेही म्हणितलें: ‘‘हो जीः मीं एथ असेः आलेया गेलेया सिध्दसाधकाची सेवा करीः गये गेलोः वाराणसी गेलोः तुळापुरूखीं बैसलोः डांक डौर वाजविली परि माझेया पुत्रासि वाचा देः ऐसां कोण्ही नाहीं जीः आतां गोसावियांसि दरीसन जालें: तरि यांसि गोसावीं वाचा द्यावी जीः’’ मग गोसावी तयाचेया पुत्रातें कृपादृष्टी अवलोकुनी म्हणितलें: ‘‘तुमचें नांव काइ?’’ तेणें म्हणितलें: ‘‘जी माझे नांव सारंगः’’ गोसावी पुसिलें: ‘तुमचेया पीतेया नांव काइ?’’ तेणें म्हणितलें: ‘‘जीः महिपाळनायकः’’ गोसावी पुसिलें: ‘‘मातेसि नांव काइ?’’ ‘जीः तीपूराइसें:’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भले केलें हो तुम्हीं आद्य मध्य अवसान तिन्ही आठविलीः आतां तुम्हीं गृहासि जाः आपुलीये माततियें म्हणां: जे आजी आम्हीं बोलों सिकलों:’’ इतुकेनि तो घरां गेलाः आपुलेया मातेपुढां सांघो लागलाः ‘‘आइः मज वाचा जालीः बोलो सिकलोः’’ तवं तिया म्हणितलें: ‘‘बा तुज कोणें वाचा दिधलीः’’ तेणें म्हणितलें: ‘‘ना आइः देउळीं जे गोसावी बैसले असति तेहीं:’’ एतुकेनि तियें हरीखैजौनि गोसावियांचिया दरीसनासि आलीः गोसावियांसि दरीसन जालें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग विनविलें: ‘‘जी आमचेया गृहा आरोगणे बिजें करावें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें तेथ न येः एथचि आणाः’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि घरा गेलीः सेवै सरवळी काढिलीः गोसावियांकारणें उपहार निफजविलाः देउळां घेउनि आलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग तिया म्हणितलें: ‘‘जीः संसारीं जन्मलेयाचें फळ आजी जालें जे गोसावियांचे दरीसन जालें: आणि माझेया पुत्रासि वाचा दिधलीः’’ मग महिपाळनायक पूजाद्रव्यें घेउनि आलेः बरवी पूजा केलीः आणि दोन्ही हात जोडूनि स्तुति करौनि म्हणितलें: ‘जीः आजी निवाला जीः’’ म्हणौनि श्रीचरणां लागलाः तेहीं गोसावियांसि आरोगणा दिधलीः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः मग गोसावी तयासि पाठवणी दिधलीः सकळ लोकांसि आश्चर्य जालें: मागुती तेथचि वस्ति जाली :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: